Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसंगीत मैफिलीतून स्वर्गीय सूर प्रकट व्हावे

संगीत मैफिलीतून स्वर्गीय सूर प्रकट व्हावे

: दीपक क्षीरसागर, बडोदा

करोनाने निर्माण केलेल्या या काळाने आम्हाला आमच्या मूळ वारशात, परंपरेत डोकावून पाहण्याची, संगीताला नवजीवन देण्याची संधी दिली आहे.

- Advertisement -

पूर्वीच्या मैफिली, उच्च अभिरुचिसंपन्न बैठका पुन्हा एकदा अधिक जोमाने सुरु व्हाव्यात. पुन्हा एकदा मैफिलीतून स्वर्गीय संगीताचे स्वर्गीय सूर प्रकट व्हावेत. शहाणपण आणि ज्ञान यांचा संगम उचंबळूनयावा हीच यानिमित्ताने अपेक्षा केली तर त्यात गैर काय?

जिथे संगीत अमूल्यचहोते आणि संगीताचाआत्मीय अनुभव सतत मिळत असे. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये बदल झाल्यानंतर संगीत कुठेतरी न सुटणारे कोडे बनून बसले. 1990 ते 2000 च्या या काळाने सुवर्णमध्य गाठायचा प्रयत्न केला. मोठे कॉर्पोरेट कार्यक्रम ते पारंपरिक बैठका आणि काही कलाकारांचीसंगीतावरीलहुकुमीसत्ता पण बघावयास मिळाली. आज 2019-20 मध्ये शुद्ध शास्त्रीय संगीत आणि त्याचा शास्त्रोक्त पारंपरिकपण क्वचित बघायला मिळते.

मात्र या विविध अंगानीबहरलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये ते उठून दिसते. जसे नेल्सन मंडेला म्हणाले होते, चांगुलपणाची छोटीशी झलक देखील पूर्ण जगाला तारून न्यायला समर्थ असते. असच काहीसं संगीताच्याबाबतीतही घडलं. आणि परत एकदा या संगीताकडेशून्यातून नवीन कल्पना, नवीन विचार घेऊन बघण्याची संधी मिळाली. असे म्हंटले जाते की, प्रत्येकजण मोठा होण्यास सक्षम असतो.

पण हे तेव्हाच शक्य होते जेव्हा तो पूर्ण क्षमतेनेप्रयत्न करतो. आपल्यालाही सध्याच्या परिस्तिथीचा फायदा घेऊन नवीन विचार करण्याची संधी मिळाली आहे. तिचे आपण सोने करायला हवे.संगीत क्षेत्राचा विचार करताना पुढील 20-25 वर्षांबद्दलबोलणे अवघड आहे.

कारण आताची परिस्थती गेल्या काही महिन्यांपूर्वीच निर्माण झाली. त्यामुळे भविष्यात संगीत क्षेत्र कसे वळण घेईल याचा विचार करणे मोठी मजेशीर गोष्ट आहे.कॉन्सर्ट आणि मैफिलीत सध्या मोठा बदल झाला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि अशा इतर सोशल प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन कॉन्सर्ट सुरू झाल्या आहेत. पण या फॉर्ममध्येकलाकार आणि श्रोत्यांचा थेट संवाद आणि भेट नसते. त्यामुळे कलाकाराला आपली कला सादर केल्याचे समाधान मिळत नाही.

असे समाधान हीच कलाकाराचीप्रेरणा असतो. तीच यात मिसींग आहे असे मला वाटते. हे एक मोठे आव्हान कलाकारांसमोर आहे. सद्यस्थितीत अशा पद्धतीने आयोजित केल्या जाणार्‍या कॉन्सर्ट आरोग्यदृष्ट्या सेफ आहेत. पण यामध्ये कलाकाराच्याकल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि प्रगल्भतेला पूर्ण वाव मिळतो का हा खरा प्रश्न आहे.

दुसरे म्हणजे, संगीत क्षेत्रात जी नवीन पिढी उदयाला येते आहे त्या पिढीला आपला संगीताचा वारसा आणि परंपरा कशा माहिती होतील? सोशल प्लँटफॉर्ममुळे यापिढीला खूप लवकर एक्सपोजर मिळते. त्यामुळे त्यांचा रियाजथांबेल का? त्यांच्यातील प्रगल्भतेचा, सर्जनशीलतेचाविकास खुंटेल का? प्रेक्षक जेव्हा कलाकाराला, त्याच्या कलेला स्वीकारतात तेव्हाच एखादी व्यक्ती कलाकार म्हणून सिद्ध होते. त्याची ओळख निर्माण होते. याचा या पिढीला विसर पडत आहे का? समुद्रात वरवर पोहणारे मासे समुद्राचे पाणी उथळ बनवतात.

सोशल प्लॅटफॉर्मवरील स्वउयंघोषीत प्रतिभा कलेचा खरा विकास खुंटवेल का?जगात सध्यातरी नसर्गिक भावभावनांचाकल्लोळ हा फक्त डान्सकोरिओग्राफीचा विषय झाला काय? दैवी नाट्यकलाफक्त नाटक, सिनेमापुरतीउरावी? या सगळ्या गदारोळात संगीत म्हणजे केवळ उत्पन्न किंवा अर्थार्जन उरले की काय?संगीत हे फक्त करमणूक आणि मदतनिधी गोळा करण्यापुरते मर्यादित राहू नये.

करोनाने निर्माण केलेल्या या काळाने आम्हाला आमच्या मूळ वारशात, परंपरेत डोकावून पाहण्याची, संगीताला नवजीवन देण्याची संधी दिली आहे. पूर्वीच्या मैफिली, उच्च अभिरुचिसंपन्न बैठका पुन्हा एकदा अधिक जोमाने सुरु व्हाव्यात. पुन्हा एकदा मैफिलीतून स्वर्गीय संगीताचे स्वर्गीय सूर प्रकट व्हावेत.

शहाणपण आणि ज्ञान यांचा संगम उचंबळूनयावा हीच यानिमित्ताने अपेक्षा केली तर त्यात गैर काय? हे सगळे मनोहारी पण वास्तवतेशी एकमेळसाधणारेअसल्यास उत्तमच. उत्तम, दर्दी श्रोते व प्रज्ञावंत कलाकार हेच वास्तवात मोलाचे असतील. संगीत हे महासागरासारखे असते. संगीत साधना करणार्‍या संगीत साधकांची तुलना त्या संगीतरूपी महासागराच्या अथांग तळाचाधांडोळा घेणार्‍याजलचरां प्रमाणे असते. त्या बरोबरच दर्दी, सुजाणश्रोते हे त्या महासागराशी एकरूप होणारे असतील तर काय आनंद वर्णावा?

- Advertisment -

ताज्या बातम्या