Monday, April 29, 2024
HomeUncategorizedमोठी प्रदक्षिणा दुर्लक्षित

मोठी प्रदक्षिणा दुर्लक्षित

त्र्यंबकेश्वर । मोहन देवरे | Trimbakeshwar

श्रावणी (Shravan) सोमवार निमित्त शिवभक्त (Devotees of Shiva) ब्रह्मगिरीला (Brahmagiri) फेरी घालतात , यात लहान आणि मोठ्या प्रदक्षिणा माार्गाचा समावेश आहे. मोठ्या मार्गाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.

- Advertisement -

भाविकांमध्ये जास्त प्रसार नसल्याने मोठ्या प्रदक्षिणेला कोणी जास्त जात नाही. पण घनदाट जंगल (Dense forest), निसर्गाचा आस्वाद घेणे यापासून भाविक वंचित राहत आहे. कारण या भागाचा विकास झालेला नाही. मोठ्या प्रदक्षिणा मार्गात 108 तीर्थ लागतात तसेच प्रसिद्ध हरीहर किल्ल्याला (Harihar Fort) वळसा घालीत ही प्रदक्षिणा होत असल्याने मोठ्या अंतरातून कोणीही जात नाही. ही प्रदक्षिणा जादा अंतराची आहे.

अधिक माहिती नसल्याने आणि मार्गाचा विकास नसल्याने भाविक वंचित राहत असल्याची वस्तूस्थिती आहे. तरी शासनाने या प्रदक्षिणा मार्गाकडे लक्ष घालावे. मोठ्या प्रदक्षिणा मार्गाचा विकास झाला तर, या भागातून पर्यटकांचा (Tourists) ओघ वाढेल, पर्यायाने या भागातील आदिवासींना रोजगाराची संधीही मिळेल.होईल तसेच लहान या प्रदक्षिणा मार्गावर होणारा लोड गर्दी कमी होऊन मोठ्या प्रदक्षिणा मार्ग आणि तीर्थ यांचे दर्शन होईल.

छोट्या प्रदर्शनाला जाणे येण्यासाठी सहा तास लागतात 18 किलोमीटर आहे. तर मोठ्या जाणे येण्यासाठी बारा तास लागतात ही प्रदक्षिणा 35 किलोमीटर आहे. त्र्यंबक गावातून परिसरातून जाणारे भाविक शक्यतो मोठ्या प्रदक्षिणेला जात असतात. विशेष म्हणजे दोन्ही प्रदक्षिणेसाठी वैतरणा नदी (Vaitarna River), गणेश मंदिर येथून रस्ता जातो. लगत डाव्या बाजूने थोडा पुढे जाणारा कच्चा रस्ता मोठ्या प्रदर्शनी मार्गेकडे (धाडोशी) जातो. तर गणपती मंदिर पासून खेटून जाणारा रस्ता लहान (सिमेंटचा) प्रदक्षिणामार्गाकडे जातो. अस्वलीचे नदी म्हणजेच ब्रह्मकमंडळ कुंड लागते जवळ झरवड आहे.

नदी पासून पुढे उतरताना रडकुंडी घाट आहे. काट्या कुट्यातून उतरावे लागते. घाट पार केला की पुढे डोंगर उजव्या बाजूला जवळ वेताळ डोंगर लागतो. हा डोंगर लागला म्हणजे मोठ्या प्रदक्षिणामार्गात योग्य दिशेने वाटचाल चालू आहे हे लक्षात येते. कारण पूर्ण वाटचाली जंगलातून आणि राना वनातून तसेच कधी कच्चा रस्ता तर कधी तर कधी पायवाट्ने होत असते. वेताळ म्हणजे हरिहर किल्ल्याचा पायथा येथे दर्शन घेऊन प्रसिद्ध सरोवर लागते.

मोठ्या मोठ्या प्रदक्षिणामार्गात लागणारे हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले प्रसिद्ध सरोवर सरोवरातील पाणी कायम अतिशय स्वच्छ असते.येथे गणेश मूर्ती आहे. हे सरोवर कलात्मक पद्धतीने दगडी बांधनीचे आहे . या सरोवरात तांब्याचा पैसा टाकल्यास तो तुम्हाला तळाशी गेलेला दिसतो असे जुने लोक सांगतात.इतके स्वच्छ तीर्थ आहे. जूने कुशावर्त म्हणूनही या तीर्थाची ख्याती आहे.

श्रावण मासात भावीक दर्शन साठी जातात. (जवळजवळ कळमुसते रोड लेकुरवाळीचे दर्शन होते). पुढे देवी चालत रस्त्याने रस्ता जव्हार रोड वर आले की गणपत बरीतून त्र्यंबकेश्वर मध्ये परतता येते. काही ठिकाणी कच्चा रस्ता झाला होता काही ठिकाणी पुन्हा तो वाहून गेला काही ठिकाणी डोंगराची अडचण असल्याने रस्ता झालेला नाही. निदान कच्चा रास्ता शासनाने केल्यास मोठ्या प्रमाणावर भाविक या रस्त्याने मोठ्या प्रदक्षिणेस जातील तसेच आसपासच्या अती दुर्गम खेइताना रोजगार उपलब्ध होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या