क्लस्टर निर्मितीमुळे उद्योगांच्या गुणवत्तेला गती

क्लस्टर निर्मितीमुळे उद्योगांच्या गुणवत्तेला गती

नाशिक | रवींद्र केडिया | Nashik

उद्योगांच्या विकासासाठी (development of industries) राज्य व केंद्र शासनाच्या (central government) माध्यमातून सामाईक सुविधा केंद्र (Common Facility Center) अर्थात क्लस्टर निर्मितीला (Cluster formation) गती देण्यात आली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात उद्योगांच्या गुणवत्ता वाढीला निश्चितच वाव मिळेल.

नाशिक जिल्ह्याची (nashik district) औद्योगिक प्रगती वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. ऑटो व इंजिनिअरिंग क्षेत्रात (Auto and Engineering Sector) अग्रेसर असणारा नाशिकचा (nashik) औद्योगिक विकास इलेक्ट्रिकल हब (Electrical hub) म्हणून देखील पुढे येऊ लागला आहे. यासोबतच द्राक्षांपासून वाइन निर्मिती उद्योगाने (Wine making industries) देशातच नव्हे तर जगात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यामुळे आपोआपच अन्नप्रक्रिया उद्योगालाही (food processing industry) एक सन्मानचे स्थान मिळू लागले आहे.

प्रत्यक्षात पाहिले तर मुंबईच्या (mumbai) स्वयंपाकघरातील महत्त्वाचा आधार हा नाशिकमधून मिळतो. भाजीपाला (vegetables), फळे (Fruits) मोठ्या प्रमाणात नाशिकमधून मुंबईकडे जात असतात. गेल्या काही वर्षांमध्ये केवळ मुंबईच नव्हे तर देशभरात किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात फळे निर्यात केली जात आहेत. त्यामुळे निश्चितच नाशिकच्या विकासाला चौफेर कंगोरे मिळू लागले आहेत.

उत्पादन व त्याची गुणवत्ता याबाबत जागरूकता पाळल्यास स्पर्धेत आपले उत्पादन जास्त ताकदीने उभे राहू शकते, ही संकल्पना लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने क्लस्टर योजना लागू केली. त्या अंतर्गत उद्योगांच्या संघटित माध्यमातून एसपीव्ही स्पेसिअल वेहिकल पर्पज कंपनी (SPV SPECIAL VEHICLE PURPOSE COMPANY) स्थापन केली जाते. या कंपनीसोबत राज्य शासनाचा करार होतो. काही ठिकाणी 90 टक्के शासन आणि 10 टक्के एसपीवीकडून निधी घेतला जातो. आणि या माध्यमातून उद्योगांना लागणार्‍या विविध गुणवत्ता तपासणीच्या यंत्रणा (Quality control system) अथवा विकासासाठीच्या उपाययोजनांचे सामाईक मार्गदर्शन केंद्र उभारण्याची कल्पना पुढे आलेली आहे.

केंद्र सरकारच्या (central government) आयआययुएस (IIUS) या योजनेअंतर्गत नाईसच्या (NICE) पुढाकाराने व नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) पाठबळाने नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (Nashik Engineering Cluster) हे उभे राहिलेले आहे. देशातील सक्षमपणे चालणार्‍या काही मोजक्या क्लस्टरमध्ये नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (Nashik Engineering Cluster) अग्रस्थानी आहे. यानंतर एवढ्या मोठ्या स्तरावर नव्हे पण छोट्या छोट्या क्लस्टरच्या निर्मितीवर शासनाने विशेष लक्ष पुरवले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सुमारे 13 क्लस्टरच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातील दोन क्लस्टर हे उभारणीच्या स्तरावर आलेले आहेत.

त्यात मालेगाव (malegaon) येथील मालेगाव टेक्सटाईल क्लस्टर (Malegaon Textile Cluster) तीन कोटी 58 लाख रुपयांचा तसेच राहुड चांदवड येथील रेणुका भेळभत्ता फूड क्लस्टर तीन कोटी अकरा लाख रुपये हे लवकरच कार्यरत होण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यासोबतच जाणार राईस मिल्क क्लस्टर व विनिता रेझिंग क्लस्टर हे दोन क्लस्टर डीपीएस स्तरावर पोहोचले असून, लवकरच त्यांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

यासोबतच वणी येथे विश्वकर्मा इंजिनिअरिंग वर्क, खेडगाव, दिंडोरी येथे पंढरीनाथ बाबा कुंभार क्लस्टर, टेहरे मालेगाव येथे अश्विनी वूमन गारमेंट क्लस्टर, कळवण येथे फीड मिल्क क्लस्टर, येवला येथे उपरणे क्लस्टर, मालेगाव येथे टेक्स्टाईल प्रिंटिंग क्लस्टर, इगतपुरी येथे दारणा राईस मिल्क क्लस्टर, जऊळके दिंडोरी येथे एफएमसीजी अँड अ‍ॅग्रीकल्चर पॅकेजिंग क्लस्टर, निफाड येथे विनिता रायझिंग,

सटाणा येथे एमएमबी रायझिंग अँड फ्रुट क्लस्टर तसेच वरखेडा दिंडोरी येथे पुष्कराज रायझिंग क्लस्टर या सर्वांनी प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केलेला आहे. आता सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर शासनाला सादर करावयाचा आहे. त्यानंतरच प्रक्रिया अंतिम टप्प्यात येणार आहे. त्यामुळे येणार्‍या काही महिन्यांमध्ये नाशिक विभागात आणखी क्लस्टरचे जाळे उभे राहिल्यास उत्पादनांची गुणवत्ता आणि दर्जा निश्चितच सुधारण्यास मदत होईल.

यातील सुरगाणा येथील कल्पवृक्ष आदिवासी बांबू क्लस्टर हा सुमारे 70 लाखांचा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पुष्कराज रेसिंग क्लस्टर सुमारे 10 कोटी 56 लाख तसेच एफएमसीजी अ‍ॅग्रीकल्चर अँड पॅकिंग क्लस्टर 7 कोटी 70 लाख, मालेगावचा टेक्स्टाईल प्रिंटिंग क्लस्टर गारमेंट क्लस्टर, टेहरे हे प्रकल्प डीपीआरच्या स्थितीत आलेले आहेत.

या सोबतच काही आणखी क्लस्टर प्रस्तावित आहेत. त्याच प्रामुख्याने मालेगाव येथील स्वीट अँड स्पाँजी बेकर्स असोसिएशन, मालेगाव टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, नासिक ओवन सॅक असोसिएशन, नाशिक फूड टेस्टिंग लॅबोरेटरी क्लस्टर, प्रॉडक्ट टेस्टिंग लॅबोरेटरी क्लस्टर, याबाबत प्रस्ताव आले असून लवकरच त्यांचे प्रशिक्षण व पुढील प्रक्रिया देखील गतिमान केल्या जाणार आहेत. त्यामुळेच येणार्‍या काळात नाशिकमध्ये आणखी क्लस्टरचे मोठे जाळे उभे राहून उद्योगांच्या गुणवत्तेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com