Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedWatermelon : लालेलाल-रवाळ कलिंगड कसं निवडाल? सोप्या टिप्स जाणून घ्या...

Watermelon : लालेलाल-रवाळ कलिंगड कसं निवडाल? सोप्या टिप्स जाणून घ्या…

उन्हाळा म्हटला की आपल्याला फळांचा राजा आंबा ज्याप्रमाणे आठवतो त्याचप्रमाणे या काळात येणारे आणखी एक रसदार आणि सगळ्यांना आवडणारे फळ म्हणजे कलिंगड.

लालबुंद आणि रसाळ गोड असे कलिंगड भर उन्हातून आल्यावर आपल्याला दिलासा देते. डोक्यावरच्या तळपत्या उन्हात कलिंगडाचा गारवा आपल्याला काहीसा शांत आणि तृप्त करतो (Summer Special). बाहेर कडक ऊन असताना रवाळ आणि गोड कलिंगड खाल्ले की आपल्यालाही तृप्त झाल्यासारखे वाटते.

- Advertisement -

मनाची आणि शरीराची तहान शमवणारे हे फळ आरोग्यासाठीही बरेच फायदेशीर असते. पण हल्ली बाजारात अनेकदा आपल्याला फळे-भाज्या खरेदी करताना फसवले जाऊ शकते. पैशासाठी वेगवेगळी रासायनिक उत्पादने वापरुन फळे पिकवतात. ही आपल्या आरोग्यासाठी तर घातक असतातच पण खाण्यासाठीही त्यांना विशेष चव नसते. आता कलिंगड खरेदी करताना ते आतून लाल, रसाळ, गोड असेल की नाही हे आपण सांगू शकत नाही (How to identify good quality watermelon). पण आपण इतके पैसे देऊन खरेदी करत असलेले कलिंगड चांगले आहे की नाही हे बाहेरुन कसे ओळखायचे ते पाहूया….

जर कलिंगड विकत घेताना गोड आहे की नाही ते पाहायचे असेल तर हातात धरून त्यावर मारून पाहा. कलिंगडातून येणाऱ्या आवाजाद्वारे तुम्ही ओळखू शकता की कलिंगड कच्चे आहे की पिकलेले आहे. जर कलिंगडातून टप टप असा आवाज येत असेल तर ते छान पिकलेलं आहे. कलिंगडावर हात मारल्यानंतर जर जोरात आवाज होत असेल तर ते पिकलेलं असतं आणि आवाज कमी येत असेल तर ते कच्चं असू शकतं.

कलिंगडात जर जाड हिरव्या लाईन्स असतील आणि मध्ये पातळ हिरव्या लाईन्स असतील तर ते कलिंगड गोड असू शकते. अधिक डार्क रंगाचे कलिंगड गोड असतात. कलिंगडाचे वजन पाहून कलिंगड गोड आहे की नाही ते आपण ओळखू शकता. अनेकदा कलिंगड आकारानं मोठे असतात पण वर उचलल्यानंतर हलके असतात.

कलिंगडाच्या आकारानुसार वजन जास्त असेल तर ते कलिंगड खरेदी करा असे कलिंगड गोड असतात. कलिंगडाच्या वर हलक्या पिवळ्या रंगाची लाईन असते. हे फळ जमिनीवर लागलेले असते. या पिवळ्या भागाचा रंग जितका गडद असेल तितकंच ते गोड असतं. हलका पिवळा किंवा पांढरा रंग असलेलं कलिंगड कच्चं असतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या