औद्योगिकदृष्ट्या नाशिक प्रगत झाले का?

औद्योगिकदृष्ट्या नाशिक प्रगत झाले का?

नाशिक | रवींद्र केडिया | Nashik

नाशिक शहराची (nashik city) ओळख मंत्रभूमी ते यंत्रभूमी म्हणून आपण नेहमी करुन देत आलो आहोत. गेल्या वीस ते तीस वर्षांत यात फार मोठा बदल झाल्याचे दिसून येत नाही.

गेल्या दहा वर्षात उद्योगांच्या विकासासाठी विविधांगानी प्रयत्न झाले. त्यात मोठमोठे प्रकल्प (projects) नाशिकला (nashik) दिल्याच्या घोषणा झाल्या, प्रत्यक्षात या प्रकल्पांचा विकास अथवा त्यांची उभारणी अद्यापही प्राथमिक स्थरावर असल्याने केवळ विकासाच्या वल्गना तर नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नाशिक शहरातील औद्योगिक क्षेत्रात (industrial sector) उभारण्यात आलेल्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल (Automobile), इंजिनिअरिंग व इलेक्ट्रीकल उद्योगाचा (Engineering and electrical industries) समावेश आहे.

यातील ऑटोमाबाईल व इंजिनिअरिंग क्षेत्राला मदतनिस ठरणारा ‘नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर’ (Nashik Engineering Cluster) हा प्रकल्प देशभरात नावाजला जात आहे. त्या पाठोपाठ इलेक्ट्रीकल उद्योगांना उपयुक्त असलेली व 100 एकराच्या भूखंडावर उभी राहणारी ‘सिपीआरआय’ (CPRI) टेस्टींग लॅब (Testing Lab) अद्याप ढेपाळतच चाललेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सूरू होणार अशी चर्चा होती. मात्र अद्याप यंत्रणा उभारणीच्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक डिफेन्स हबचा (Nashik Defense Hub) शुभारंभ मोंया गाजावोजात एचएएलच्या प्रांगणात करण्यात आला. त्याठिकाणी एकएएलची यंत्रणाही पाठीशी राहणार होती. मात्र या प्रकल्पासाठीचा डिपाआर अद्याप चाचपडतानाच दिसून येत आहे. मध्यंतरी केंद्रीय समितीने याबाबत फेरविचार करण्याची मानसिकताही बोलून दाखविली होती. त्यामुळे भारतीय सूरक्षा साधनांचया (Indian security equipment) निर्मीतीत भारतीय बनावटीचे सूटे भाग निर्माण करण्यासोठीच्या संधीपासून नाशिक मुकते की काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

रेल्वेच्या जाक निमिर्तीचा कारकाना नाशिक रोड (nashik road) येथे उभारण्यात येणार होता. प्रत्यक्षात चाक निर्मीतीच्या कारखान्यातून रोजगार निर्मितीची संधी (Opportunity for job creation) कमी होती. याठिकाणी कोच निर्मिीतीचा कारखाना होणे आपेक्षित होते. असो. मात्र अद्याप हा चाक निर्मितीच्या कारखान्याच्या उभारणीतही कामदोपत्री व्यवहार सूरू असले तरी प्रत्यक्षात उभारणीत फारशी प्रगती झालेली नसल्याचे बोलले जात आहे.

मालेगावचा (malegaon) पैठणी क्लस्टर (Paithani cluster) उभारणीसाठी भुजबळांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या मागिल पंचवार्षिकच्या कार्यकाळात इमारतही बांधून तयार झालेली होती. मात्र यासाठी तयार करण्यात आलेल्या स्पेशल परपज व्हेईकलच्या पदाधिकार्यांच्या हाराकिरीमुळे या प्रकल्पाचा डीटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर)च दाखल केला गेला नसल्याने मागील पाच ते सहा वर्षांपासून त्याची प्रतिक्षाच असल्याचे दिसून येत आहे.

उद्योग विकासाला चालना

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गेल्या तीन दशकांनंतर पहिल्यांदा गती मिळाल्याचे दिसून येत असून, दिंडोरी आक्राळे येथे दोन मोठ्या उद्योग गूंतवणूक करण्यास सूरूवात केल्याने उद्योग क्षेत्राला गती मिळण्यास मदत होणार आहे. भिवंडीला पॉवर लूमचे मोठे जाळे आहे. हे लक्षात घेता मालेगाव तालुक्यातील अंजन परिसरात मोठ्या प्रमाणात भूमिअधिग्रहण करुन या ठिकाणी टेक्टाईल पार्कची घोषणा करण्यात आली आहे.

या ठिकाणाला डी. प्लसचा दर्जा दिलेला असल्याने उद्योगांना याठिकाणी विशेष सवलत पॅकेजही मिळणार आहे. त्यामुळे उद्योगांच्या विकासाला चालना मिळणे शक्य होणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आयटी पार्क व लॉजेस्टीक पार्क उभारणीला गती देण्यात आली आहे. या माध्यमातून नाशिकच्या विकासाठी खर्‍या अर्थाने गती मिळण्यास मदत होणार आहे..

नव्या योजनांची घोषणा

दिंडोरी तालूका हा तसा आदिवासी बहुल आहे. या भागातील आदिवासींच्या पुनरुत्थानासाठी या ठिकाणी आदिवासी इंडस्ट्रीयल क्लस्टर उभारण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या अर्थसंकल्पात तरतूद केलेली असल्याचे स्पष्ट केले. यामुळे याभागातील टॉमेटो, कांदा, तांदूळ, नागली, खुरासणी, वरई, द्राक्ष या उत्पादनांवर प्रक्रिया उद्यागांना गती मिळेल. व या भागातील शेती उत्पादनांना योग्य दर मिळणे रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करणे शक्य होणार आहे.

यासाठी 75 एकरांचे भूखंड व 25 कोटीची तरतूद करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.येवल्यात विणकर मोठ्या संख्यने असल्याने त्यांचे प्रश्नही गंभीर आहेत. त्यांच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी येवल्यातील टेक्टाईल उद्योगात काम करणार्‍या ज्येष्ठ विणकरांंसाठी पेन्शन योजना, यांच्या पाल्यांसाठी शिक्षण योजना, तसेच विणकरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी टेक्टाईल क्लस्टर उभा करण्याबाबत चाचपणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com