रुग्णांना जीवदान देणारे 'बिटको कोविड रुग्णालय'

रुग्णांना जीवदान देणारे 'बिटको कोविड रुग्णालय'

नाशिक मनपाच्या (Nashik Municipal corporation) नाशिकरोड येथील बिटको करोना रुग्णालयाची (Bytco Covid Hospital nashikroad) क्षमता एक हजार खाटांची आहे. येथे सातशेहून अधिक रुग्ण दुसर्‍या लाटेत दाखल झाले होते. आता येथे केवळ जेमतेम शंभरच्या आसपास रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने बिटकोच्या तळात बालकांसाठी करोना कक्ष उभारण्यात आला आहे. बिटको रुग्णालय गरीब व मध्यमवर्गीय करोना रुग्णांसाठी वरदान ठरले आहे...

करोनाच्या (Covid 19) पहिल्या लाटेच्या तुलनेत जानेवारीपासून दुसर्‍या लाटेशी टक्कर देताना अनेक रुग्ण करोनाचे बळी पडले. मात्र बिटकोत वैद्यकीय उपचार योग्य पध्दतीने झाल्याने अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मार्च 2020 मध्ये करोनाचा भारतात शिरकाव झाला. जिल्ह्यात पहिला रुग्ण लासलगावला (lasalgaon) आढळला. नंतर हळूहळू जिल्ह्याच्या विविध भागांत रुग्ण मिळत गेले. ठिकठिकाणी करोना उपचार केंद्रांची निर्मिती झाली. (Covid treatment center)

बिटकोच्या प्रशस्त इमारतीत तीनशे खाटांचे करोना केंद्र तयार करण्यात आले. रुग्णवाढीनंतर पाचशे खाटांचे नियोजन करण्यात आले. या केंद्राची जबाबदारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या खांद्यावर देण्यात आली.

फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र न डगमगता मनपा आयुक्त कैलास जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, शहर कोविड नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली बिटकोचे नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. शिल्पा काळे, डॉ. रत्नाकर पगारे यांनी करोना रुग्णांच्या उपचारांची योग्य व्यवस्था केली. आता रुग्णसंख्येत घट होत आहे. 24 मेनंतर रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. मृत्यूदरही कमी झाला आहे....

बाल कक्ष (Children ward)

करोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याचे मत आरोग्य तज्ञांनी वर्तवले आहे. त्यासाठी मनपाच्या बिटको करोना रुग्णालयात बालकांसाठी करोना कक्ष उभारण्यात आला आहे. तेथे आतापर्यंत दोन मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. इतर दोघांवर सुरु आहेत. येथे प्राणवायूसह सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. चारही बालकांना प्राणवायूची गरज भासली नाही. बाल कक्षाची क्षमता शंभर रुग्णांची आहे. वेळप्रसंगी ती वाढवता येऊ शकते. बिटको रुग्णालयाची क्षमता एक हजार खाटांची आहे. येथे सातशेच्यावर रुग्ण दुसर्‍या लाटेत दाखल झाले होते. आता येथे केवळ शंभरच्या आसपास रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने बिटकोच्या तळात बालकांसाठी करोना कक्ष उभारण्यात आला आहे. बालरोगतज्ञांची मदत त्यासाठी घेण्यात येत आहे.

सर्वांना लाभ

बिटको रुग्णालय गरीब व मध्यमवर्गीय करोना रुग्णांसाठीच नव्हे तर श्रीमंतासाठीही वरदान ठरले आहे. गेल्या दीड वर्षात हजारो रुग्णांना येथे उपचार घेतले. त्यासाठी त्यांना एकही पैसा लागला नाही. खासगी रुग्णालयांत करोना रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बिले आकरण्यात आली. बिटकोमध्ये उपचारांपासून औषधे मोफत दिली जातात. तसेच दोन वेळचे जेवण, नाश्ता, चप्पल, टूथपेस्ट आदी साहित्यही मोफत मिळते. नाशिकरोड, नाशिक शहर, देवळाली कॅम्प, लहवित, भगूर, सिन्नर, शिंदे, पळसे, इगतपुरी, मालेगाव, येवल्यासह जिल्ह्यातील विविध भागातून करोना रुग्ण बिटकोत उपचारासाठी येत आहेत. शेतकरी, मजूर, नोकरदार, व्यावसायिक आदींचा त्यात समावेश आहे. खासगी रुग्णालयात पाण्यासारखा पैसा ओतूनही फरक न पडलेले रुग्णही बिटकात येऊन बरे झाले आहेत. बाल करोना कक्षाचा लाभही सर्व वर्गांना होणार आहे.

क्षमतेत वाढ (Increased Capacity)

गंभीर करोना रुग्णांवर बिटको, झाकीर हुसेन, जिल्हा रुग्णालय व डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात उपचार केले जातात. 1 जुलै 2020 रोजी नवीन बिटको रुग्णालयासमोर अग्नीशमन दलाच्या इमारतीत करोना केंद्र सुरु झाले. करोनाची लाट तीव्र झाल्याने अर्धवट स्थितीतील नवीन बिटको रुग्णालय युध्दपातळीवर सज्ज करण्यात आले. त्याची क्षमता एक हजार खाटांची आहे.

बिटकोकडे ओढा (Bytco Hospital)

बिटकोत सर्वात मोठा शासकीय प्राणवायू निर्मिती प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. रुग्णांना पिण्याच्या गरम पाण्यासाठी चार मोठे कुलर आहेत. आंघोळीला गरम पाणी, चहा-नाश्ता, दोन वेळचे चांगले जेवण, टूथ पेस्ट, ब्रश, स्लिपर, औषधोपचार सर्व मोफत मिळते. हवा खेळती व जागाही प्रदूषणमुक्त आहे. गणेशोत्सव, दीपावलीसारखे सणही नगरसेवक जगदीश पवार यांच्या पुढाकारामुळे रुग्ण साजरे करतात. या सर्व गोष्टींमुळे विभागीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त, नगरसेवक, लोकप्रतिनिधी आदींही येथे उपचार घेण्यास येत आहेत.

लोकसहभागातून प्रकल्प (Oxygen Plant)

लोकसहभागातून नाशिकमधील पहिला प्राणवायू प्रकल्प बिटको करोना रुग्णालयात उभा राहिला आहे. या प्रकल्पामुळे दिवसाला 68 जंबो सिलेंडर म्हणजे शंभर रुग्णांना पुरेल एवढा प्राणवायू हवेतून निर्माण करता येणार आहे. करोनाच्या तिसर्‍या लाटेत मुलांना धोका संभावत असल्याने हा प्रक्लप उभारला आहे. बिटकोत एकूण चार प्राणवायू प्रकल्प तयार झाले आहेत. अकराशेपेक्षा जास्त रुग्णांना अखंडपणे प्राणवायू पुरवठ्याची सोय झाली आहे.

नाशिक आयटी असोसिएशन, भारत विकास परिषद मिडटाऊन, सीओईपी माजी विद्यार्थी संघटना, जायन्ट्स क्लब ऑफ नाशिक यांनी 38 लाखांचा निधी जमवून बिटकोत दोन प्राणवायू प्रकल्प उभारून दिले. दोन लाखांचा अवांतर निधी देखभालीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. वरील चारही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उद्योगपती अशोक कटारिया, अरविंद महापात्रा, उमेश राठी, केतन राठी, प्रशांत पाटील, विजय बाविस्कर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. हवेतूनच प्राणवायू निर्मिती होणार असल्याने प्रकल्पाला पुढे फारसा खर्च येणार नाही.

बिटकोचा विक्रम (Records of bytco hospitals)

बिटकोत 19 केएल क्षमतेचा एक हजार रुग्णांना पुरेल असा व नाशिकमधील सर्वात मोठा प्राणवायू प्रकल्प दोन-अडीच महिन्यांपूर्वीच कार्यान्वित झाला. त्याच्याशेजारीच तीन केएल क्षमतेचा नवा अतिरिक्त प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्या पाठोपाठ आता लोकसहभागातून दोन प्राणवायू प्रकल्प बिटकोमागे उभारण्यात आले आहे. चार प्रकल्पामुळे बिटको रुग्णालय प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण झाले आहे.

कमी साधनांत विजय

नाशिकरोडच्या नवीन बिटको रुग्णालय आवारातील अग्निशमन दलाच्या इमारतीत 1 एप्रिल 2020 साली करोना केंद्र सुरु झाले. दीड महिन्यातच याकेंद्राने डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली कमी मनुष्यबळात उत्कृष्ट कामगिरी केली. 357 व्यक्तींना येथे प्रवेश देण्यात आला. 18 दिवसांच्या बाळावर येथे उपचार झाले.

करोनाचे दहापैकी 4 रुग्ण येथे बरे होऊन घरी गेले. नंतर करोना रुग्णांसाठी नवे बिटको रुग्णालय सुरु झाले. सर्व सुविधांसह रुग्णांना समुपदेशनही केले जाते. मर्यादित वैद्यकीय सुविधा व मनुष्यबळ असतानाही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यामुळे लक्षणीय आहे. नवीन बिटको रुग्णालय गरीब, मध्यमवर्गीयच नव्हे तर आर्थिक संपन्न व्यक्तींसाठीही मोलाचा आधार ठरले आहे.

बिटको करोना रुग्णालयात सातशे खाटा सज्ज आहेत. गरजेनुसार आणखी तीनशे खाटा वाढवण्याची प्रशासनाची तयारी आहे. एमआरआय, सिटीकॅन कक्ष तसेच प्राणवायू प्रकल्प आदी महत्त्वाच्या सुविधा येथे करण्यात आल्या आहेत. नाशिक शहर, नाशिकरोड परिसर, इगतपुरी, सिन्नर येथील रुग्ण बिटकोत दाखल होतात. जेल, रेल्वे, प्रेस येथेही बिटकोने करोना चाचण्या घेतल्या आहेत.

एचआरसीटी, तपासणी प्रयोगशाळा (HRCT experimental laboratory)

बिटको करोना रुग्णालयातील बंद पडलेले एचआरसीटी सिटीस्कॅन मशिन सुरु झाले असून हजार ते दीड हजारात येथे चाचणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांची बाहेर होणारी लूट व धावपळ थांबणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com