अंमली पदार्थांचे वाढते सेवन चिंताजनक

अंमली पदार्थांचे वाढते सेवन चिंताजनक

नाशिक | Nashik | दखल | शुभम धांडे

अंमली पदार्थांच्या (drugs) सेवन करण्याच्या अनेक घटना घडल्याच्या बातम्या येतं असतात . मात्र ज्यावेळी अशा प्रकरणात धनाढ्य, किंवा एखाद्या क्षेत्रात वेगळ्या उंचीवर असणारी व्यक्ती, त्यांच्याशी संबंधित लोकांची नावं पुढे येतात तेव्हा अंमली प्रतिबंधक समितीकडून (Drug Prevention Committee) (एनसीबी) (NCB) कडून अंमली पदार्थ सेवन करणारे आणि विकणारे यांच्यावर कारवाई करण्याचा धडाका लावला जातो. तेव्हा मोठ्या व्यक्ती त्यात असल्यामुळे त्याची व्यापकता लक्षात येते.

आजकाल या सगळ्यांचा तरुणांवर होणारा परिणाम आणि व्यसनाधीनता यावर काही संस्था, डॉक्टर (doctor), मानसोपचार तज्ज्ञ (psychiatrist) बारकाईने अभ्यास करत आहेत. पण योग्य तो रिझल्ट मिळत नाही. समुपदेशन करून तरुण निर्व्यसनी होतातही परंतू त्याचवेळी तेवढेच तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जातात. आजघडीला भारतामध्ये पंचवीस ते तीस टक्के लोक धूम्रपान (Smoking) करतात.

त्यापैकी 15 टक्के लोक हे व्यसनाधीन आहेत. यामध्ये 20 टक्के तरुण आहेत. यापैकी 15 टक्के लोकांना जर सिगरेट (Cigarettes), तंबाखू (tobacco), बिडी, दारू त्यांना पाहिजे ते मिळाले नाही तर मानसिक रुग्ण होतात. धूम्रपान करणार्‍या व्यक्ती स्वतःच्या आरोग्यावर परिणाम करून घेतात. सार्वजनिक ठिकाणी (public places) धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. दंड आकारण्यात येईल.

असे लिहिलेले असतानादेखील तिथेच उभे राहून धूम्रपान करणार्‍यांची संख्या कमी नाही. अनेकवेळा चित्रपटात मध्ये धूम्रपाना करतानाचे दृश्य असेल तेव्हा धूम्रपान आरोग्यास हानिकारक (Harmful to health) असा संदेश एका कोपर्‍यात दिला जातो. परंतू पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. आजकाल तर अनेक ऑनलाईन (online) माध्यमातुन दाखवण्यात येणार्‍या चित्रपट (Movies), वेबसिरीज (webseries) मध्ये तर तशा सुचना ही दिल्या जात नाही. अभ्यासाकांनुसार दृश्य स्वरूपात पाहिलेली कोणतीही गोष्ट डोक्यावर लवकर परिणाम करते.

व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सामाजिक आरोग्यासाठी आजच्या काळात युवक हा निर्व्यसनी असेल तर आपल्यासह इतरांचे भविष्य घडवू शकतो. परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. तसेच अलिकडच्या काळात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. सिगारेट ओढण्यासाठी काही ठिकाणी हब तयार करण्यात आले आहेत.

मानसिक ताणतणाव (mental stress) कमी करण्यासाठी अमली पदार्थाचे सेवन करणे हा रोजच्या जीवनाचा भाग होऊन बसलाय. एकूणच हे वाढते प्रमाण सामाजिक आरोग्य बिघडवू शकतात, अशी चिंता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हे सर्व थांबवणे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. किमान व्यसनाधीनतेच्या बाबती समोरचा खड्यात पडला की मागचा शहाणा होतो असेच व्हावे हिच अपेक्षा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com