Monday, April 29, 2024
HomeUncategorizedत्र्यंबकेश्वरचा चित्रपट सृष्टीला विसर

त्र्यंबकेश्वरचा चित्रपट सृष्टीला विसर

त्र्यंबकेश्वर । मोहन देवरे | Trimbakeshwar

भारतीय चित्रपटसृष्टीचे (Indian cinema) आद्य दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांचा जन्म त्र्यंंबकेश्वरनगरीत झाला. दादासाहेब फाळके यांची आठवण राहील, असे एकही स्मारक (Monument) त्र्यंंबकेश्वरमध्ये अथवा तालुक्यात नाही बॉलिवूडची (Bollywood) गंगोत्री असलेल्या त्र्यंंबकचा सिनेसृष्टीला विसर पडला आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वरनगरी केवळ येथील ब्रम्हगिरीवरून (Brahmagiri) निघणार्‍या गोदावरी नदीचेच (godavari river) उगमस्थान नव्हे तर बॉलिवूडची गंगोत्री त्र्यंबकेश्वर (Gangotri Trimbakeshwar) आहे. कारण दादासाहेब फाळकेचा जन्म त्र्यंबकेश्वरमध्ये झाला यामुळेच त्र्यंबकेश्वर ही आज सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या बॉलिवूड गंगोत्री आहे दरवर्षी सार्‍या सिनेसृष्टीचे लक्ष स्व. दादा साहेब फाळके याच्या नावाने दिल्या पुरस्काराकडे असते मात्र सिनेसृष्टीने कधी त्र्यंबकेश्वर कडे लक्ष दिले नाही.

दादासाहेबांनी राजाहरिश्चंद्र हा देशातील पहिला मूकपट तयार करून भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली.या चित्रपटाचे चित्रीकरण त्र्यंबकेश्वरनगरीत झाले त्र्यंबकेश्वर नगरीतील त्या काळातील कलाकार चमकले नंतर दादासाहेबांनी ’मोहिनी भस्मासूर, लंकादहन, श्रीकृष्णजन्म, कालिया मर्दन आदी चित्रपट काढले. दरम्यान गेल्या 85 वर्षात त्र्यंबकेश्वर नगरीलगतच्या परिसरात सिनेसृद्धतीने हिंदी (hindi), मराठी (marathi) अशा 60 ते 65 चित्रपटाचे चित्रीकरण झालेले आहे. त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य डोंगराळ परिसर चित्रिकरणासाठी योग्य आहे. आहे फाळकेच्या कन्या मंंदा आठवले या पहिल्या बाल कलाकार समजल्या जातात.

त्र्यंबकेश्वर गावात मंदिरामध्ये काही चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे.खंबाळे अंजनेरी येथे हे चित्रीकरण झालेले आहे. मनोज कुमार चा बलिदान, कोरा कागज,फरीदा जलाल शम्मी कपूर यांचा ‘बंडलबाज’ राजेश खन्ना, रेखा यांचा ‘भोला भाला’ हेमा मालिनी यांचा ‘मीरा’ सत्यनारायण की महाकथा, मराठी बारा ज्योतिर्लिंग, प्रसिद्ध हिंदी चित्रपट खाकी च्या चित्रीकरण प्रसंगी विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय अपघात झाला होता. या अपघाताने पहिणे बारी जगाच्या पटलावर आली.

त्रंबकेश्वर परिसरातील डोंगरांवर खेड्यांवर चित्रपटांचे शूटिंग झाले. निसर्ग रम्य वनश्री मुळे अगदी फुकट मध्ये चित्रपट दिग्दर्शकांनी चित्रीकरण केले.माजी आमदार बबनराव घोलप यांनी काढलेल्या चित्रपटाचे शूटिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात झाले. चित्रपट सृष्टीतीलअसंख्य अभिनेते-अभिनेत्री त्रंबकेश्वर ला भेट देतात. पण त्र्यंंबकेश्वरकडे त्यांचे दुर्लक्ष आहे .

खरेतर दादासाहेब फाळके यांचा परिचय फलक त्र्यंबकेश्वर मंदिर चौक कुशावर्त चौक या ठिकाणी लावणे.गरजेचे आहे. त्र्यंंबकेश्वरी दादासाहेब फाळके यांचे स्मारक झालेली नाही स्वर्गीय दादासाहेब फाळके यांची आठवण करून देईल असे स्मारक होणे गरजेचे आहे.त्र्यंबक येथे जे कलाकार इथे चित्रपटसष्टीतले चे कलाकार भेट देतात. त्यांना या विषयावर अवगत करणे गरजेचे आहे. राजकारणी मंडळींना तर कला क्षेत्राशी घेणे नाही. त्रंबक नगरपालिकेला आहे याचा पूर्णपणे विसर पडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या