Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedचाळीसगाव घेत आहे विकासाची भरारी...

चाळीसगाव घेत आहे विकासाची भरारी…

विश्वविख्यात छायाचित्रकार केकी मूस आर्ट गॅलरीच्या विस्तारीत तीन मजली इमारतीच्या कामासाठी तत्कालीन आमदार तथा विद्यामान खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून 28 वर्षांनतंर दोन कोटी 54 लाख रुपये मिळाले आहेत. आजघडीला केकी मूस कला दालनाच्या नवीन इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आहे. शहराच्या आस्मीतेचा विषय असलेला शिवपुतळ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. यासाठी निधी मंजूर होऊन शिवपुतळ्याचा उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून पुढील वर्षी शिवसृष्टीसह भव्य शिवपुतळा चाळीसगावकरांना पाहवयास मिळणार आहे…

जिल्हातील इतर तालुक्यांच्या मानाने निसर्गाची देण असलेला चाळीसगाव तालुका भौगोलीक संपन्नतेचा धनी म्हणता येईल. गेल्या पाच वर्षात शहरासह तालुक्यात विस्तारलेले नविन रस्ते, शहरात अगामी काळात होणार्‍या भुयारी गटारी, केकी मूस कलादालनाची नवीन वास्तू, शहरातील सर्वांना समान दाबाने पाणी पुरवठ्यासाठी नवीन पाईप लाईन, बस स्थानकाचे काँक्रीटीकरण आणि पाटणादेवी येथे पर्याटनासाठी मिळालेल्या विकास निधीमुळे चाळीसगाव विकासाच्या दिशेने उत्तुंग भरारी घेवून पाहत आहे. कोरोनाच्या कालवधीत देखील हे काम चालू असून यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले खासदार उन्मेष पाटील यांनी. तर त्यापुढेही जावून विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे सध्या तालुक्याच्या सर्वांगींण विकासासाठी मिशन मोडवर काम करीत आहेत.

- Advertisement -

शहरासाठी थेट गिरणा धरणातून पाणी पुरवठा योजना आणल्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरवासियांना मुबलक पाणी मिळत आहे. इतरत्र दुष्काळ असतानाही चाळीसगावात मात्र पाण्याच्या बाबतीत सुकाळ होता आणि आहे. परंतू शहराचा वाढता विस्तार व जीर्ण झालेली पाईपलाईन नगरपरिषदेसाठी डोकेदुखी ठरत होती. तसेच अनेक भागात पाणी समान दाबाने पोहचत नव्हते. त्यामुळे शहरातील सध्याची पाणीपुरवठा यंत्रणा अधिक अद्ययावत करण्यासाठी, शहरवासियांना शासनाच्या नियमाप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी 62 कोटी रुपयांची नवीन वाढीव पुरवठा योजना मंजुर करण्यात आली आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील झाली आहे. या पाणी पुरवठा योजनेमुळे शहरावासीयांना समान दबाने पाणी मिळणार आहे.

लोकसंख्येमुळे शहराचा विस्तार होत असून भौगोलिक सीमाही वाढत आहे. सद्यस्थितीत असलेल्या उघड्या गटारींमुळे लोकांच्या आरोग्य व स्वच्छतेची समस्या निर्माण होत आहे. या समस्या कायमच्या दूर होण्यासाठी नगराध्यक्षा अशालता चव्हाण व सत्ताधारी नगरसेवकांनी तत्कालीन आमदार तथा खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे पाठपुरवा केला. उन्मेष पाटील यांनी जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरवा करुन, राज्य सरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत 127 कोटींची भुयारी गटारी योजनेला मंजुरी देण्यात आली.

ही योजना शहरात पुढील तीस वर्षांचे वाढत्या लोकसंख्येला गृहीत धरुन करण्यात आली आहे. शहरातून वाहणार्‍या डोंगरी व तितूर नदी संगमाला आणि नजीकच्या मस्तानी अम्मा टेकडी परिसरात पर्यटनासाठी उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या पर्याटन व सांस्कृतिक विभागाने चार कोटी 92 लाख रुपयांची निधी प्राप्त झाला असून प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झाली आहे. डोंगरी-तितूर संगम स्थळावर नदीला घाट बांधण्यात येत आहे. तसेच संरक्षक भिंती उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीचा मित्तल गृपचा 7000 कोटीचा भारत वायररोप प्रकल्प उभा राहीला आहे. तर गुरजरात येथील 270 कोटी रुपयांचा अंबुजा अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचे कामही पूर्ण झाले असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वीत होणार आहे. गेल्या चार वर्षात एमआयडीसीमध्ये बरेच लहान-मोठे खाजगी उद्योग सुरु झाले आहेत. बाहेरील व्यापारी देखील येथे गुतवणूक करण्यास उत्सूक असून उद्योग उभारी करीत आहेत. तालुक्यात गेल्या पाच वर्षात दळवळणासाठी रस्त्याचे जाळे विणले गेले आहे. तालुक्यात चार जिल्हा मार्ग राज्य मार्गात वर्ग झाले आहेत.

तर दोन राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गात वर्ग झाले असून नवीन चकाचक रस्ते तयार होत आहेत. धुळे ते औरंगाबाद या रस्त्याचे कन्नड घाटासह डांबरीकरण मागील वर्षी झाले. जळगाव ते चांदवड हा नवीन राष्ट्रीय महामार्ग क्र.जे 753 चे काम वेगाने सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील हा पहिला सिमेंट कॉक्रिटीचा महामार्ग असून भडगांव ते चाळीसगाव 46 किलोमीटरसाठी 214 कोटी तर चाळीसगाव ते नांदगाव या 44 किलोमीटरसाठी 168 कोटी इतका भरघोस निधी यासाठी मंजुर झाला असून प्रत्यक्षात काम अंतिम टप्प्यात आहे. चाळीसगाव शहरातून या रस्त्याचे काम जवळपास पूर्णझाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या