Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याIndian Air Force Day : शत्रूस तोडीस तोड उत्तर देणाऱ्या भारतीय वायुसेनेबद्दल...

Indian Air Force Day : शत्रूस तोडीस तोड उत्तर देणाऱ्या भारतीय वायुसेनेबद्दल खास गोष्टी

भारतीय वायु सेनेच्या ताकदीमुळे आज कोणताही देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करत नाही. याच हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय हवाई दल म्हणून केली होती. स्वातंत्र्यानंतर त्याची ओळख भारतीय हवाई दल म्हणून झाली. 1932 पासून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस ‘भारतीय वायु सेना दिवस’ (Indian Air Force Day) म्हणून साजरा होतो.

भारतीय वायु दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आहे. गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथे असलेले हिंडन एअर फोर्स स्टेशन आशियातील सर्वात मोठे आहे. भारतीय वायुसेनेच्या स्थापनेपासून ते ‘नभ: स्पृशं दीप्तम्’ या ब्रीदवाक्याचे अनुसरण करत आहे. याचा अर्थ ‘अभिमानाने आकाशाला स्पर्श करणे.’ वायुसेनेचे हे ब्रीदवाक्य भगवद्गीतेच्या 11 व्या अध्यायातून घेतले आहे. भारतीय हवाई दलाचा रंग निळा, आकाशी आणि पांढरा आहे.

- Advertisement -

स्थापनेपासून ते आजपर्यंत भारतीय वायुसेनेता ७३ प्रकारच्या वेगवेगळ्या विमानांना उडविण्याचा अनुभव असून त्यात अण्वस्त्रे डागण्याची क्षमता असलेल्या विमानांचा सुद्धा समावेश आहे. भारतात सध्या वायु सेनेचे ५ विभाग असून पश्चिम विभागाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे मध्य विभाग आहे. शिलाँग येथे पूर्व विभाग, जोधपूर येथे दक्षिण पश्चिम विभाग तर तिरुवंतपुरम येथे दक्षिण विभाग असून हे सर्व विभाग लढाऊ विमाने व सशास्त्रांनी सज्ज आहेत.

भारतीय वायुसेनेची सुरुवात चार वेस्ट लँड ट्रेनी ऑफिसर 19 हवाई शिपाई, त्यांचे कमांडर फ्लाईट लेप्टनंट, सेसील बाऊचर यांच्या समावेशाने झाली. दुसऱ्या महायुद्ध काळात 1945 मध्ये रॉयल एअरफोर्सची ओळख निर्माण झाली. त्यानंतर 1954 मध्ये एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी पहिले भारतीय एअर फोर्स चिफ (मुख्य) झाले. स्वातंत्र्यानंतर वायुसेनेने पाकिस्तान (1965 1571) विरुद्ध झालेल्या युद्धात उत्तम कामगिरी केली त्यानंतर कारगिल संघर्षात भारतीय वायुसेनेने अतुलनीय कामगिरी केली.

याशिवाय ऑपरेशन विजय मेघदूत केकटस् यामध्ये मोलाची कामगिरी केली. एअर मार्शल अर्जुनसिंग यांना एअर चिफ मार्शल म्हणून बढती देण्यात आली. फाईव्ह स्टार सांभाळणारे भारतीय सेनेतील ते पहिले अधिकारी ठरले. हवाई दलाने अगदी अलीकडच्या काळातील बालाकोट येथील सर्जिकल स्टाईक करून आपला दबदबा कायम राखला आहे. चीनशी 1962 मध्ये झालेल्या युद्धात भारतीय राजकारण्यांनी वायुदलाचा म्हणावा तेवढा वापर केला नाही. अरुणाचल डोंगराळ भागात शत्रू सैन्याला खिंडीत गाठून त्यांना जेरीस आणता आले असते. वायुदलाशी चर्चाही केली नाही.

1971 मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय वायुसेनेतील अधिकान्यांशी विचार विनिमय करून युद्धनीती आखली. त्यामुळे सरकारचे पाठबळ व नियोजनामुळे भारताने यश मिळवले. बांगला देश स्वतंत्र करण्यास भारतीय वायुदलाची महत्त्वाची भूमिका होती. कारगिल युद्धातील कामगिरीमुळे वायुसेनेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

केवळ युद्धभूमीवरच नव्हे, तर देशातील विविध भागांत आपत्तीवेळीही हवाईदलाने मोठी मदत केली आहे. 2014 च्या सप्टेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये महापुरात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अशा अस्मानी संकटात वायुसेना व सैन्य दलाने केलेली मदत कौतुकास्पद होती. गेल्या चार-पाच वर्षांच्या काळात नैसर्गिक आपत्तीमध्ये वायुदलाने व सैनिकांनी सर्व भागांत मदत केली. परदेशातील संकटामध्ये भारतीय नागरिकांना परत आणण्यात हवाईदलाचा वाटा मोठा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या