Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedभौतिक संपन्नतेपासून दूर राहा !

भौतिक संपन्नतेपासून दूर राहा !

आजच्या भौतीक युगात अद्ययावत सुविधा उपभोगूनही मानवाच्या जीवनाला कुठलीही निश्चित दिशा नाही, असे दिसून येते. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती व प्रतिष्ठा हे सर्व काही असूनही त्यांची बुद्धी गोंधळली आहे. तो मात्र निराश, उद्विग्न होत आहे. त्याला हवा तसा शाश्वत चिरंतन व निरतिशय आनंद मिळत नसल्याने जीवन हे अतृप्त व अपूर्णत्वाच्या भयाण दरीकडे जात आहे. त्यात तृप्तीसाठी व पूर्णतेसाठी तो अतोनात प्रयत्न करीत आहे. परंतु कोणत्याही बाह्य गोष्टींमधून किंवा साधनांमधून तृप्ती व पूर्णता मिळणे सर्वथा अशक्य आहे. तर हा आनंद व जीवनाचे खरे समाधान बाहेर नसून आतच, मनात अंतरंगातच आहे.तो शोधला तरच त्याचे जीवन परिपूर्ण होईल ते शोधण्याचे प्रामाणिक कार्य मनुष्याने करायला हवे.

आजचे मानवी जीवन जर अंतर्मुख होऊन पाहिले तर भौतिक संपन्नता येऊ नये आत्मसुख, शांती व समाधान गमावल्यासारखे वाटते. या जीवनात आज अनंत समस्या निर्माणाधीन आहे. जेथे बघावे तेथे कलह, कटकटी, मारामार्‍या, अविश्वास आहे.

- Advertisement -

आज कोणी कोणाशी भावानुबंधाने जखडलेला दिसत नाही. जीवनातील सारी नाती दुरावल्यासारखी झाली आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी, पैशांसाठी, सत्तेसाठी माणसे कलह करू लागली आहेत. जातीय तणाव टोकाला गेले आहे. सर्वत्र दांभिकता, स्वार्थ, अहंकार, फसवेपणाची उदाहरणे समोर येत आहे.

सहनशीलते अभावी आत्महत्येचे प्रकार अतिशय मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. मनुष्य दिवसेंदिवस व्यसनांच्या आहारी जाऊन स्वतःच्या पायावर स्वतःच कुर्‍हाडीने घाव घालत आहे. विज्ञानाच्या जोरावर भौतिक सृष्टी जरी संपन्न झाली असेल, तरी मानवाला खर्‍या सुख, शांती व समाधानाला देणारी आंतरिक सृष्टी मात्र ढासळू लागली आहे. सत्ता व सामर्थ्याची जणू रस्सीखेच चालली असल्याचे आढळते.

अशा या दिशा व आनंद विहीन मानवी जीवनाला माणुसकीचा, प्रेमाचा, ऐक्याचा व आत्मिक भावाचा प्रशस्त वारसा मिळावा त्यासाठी शास्त्रकारांनी आपल्या वाड्मयात व संतांनी आपल्या वाणी तसेच लेखनात दाखविलेली जीवनविद्या निश्चितपणे आजच्या विज्ञान युगात प्रत्येकाला अवगत करणे अतिशय गरजेचे आहे. मानवी जीवनातील प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलाला धोका असतो, कधी बंदुकीच्या गोळीचे लक्ष ठरू शकतो, कधी वाहन अंगावर धडकण्याची शक्यता, कधी पाय घसरून कोसळण्याची शक्यता हे सर्व गृहीत धरावे लागते.असे धरूनच जीवन कंठायचे असते ही, मृत्यू केव्हा तरी गाठणारच. पण तो कोठे, कधी याचे भाकीत वर्तवता येत नाही.

जीवनात प्रत्येक क्षणाचा प्रवास हा मृत्यूकडे नेणारा असतो, तशा क्षणाला प्राणी जगण्यासाठी धडपडत असतो, पण हे सत्य मनुष्य विसरून जातो की, जीवनातील प्रत्येक पायरी व पाऊल स्मशानाची वाटचाल करीत असते. कारण जीवन जे लाभले आहे ते त्याची शर्त व संज्ञा घेऊनच येते. अशा वेळी जीवनाशी संघर्ष न करता ते लाभलं जसं आहे तसं निमूटपणे स्वीकारण्यातच हित असते. काही माणसं आयुष्याशी नको ते खेळतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात नैराश्य आल्याशिवाय राहत नाही. प्रतिकूल जीवनाशी झुंज न देता जीवनाच्या मर्यादा ओळखल्या तर मानसिक स्वास्थ्य तरी मिळू शकते.

बेडूक बैला इतका मोठा होण्याच्या प्रयत्नात पोट फुटून मेला ही इसापनीतीमधील गोष्ट अतिशय मार्मिक आहे. जीवन आहे तसं स्वीकारलं की मनातील विफलता, नैराश्य जाऊन त्या ठिकाणी उदात्तता व समाधान येऊ पाहते. सकारात्मक भावना मनात निर्माण होऊन अगदी सर्वच चांगले दिसू लागते. चांगले अनुभव येऊ लागतात. लाभलेल्या जीवनाचे स्वारस्य आकलन झाले की, मनातील मरगळ दूर होते. मन सजग बनते. त्यामुळे मानवाद्वारे चांगलीच व प्रामाणिक प्रवृत्ती घडते आणि त्या कारणाने जीवनाचा हा मार्ग व्यवहार्य, रास्त, विश्वासदर्शन व शांत – सौम्य वाटू लागतो. जीवन सुखमय व्हावे त्यासाठी मनात भाव निर्माण होतो.

दैवानुग्रहहेतुकं मनुष्यत्वम् या शास्त्रोत्तीनुसार ईश्वरकृपेने जीवन लाभले ते विशाल, सुंदर व समर्थ आहे. विद्वान व्यक्ती खोलवर विचार करून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की हे अस दुर्मिळ जीवन, अनमोल दान मिळाले आहे. या जीवनाचा खराखुरा आनंद घेण्याचा शहाणपणा आहे. आपले जीवन कसे असावे? हे आपल्याच हातात असते. कोणासोबत जावे, चालावे, बसावे, उठावे किंवा बोलावे हेही जीवनावर आधारित असते.

खरी जीवंविद्या तिला म्हटले जाते की, ज्या ईश्वराने मानवी जीवन बहाल केले. ज्या परमेश्वराचा मानव हा अंश आहे, त्याच परमेश्वराला पुनरपि जननं पुनरपि मरणं ,पुनरपि जननी जठरे शयनंम् या संसार चक्रात पुन्हा-पुन्हा न पडता त्याला शेवटी प्राप्त होणे तसेच या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे एका कवीने सांगितले आहे. त्यानुसार मानवीय जीवन आनंदाने जगणे व त्या परमेश्वराचे उतराई होणे हीच मानवी जीवनाची खरी विद्या आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या