हरितग्राम शिरसाठे

jalgaon-digital
4 Min Read

इगतपुरी । वाल्मिक गवांदे | Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील (igatpuri taluka) शिरसाठे (shirsathe) हे 1 हजार 280 पेक्षा अधिक लोकसंख्या व 255 घरे असलेले पर्यावरणपूरक गांव (Eco-friendly village) आहे. या गावाला आता वृक्ष लागवडीमुळे (Tree planting) हरितग्राम (Haritgram) म्हणूनही ओळख मिळत आहे.

गावशिवारात गायरान असलेली जमीन किमान 50 वर्षापासून गुरे चराईसाठी वापरण्यात येत होती. या जमिनीमध्ये आजूबाजूचे शेतकरी (farmers) अतिक्रमण करत होते. अशा ओसाड जमिनीकडे कोणत्याही गावकर्‍यांचे लक्ष नव्हते. महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामसभा (gramsabha) घेऊन ठराव केला. आपल्या गावामध्ये गायरान जमीन ओसाड पडून आहे. आजपर्यंत त्या जमिनींवर कुठल्याही प्रकारचे एकही झाड उगलेले नाही, ह्या जमिनीवर वृक्ष लागवड (tree plantation) केल्यास त्याचा हरित आच्छादनासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो.

त्या दृष्टीने उपस्थित सभासदांनी ग्रामपंचायतीचा गायरान गट नंबर 475 मधील 10 एकर हे वृक्ष लागवडीसाठी निवडले. तेथे देशी प्रजातीचे व इतर प्रजातीचे वृक्ष लागवड (tree plantation) करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानुसार ठरावाची अंमलबजावणी करून गट नं. 475 मध्ये गावाचे हरित आच्छादान वाढवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने (Maharashtra Rural Employment Guarantee Scheme) अंतर्गत 8 हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

केशर आंबा 1 हजार 300 वृक्ष, संकरित सीताफळ 1 हजार 700, जांभूळ 550, साग 3 हजार, इतर प्रजाती 1 हजार 450 एवढी झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले. एप्रिल व मे महिन्यामध्ये ह्या ठिकाणी लाईन आऊट करण्यात येऊन गावातील उपलब्ध मजूर व महिला बचत गटातील मजूर यांच्यामार्फत वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खड्ड्यामध्ये शेणखत टाकून खड्डे बुजवण्यात आले. यानुसार जून महिन्याच्या दुसर्‍या पावसामध्ये वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले.

तत्पूर्वी शासकीय नर्सरीतून रोपे खरेदी करण्याबाबत शासन निर्णयानुसार शासकीय नर्सरीमध्ये (Government Nursery) रोपे (plants) उपलब्ध नसल्यामुळे देशी प्रजातीचे वृक्ष खरेदी करण्यासाठी शासनमान्य खाजगी नर्सरीतून रोपे खरेदी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 8 हजार झाडांची लागवड करण्याचे काम 17 जून 2021 ह्यादिवशी सुरू करण्यात आले.

ह्या कामासाठी नरेगा उपायुक्त, इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड (Group Development Officer of Igatpuri Dr. Lata Gaikwad), तत्कालीन सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी संजय पवार, कृषी अधिकारी मोगल, गांगोडे कृषी विस्ताराधिकारी देशमुख ग्रारोहयो कक्ष इगतपुरीच्या सीमा सोनवणे, विजय चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

स्थानिक मजुरांमार्फत झाडांची लागवड (tree plantation) केलेल्या क्षेत्राचे संरक्षण व संगोपन (Protection and care) कसे करायचे याबाबत ग्रामपंचायतीने मासिक सभा घेऊन निर्णय घेतला. ह्या क्षेत्राला नैसर्गिक झाडांचे काटेरी कुंपण करण्यात यावे. काटेरी कुंपण (Barbed wire fence) हे योजनेच्या निकषांमध्ये बसत आहे, परंतु काटेरी कुंपण हे जास्त दिवस टिकत नसल्याने झाडांचे देखभाल दुरुस्ती व संगोपन जास्त दिवस होऊ शकत नाही. म्हणून सरपंच गोकुळ सदगीर यांनी ग्रामपंचायत सदस्य यांच्या लोकवर्गणीतून काटेरी कुंपण लावून झाडांचे संरक्षण व देखभालीसाठी कुंपणाचे काम पूर्ण केले.

नोव्हेंबर महिन्यापासून झाडांना पाण्याची आवश्यकता असते. म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ह्या गटांमध्ये सामुदायिक विहिरीचे काम मंजूर करण्यात आले. विहिरीला लागलेल्या पाण्याचा उपयोग फक्त वृक्ष संवर्धनासाठी असून झाडांची वाढ अतिशय चांगली आहे. करण्यात आलेल्या वृक्षलागवडीच्या कामाचे समाधान हे सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत कमिटी व कर्मचारी यांना मिळत आहे.

शिरसाठे सप्रेवाडी रस्त्याच्या दुतर्फा 1 हजार शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ह्या झाडांचे संगोपन करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाठे येथील एका विद्यार्थ्याला एक झाड दत्तक देण्यात आले. संबंधित विद्यार्थी दररोज दत्तक झाडांना पाणी टाकून संगोपन करत आहेत. वृक्ष लागवडीचे शिलेदार ग्रामसेवक हनुमान दराडे, सरपंच गोकुळ सदगीर, उपसरपंच शीतल विलास चंदगीर,

ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर सोपनर, रमेश शिद, तारा गणेश तेलंग, अलकाबाई दोंदे, गणेश तेलंग, विलास चंदगीर, रामदास सदगीर, भावराव गांगुर्डे, ग्राम रोजगारसेवक भास्कर सदगीर, पाणी पुरवठा कर्मचारी संपत सप्रे, संगणक ऑपरेटर रामचंद्र म्हसणे, राखणदार नामदेव सदगीर, काशिनाथ सोपनर, सर्व ग्रामस्थ आणि शिक्षक आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *