Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedग्रामीण विकासाच्या दिशेने पाऊलवाट

ग्रामीण विकासाच्या दिशेने पाऊलवाट

करोना काळात लोकांची जीवनशैली बदलली असून जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागासह विविध विभागात अमुलाग्र बदल झाला होता. जिल्हा परिषदेमधील सामान्य प्रशसान वगळता शिक्षण, बांधकाम, सिंचन आणि ग्रामीण विकासाच्या अर्थचक्राचा गाडा रुतला होता. जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभाग रात्रंदिवस सेवा देण्यात व्यस्त होता. लॉकडाऊनच्या कार्यकाळात मोजकेच अधिकारी-कर्मचारी ऑफीसात तर काहींना होम टू वर्क काम करण्याची वेळ आली होती. गेल्या सात-आठ महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येक जण भिती आणि काळजीच्या सावटाखाली जगत होता आणि आजही जगत आहे. लॉकहाऊनमध्येही ग्रामीण भागातील 300 शाळांना वॉलकंपाऊंडचे काम सुरु होते. आता ही सर्व कामे पूर्णत्वास आली आहेत. मात्र, मागे वळून पाहताना अंगावर शहारे उभे राहतात आणि आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मिनीमंत्रालयातील अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनीही मोलाची साथ दिल्याने मिनीमंत्रालयाचा रथ वेगाने फिरत आहे…

चीन देशातून आलेल्या कोरोना व्हायसने संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठ्ठी मारल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. कोरोनाग्रस्त व्यक्तींना स्पर्श करण्याचे कोणीच धाडस करीत नव्हते. वैद्यकीय सेवाही तोकडी पडत होती.

- Advertisement -

सोन्यासारखी माणसं डोळ्यादेखत कोरोनाचे बळी जात असतानाही आरोग्ययंत्रणा हतबल ठरत होती. भल्याभल्यांना कोरोनाचे कोड उलगड नसल्याने सर्वत्र भितीयुक्त वातावरण निर्माण झाले होते. सामान्य माणसाला कोसोदूर नेणारी रेल्वेसेवा, बससेवेची चाके जागच्या जागी थांबल्या. आरोग्य सेवा,किराणा वगळताच सर्वच क्षेत्रातील सेवा ठप्प झाली होती. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहारांना ब्रेक लागला होता.

ऑफीसांमध्ये कमी उपस्थिती देवून कामे सुरु होती. परिणामी कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकजण काळजीच्या सावटाखाली जगत होता. स्वत: आणि परिवाराचे स्वसंरक्षण करण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात होता. लॉकडाऊनमध्ये मोजकेच अधिकारी-कर्मचारी ऑफिसात तर काहींना होम टू वर्क करण्याची वेळ आली होती.

जळगाव जिल्ह्यात 28 मार्च रोजी शहरातील मास्टर कॉलनीत पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊन जळगाव जिल्हा परिषदेमध्येही कोरोनाची एन्ट्री झाली आणि मिनीमंत्रालय सुद्धा लॉकडाऊन झाली होती. सर्वत्र कोरोनाच्या सावटाखाली वावरत असताना जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.बी.एन.पाटील, तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांच्यासह अधिकारी-कर्मचार्‍यांंनी अथक परिश्रम घेत असताना जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील,उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह सर्व सभापती आणि सदस्यांनी खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे मिनीमंत्रालय पुन्हा फिनीक्स पक्षाप्रमाणे उभारी घेऊन ग्रामविकास कामांना गती मिळाली आहे.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उदय

कोरोनामुळे माणसाच्या आयुष्याची जशी दिशा बदली आहे, तशीच शिक्षणातील भाषाव्यवहाराची दिशा बदलली आहे. कोरोनामुळे जळगाव जिल्ह परिषदेच्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उदय झाला.लॉकहाऊनमध्ये शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ हा प्रमुख बदल झाला असून आजवर कधीही घरून काम करण्याची वेळ अनेकांवर आली होती.

आता अनेक शाळा-महाविद्यालयांनी लर्न फ्रॉम होम सारख्या घोषणा करत शिक्षणही ऑनलाइन सुरु आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने डिजीटल अभ्यासक्रम तयार करुन विद्यार्थ्यांपर्यत ऑनलाईन ज्ञानाची गंगा घराघरात पोहोचविण्यासाठी सज्ज झाली असून त्यात शिक्षण विभाग सुद्धा अग्रेसर राहिला आहे. आज सारे जग नव्या डिजिटलयाझेशनच्या दिशेने जात असताना, आपण यात मागे पडून चालणार नाही. यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या अर्थ व वित्त विभागाने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे पगार स्लीप ऑनलाइन बँकिंगसारख्या अर्थव्यवहारातही जिल्हा परिेषदेचे स्थान दृढ करण्यात भरारी घेतली आहे.

कोरोनानंतरच्या काळात माणसाचे जगणे वेगळे असणार आहे. त्याचा व्यवहार बदलणार आहे, त्यासाठी काही ठोस कृतीपावले या विषयाच्या तज्ज्ञ जाणकारांनी ही यादी आणखी वाढवली तर चांगलेच होईल. ई-मराठी शाळा हव्यात- आज चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या महाष्ट्रात, पानिपतपासून-तंजावरपर्यंतच्या बृहन्महाराष्ट्रात, एवढेच नव्हे तर न्यूयॉर्कपासून सिडनीपर्यंतच्या अनेकांना मराठी शिकण्याची आणि मराठीतून शिकण्याची इच्छा आहे. त्यासाठी ई-मराठी शाळा उभाराव्या लागतील. त्यात मजा करत करत मराठी भाषा शिकता येईल का, यासाठी नवनवे प्रयोग करण्याचे आव्हान शिक्षकांना पेलावे लागणार आहे.

कोरोना काळात आरोग्य विभागाची यंत्रणा

जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागाने कोरोना काळात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उप आरोग्य केंद्र यासह गावपातळीवरील आरोग्य सेविकांची मदत घेवून माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्व्हेक्षण करुन कोरोनाबाधीत रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार सुुरु केले. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध यंत्रणांची मदत घेवून सॅनिटायझर, मास्क, पीपीई किट व उपयुक्त औषध साठा खरेदी करुन ग्रामीण भागातील आरोग्य नियंत्रणात आणण्याचे काम केले.

जिल्हातून मार्गस्थ होणार्‍या वाटसरुंची तपासणी करुन लक्षणे आढळल्यास त्यांना क्वारंटाईन व उपचार करण्याकडे तसेच कंटेनमेंट झोनही वाढविण्यात येवून आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासक डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांच्यासह विविध आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी ग्रामीण भागात चाचण्या वाढवून कोविड नियंत्रणात आणण्याचे काम केले.

ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याचे रुग्ण आढळुन आल्याने जि.प.आरोग्य विभागाने ग्रामीण भागात सर्दी, खोकला, ताप अशा विविध आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करुन ताप, सारी, डेंग्यू अशी विविध लक्षणे असलेली रुग्ण त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सुरुवातीच्या काळात कोविड संदर्भात आरोग्य यंत्रणेमध्येही गोंधळ निर्माण झाला होता. सुरुवातीला कोरोनाबाधीत रुग्णावर उपचार कसा करायचा? असा यक्ष प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा ठाकला होता. अशा संकट काळातही आरोग्य यंत्रणेने शासनाच्या गाईड लाईन्स् घेवून चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले होते.

पॉझिटीव्ह असलेल्या आणि संपर्कात असलेल्या रुग्णांची विलगिरकरण करुन उपचार पध्दतीचा अवलंब करुन, आरोग्य विभागाने यशस्वीपणे कामगिरी केली. त्यासाठी जिल्हा परिषदेला 15 व्या वित्त विभाग आयोगाअंतर्गत 130 कोटीचा निधी उपलब्ध करुन आरोग्या संबंधीत साहित्य खरेदी करण्यात आले होते. सर्व कामांची वर्क ऑर्डर देवून हा निधी आरोग्य विभागाने खर्ची केला. जळगावसह पंचायत समिती 13 कोटी रुपये, सर्व ग्रामपंचायत 104 कोटी रुपयांच्या कामांची वर्क ऑर्डर देवून कामे मार्गी लावली.

महिला व बालकल्याण विभाग ऑनलाईन

एप्रिल महिन्यापासून महिला व बालकल्याण विभागाने ग्रामीण भागातही अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देवून ऑनलाईन काम सुरु केले आहे. ग्रामीण भागातील पालकांचे व्हॉटस्अ‍ॅप गु्रप तयार करुन अंगणवाडी सेविकांनी व्हीडिओ शेअर केले. आकार बाल शिक्षण अभ्यासक्रम अविरत सुरु आहे. लॉकडाऊनमध्ये अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर ग्रामीण भागातील अंगणवाडी विभागासमोर आव्हाने निर्माण झाली होती. मात्र अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी गरम ताज्या आहाराऐवजी स्वच्छ धान्य देण्याचा निर्णय घेतला. गहू, डाळी, हळद, मिठ, मिरची, तेल अशा विविध संसारोपयोगी वस्तुंचा पुरवठा करुन शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचली. जिल्ह्यातील 3 हजार 640 अंगणवाड्या असून 2 लाख 49 हजार 432 मुलांना घरपोहच आहार देण्यात आला. हा पायंडा अखंडपणे सुरु आहे.

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठं असलंतरी त्याच्या वेदना जाणवत नाही हेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आपल्या कर्तुत्वातून जिल्हा वासियांना दाखवून दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या