नाशिकच्या पर्यटन व्यवसायास बुस्टर डोस मिळण्याची आशा

नाशिकच्या पर्यटन व्यवसायास बुस्टर डोस मिळण्याची आशा
Trupti Paradkar

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

धार्मिक पर्यटनासोबतच (Religious tourism) इतर पर्यटनासाठी (tourism) नाशिकला (nashik) पर्यटन जिल्हा बनवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार, तसेच साहसी, धार्मिक व आरोग्य पर्यटनाच्या विकासाबाबत लवकरच बैठक घेणार, पर्यटन स्थळांची मालकी ही जलसंपदा, वनविभाग (Forest Department), पुरातत्व विभाग (Department of Archeology), स्थानिक स्वराज्य संस्था (Local self-government bodies), धार्मिक ट्रस्ट यांची असते.

त्यामुळे आंतर विभाग समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘पर्यटन विकास प्राधिकरण’ (Tourism Development Authority) निर्माण करण्याच्या दृष्टीने विचार करण्याच्या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांच्या निर्णयामुळे नाशिकच्या पर्यटन व्यवसायास (tourism business of Nashik) बुस्टर डोस मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिक विभागातील पर्यटनाचा आढावा घेऊन पर्यटन जिल्हा बनविण्याचा दृष्टीने निर्णय घेतल्याने पर्यटन उद्योगातील प्रत्येक जण उत्साहीत झाला आहे.

शहर परीसरात पांडवलेणी, चामरलेणी, रामशेज, अंजनेरी, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर ,सोमेश्वर, भक्तीधाम , मुक्तीधाम, तपोवन, सप्तशृंंंग वणी गड, चांदवडची रेणुुकादेवी, परिसरातील ऐतिहसिक किल्ले, नांदूरमध्यमेश्वरचे पक्षी अभयारण्य, अशा निसर्गाने नटलेल्या व विविध वन्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा वास्तव्य असलेले ठिकाण आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. गेली दोन वर्षे करोनामुळे तेथे जाताही आले नाही. आता ती खुले होण्याची गरज आहे.

द्राक्षबागांनी बहरलेल्या निफाड तालुक्यातील (niphad taluka) नांदुरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar) येथे विविध जातींचे परदेशी व स्थानिक पक्षी दिसतात. पक्षीनिरीक्षणासाठी वन विभागाने येथे निरीक्षण मनोरे उभारले आहेत. या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटक आता वळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरी पर्यटकांची संख्याही वाढली आहे.

निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या इगतपुरीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विपश्यना केंद्र (Vipassana Center), भंडारदरा धरण (bhandardara Dam), धुक्यांच्या दुलईत हरवणारा कसारा घाट, कावनई व टाकेद सारखी धार्मिक स्थळे महत्त्वपूर्ण आहेत. रतनगड, साल्हेर-मुल्हेर, ओंधा-पट्टा, धोडप, कौळाणे, मार्कंडेय, रामशेज व अनकाई असे सह्याद्रीच्या रांगेतील अनेक गड-किल्ले पर्यटकांना सतत खुणावत आहेत.त्यांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे.

धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून अधिक नावारूपाला येण्याची आज गरज आहे. त्र्यंबकेश्वर नाशिकचे रामकुंड येथे भाविक येतच असले तरी आणखी अनेक धार्मिक ठिकाणे नाशकात चोहोबाजुने आहेत; त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्याची जाहिरात होत नाही. हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी दुर्लक्षित आहे. समर्थ रामदास स्वामी मठ आगर टाकळी, इच्छामणी गणपती, एकमुखी दत्तमंदिर, कालिका मंदिर, देवळाली कॅम्पजवळील खंडोबाची टेकडी, चामर लेणी, विल्होळीचे जैन मंदिर, नवश्या गणपती या धार्मिक पर्यटनस्थळांकडे पर्यटकाना आकर्षित करण्याची गरज आहे.

नाशिक दर्शन बस सुरु केल्यास नाशिक, त्रंबक, वणी गड,शिर्डीपर्यंत चांगली सोय होईल. फक्त यंत्रणा चार्ज करण्याची गरज आहे. नाशिकला पर्यटन जिल्हा बनवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न, साहसी, धार्मिक व आरोग्य पर्यटनाच्या विकासाबाबत लवकरच बैठक घेण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले.आता स्थानिक अधिकारी व पदाधिकार्‍यांनी पर्यटन जिल्हा झाल्याशिवाय स्वस्थ न बसल्यास कृषी, साहसी, इको, वायनरी, वैद्यकीय, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनाचे स्वप्न साकार होणार नाही. तर ठिकाणी लावण्यात येऊन काही नवीन झाडे लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com