सोशल मीडियाचा भारतीयांना उबग

सोशल मीडियाचा भारतीयांना उबग

- अपर्णा देवकर

सोशल मीडियाचा भारतीयांना उबग आला आहे, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते. परंतु खरोखरच दिवसभर चॅटिंग करणार्‍या आणि एखाद्या सेलिब्रिटीला Celebrity कोणत्या ना कोणत्या कारणावरून ट्रोल करणार्‍या मंडळींना आता बस्स झाले, असे वाटत आहे. म्हणूनच सुमारे 5 लाख यूजर दर महिन्याला सोशल मीडियाला सोडू इच्छित आहेत. म्हणूनच भारतात इंटरनेटचा वापर वाढला असला तरी फेसबुक यूजरची संख्या वाढलेली नाही. ट्विटरची देखील हिच स्थिती आहे.

‘रिबूट’ ऑनलाइनच्या एका सर्वेक्षणानुसार आजच्या काळात बहुतांश यूजर हे सोशल मीडियापासून दूर कसे जावे, फेसबूक अकाउंट कसे ब्लॉक करावे, इन्स्टाग्राम कसे सोडावे यासारखे टॉपिक गूगलवर सर्च करत आहेत. विशेष म्हणजे फेसबुक आणि यूट्यूब वापरात भारताचा क्रमांक जगात पहिला लागतो. देशात इंटरनेटचा वापर करणार्‍यांपैकी 87 टक्के लोक यूट्यूबचा वापर करत आहे. त्याचवेळी 76 टक्के लोक फेसबुक तर 75 टक्के लोक व्हॉटसअप वापरत आहेत. मात्र आता लोकांना सोशल मीडियाचा कंटाळा आला आहे आणि ते आता सोडण्याच्या तयारीत आहेत.

भारतातील सक्रिय 75 कोटी लोकांपैकी सुमारे 5 लाख लोक दर महिन्याला सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा विचार करत आहेत. अशा बाबतीत भारत दुसर्‍या स्थानावर आहे. सोशल मीडिया सोडणार्‍यांत अमेरिका सध्या आघाडीवर आहे. 2019 नंतर फेसबूक युजरचे नेमके आकडे उपलब्ध नाहीत. परंतु भारतात इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या वाढूनही फेसबुकच्या संख्येत वाढ झालेली नाही.

सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात 2019 मध्ये ‘लोकनिती’ने केलेल्या सर्वेक्षणात देखील 2018-19 या काळात भारतात फेसबुकचा वापर करणार्‍यांची संख्या वाढलेली नसल्याचे म्हटले आहे. सध्या भारतात फेसबुकचे 33 कोटी ग्राहक आहेत आणि हा आकडा 2018 मध्येच पूर्ण केला गेला आहे. यावरून इंटरनेटबरोबरच फेसबुक ज्या ठिकाणी पहिल्यांदा पोचत असेल आणि ग्राहक नव्याने जोडले जात असले तरी शहरी भागातील यूजर यापासून चार हात लांब राहत आहेत. अनेकांनी फेसबुक अकाउंट डिलिट केलेले नाही, परंतु त्याचा वापर करत नसल्याचे दिसून येते. कोपनहेगन येथील हॅप्पीनेस रिसर्च इन्स्टिट्यूटने म्हटले की, केवळ सात दिवसांसाठी सोशल मीडियापासून दूर राहिलेल्या नागरिकांच्या आनंदात, समाधानात भर पडल्याचे दिसले. त्यांच्यातील रागाची भावना, एकटेपणा कमी असल्याचे निदर्शनास आले.

2019 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि न्यूयॉर्क विद्यापीठात केलेल्या एका संशोधनात, फेसबुक सोडणार्‍या लोकांचा इंटरनेटवरचा वेळ कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर फेसबुक सोडल्यानंतर लोकांचा चोवीस तासातील सुमारे एक तास वेळ वाचलेला दिसतो. हार्वर्ड व्यिापीाच्या नाइमन लॅब संकेतस्थळाच्या मते, जसजसे लोक सोशल मीडियापासून दूर जात आहेत, तसतसे ते स्वत:ला आरोग्यदायी समजत आहेत. या आधारावर ते सकारात्मक निर्णय घेत आहेत. मानसोपचार तज्ञ हिमानी कुलकर्णी म्हणतात, “आपण पुस्तकं, टिव्ही आणि संगीतात आनंद शोधतो. या आनंदाला सोशल मीडियाने चालना दिली. विशेष म्हणजे एखादा व्यक्ती नेहमीच आपल्यासाठी सोपा मार्ग निवडण्याचा प्रयत्न करत असतो. उत्पादन क्षमतेत 40 टक्के घट

सोशल मीडियाच्या अतिवापराने वैयक्तिक कामांना, कुटुंबासाठी अधिक वेळ देता येत नसल्याचे चित्र आहे. थेट भेट (कोराना काळ) कमी होत असताना व्हर्च्युअल दुनियेत बुडालेले लोक आता एकत्र येण्याचे विसरूनच गेले आहेत. परिणामी अनेक युवक आणि मुले हे सोशल मीडियावर सायबर बुलिंगला बळी पडू शकतात आणि त्याच्या अधिक वापराने चटकही लागू शकते.‘अमेरिकी सायकॉलॉजी असोसिएशन’च्या रिपोर्टनुसार एखादा व्यक्ती फेसबुक खाते वापरताना अन्य काम करत असेल तर त्याच्या उत्पादन क्षमतेत 40 टक्के घट होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com