Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपावित्र्य जपणारा सण - रमजान ईद

पावित्र्य जपणारा सण – रमजान ईद

रमजान पूर्वीच्या शाबान महिन्यात उत्कृष्ट रात्र शब-ए-बारात ही संपूर्ण भारतात उत्साहात साजरी करुन रात्री मुस्लीम बांधव रात्रभर जागरण करुन इबादत (प्रार्थना) करतात. या रात्रीपासूनच रमजान महिन्याची चाहूल सुरू होते. इस्लाम धर्मातील सर्वोत्कृष्ट पवित्र रमजान महिना सुरू होत असल्याची चाहूल लागताच मुस्लीम बांधव या महिन्याच्या स्वागतासाठी सज्ज होतात व शाबान महिना संपल्या बरोबर रमजान महिन्याची चंद्रकोर आकाशात प्रकट झाल्यानंतर याच रात्रीपासून तरावीहच्या नमाजची सुरुवात होऊन पवित्र रमजानचे रोजे प्रारंभ होतात.

या पूर्ण महिन्याचे रोजे अनिवार्य असल्याने मुस्लीम बांधव रोजे ठेवतात. रमजान महिन्यात महिनाभर ज्यांनी रोज ठेवले, नमाज अदा केली, जकातही दिली, तरवीहमध्ये पूर्ण कुरान शरीफ ऐकले, महिनाभर कुरानची खूप तिलावत (पठण) केले आशा सर्व मुस्लीम बंधू-भगिनींसाठी आजचा दिवस मोठ्या उत्साहाचा व आनंदाचा आहे. मात्र, मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीसुद्धा लॉकडाऊन असल्यामुळे मुस्लीम धर्मगुरूंनी केलेल्या आवाहनाला तसेच प्रशासनाने धार्मिक बाबींवरसुद्धा लावून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करीत मुस्लीम बांधव ईद साजरी करणार आहे. रमजान ईद या सणाला इस्लाम धर्मात फारच महत्त्व आहे.

- Advertisement -

या ईदचे खरेखुरे महत्त्व ईदची नमाज अदा करणे व फित्रचे दान करणे यातच आहे. पवित्र रमजान महिना संपल्याबरोबर शव्वाल महिन्याची चंद्रकोर आकाशात प्रकट झाल्यानंतर संपूर्ण रमजान महिन्याचे रोजे आणि तरावीहच्या नमाजची समाप्ती होते आणि या चंद्रदर्शनानंतर लगेच दुसरे दिवशी ईद फूल फित्र (रमजान ईद) साजरी होणार असल्याचे जाहीर करण्यात येते. हजरत मोहम्मद पैगंबर (स)यांनी आपल्या अनुयायांना आदेश दिले आहेत की, ईदचा चंद्र दिसल्याबरोबर सर्वांनी हात उंचावून सर्वश्रेष्ठ अल्लाहजवळ प्रार्थना करावी की, ‘हे अल्लाह; तू या चंद्राला आमच्याकरिता शांती आणि इमानचा (श्रद्धेचा) चंद्र बनव. माझा पालनकर्ता अल्लाह आहे आणि या चंद्राचा पालनकर्ताही अल्लाहच आहे.’ हदीसात ईद-उल- फित्रच्या रात्रहला लैलतूल जजा म्हणजे बक्षिसाची रात्र म्हणून संबोधले जाते.

एखाद्या व्यक्तीने चांगले काम केल्यावर मिळणार्‍या बक्षिसाचे दिवस तो शोधत असतो किंवा एखाद्या मजुराने मालकाकडे कष्ट करून काम केल्यावर मिळणार्‍या मोबदल्याच्या शोधात तो असतो.

त्याचप्रमाणे संपूर्ण रमजानच्या महिन्यात रोजे (उपवास) करुन दानधर्म आणि तरावीहच्या नमाजमध्ये जे कष्ट केले गेले; त्या कष्टाचा मोबदला किंवा बक्षीस मिळण्याची ही रात्र आहे. अल्लाह आपल्या फरिश्त्यांना (देवदूतांना) विचारतो, ज्या मजुराने आपले काम उत्तमप्रकारे केले, त्याचा मोबदला काय आहे? फरिश्ते (देवदूत) उत्तर दाखल म्हणतात, हे पालनकर्त्या त्याचा मोबदला असा आहे की, त्यांना भरपूर बक्षीस प्रदान केले पाहिजे. त्यावर सर्वश्रेष्ठ अल्लाहची घोषणा होते की, हे फरिश्ते (देवदूतांनो) तुम्ही या गोष्टीची साक्षी राहा. या लोकांनी रमजान महिन्यात रोजे आणि नमाज अदा केल्याबद्दल मी त्यांना माझी प्रसन्नता आणि माझी क्षमा प्रदान करित आहे.

सर्वांनी सुख-वस्तुंच्या मोबदल्यात ( जकात) ठरावीक रक्कम तर स्त्री पुरुषांनी स्वतःच्या जिवाबद्दल (फित्र) ठरावीक प्रमाणात धान्य किंवा त्याची किंमत अदा करावी. हे दान कुटुंब प्रमुख कुटुंबातील सर्व सदस्यांच्या वतीने ईदच्या नमाजपूर्वी अदा करतो. ईदची नमाज अदा करण्यापूर्वी हे कर्तव्य संगण्यात आले आहे

. इस्लाममध्ये रमजान ईद साजरी कर करण्याची संकल्पना अशी आहे की, श्रीमंत लोक जोपर्यंत गरीबांचा हक्क अदा करत नाही; तोपर्यंत श्रीमंतांची ईद खर्‍या अर्थाने पूर्ण होत नाही. पैगंबरांनी असेही म्हटले आहे की, ज्याने फित्रचे दान दिले नसेल त्याला आमच्या ईदगाहमध्ये ईदची नमाज अदा करण्याचा मुळीच अधिकार नाही. या दिवशी असंख्य मुस्लीम बांधव नवीन पोशाख परिधान करुन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात ईद-उल-फित्र रमजान ईदची नमाज अदा करतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या