नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे

नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे

आरोग्यासाठी नारळ पाणी (coconut water) अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक आढळतात. चला तर याचे फायदे पाहुयात...

250 मिली नारळाच्या पाण्यात पौष्टिक सामग्री अशी :

कार्ब - 9 ग्रॅम

फायबर - 3 ग्रॅम

प्रथिने - 2 ग्रॅम

आरडीआय व्हिटॅमिन सी - 10 टक्के

आरडीआय मॅग्नेशियम - 15 टक्के

आरडीआय मॅंगनीज -17 टक्के

आरडीआय सोडियम - 11 टक्के

आरडीआय कॅल्शियम - 6 टक्के

● नारळ पाण्याचे सेवन शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवते. हे पिण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.

● पोट्यातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांमध्येही नारळपाण्यामुळे आराम मिळतो.

● हे आपल्या शरीरास ऊर्जा देते. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्यांतून आराम मिळतो.

● या पाण्यात व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे पोषक असतात. यामुळे तुमचे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

● हे पाणी चेहऱ्यावरील मुरुम काढून टाकण्यास देखील मदत करते. आपण फेसपॅक म्हणून देखील याचा वापर करू शकता.

● उन्हाळ्यात, टॅनिंग काढून टाकण्यासाठी नारळाच्या पाण्याने आपला चेहरा धुवू शकता. यामुळे टॅनिंग कमी होते आणि चेहरा थंड होतो.

● हे पाणी पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो.

● नारळाचे पाणी पिण्यासाठी सकाळ अधिक चांगली मानली जाते. कारण यावेळी आपले शरीर आपले सर्व पोषक द्रव्य शोषून घेते.

क्वोरा (Quora) या प्रश्‍न-उत्तरांच्या संकेतस्थळावर एका प्रश्‍नाला उत्तर देताना प्रोफेसर शिवराम बाबर यांनी ही माहिती दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com