Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedमी तर विद्यमान, पण भावी नगरसेवक कोण?

मी तर विद्यमान, पण भावी नगरसेवक कोण?

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ या लढाईत पोलिसांना (police) नकळत खबर लागली आणि दोघांच्याही संपर्क कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लागला याला राजकारण (Politics) म्हणावं की राजकीय स्टंट असा प्रश्न नवीन नाशिकरांमध्ये (nashikkar) निर्माण होत आहे.

- Advertisement -

याचं झाला असं की, गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या (social media) एका समूहावर दोन विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यावरून रणसंग्राम पेटले आणि त्यात भर पडली त्या दोघांच्याही समर्थकांची आणि एवढ्यावरच हे रणसंग्राम थांबले नाही तर हे सुरू असताना जर तर चे राजकारण सुरू झाले, आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये अटीतटीचे राजकारण घडण्याची शक्यता वर्तवली जात होती.

अशातच एक ठिणगी पेटली ती म्हणजे एक ज्येेष्ठ नेते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) मुख्य कार्यालयात म्हणजे राजीव गांधी भवन (Rajiv Gandhi Bhavan) येथे आले!! आणि अशातच समोरच्याचा देखील कदाचित गैरसमज झाला असावा आणि त्या गैरसमजामुळे एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने आपले कार्यकर्ते बोलविण्याचे फर्मान सुनावले.

मात्र याच घटनेची कुणकुण पोलीस प्रशासनाला लागली आणि मग खर्‍या अर्थाने सूत्र फिरले!! आणि मग पोलीस बंदोबस्त आणि नागरिकांमध्ये विविध प्रश्नांची चर्चा सुरू झाली. या चर्चेचा शेवट हा शून्य असा झाला मात्र घटना तर घडलीच ?? यावरून नवीन नाशकातील एका अतिसंवेदनशील प्रभागात भविष्यात काय होऊ शकते त्याची शक्यता व तर्क-वितर्क सध्या वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या