Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपावसाने हादरली द्राक्षपंढरी

पावसाने हादरली द्राक्षपंढरी

सिन्नर | आनंदा जाधव | Sinnar

तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका कांदा (onion), टोमॅटो (tomato), भाजीपालासह (vegetables) द्राक्षपिकाला बसला असून मागील दोन वर्ष करोनाचे (corona) सावटामुळे शेतमाल बेभावात विक्री करावा लागला तर आता बाजारपेठासह दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतांनाच नुकतीच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षपंढरी हादरली आहे.

- Advertisement -

निफाड तालुक्यात (niphad taluka) नगदी पिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. परिणामी तालुक्यात 14 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा तर 12 हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांदा (Summer onion) पीक घेतले जाते. तसेच 8 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाचे उत्पादन घेतले जात असून मकासाठी 12 हजार हेक्टर तर सोयाबीन पिकासाठी 15 हजार हेक्टर क्षेत्राचा वापर केला जात असून उर्वरित क्षेत्रावर टोमॅटो, भाजीपाला, भुईमुंग, कपाशी, तुर, मुग, उडीद, गहू, हरभरा आदी पीके घेतली जातात.

तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर द्राक्षबागा उभ्या असल्याने व वर्षातून एकदाच येणार्‍या या पिकासाठी शेतकरी (farmer) मोठी मेहनत घेतो. त्यासाठी बाहेरील पेठ, सुरगाणा (surgana), सापुतारा (saputara) भागातून मोठ्या प्रमाणात मजूर आणले जातात. निफाडचा शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष पिकविण्याला महत्व देत असल्याने येथील द्राक्षाच्या चवीने भल्याभल्यांना भुरळ घातली आहे.

मागील दोन वर्ष करोना प्रादूर्भावामुळे द्राक्ष बेभावात विकावी लागल्याने द्राक्ष पिकावर झालेला खर्च फिटला नाही. परिणामी आता करोना प्रादूर्भाव कमी झाल्याने व दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याने यावर्षी द्राक्ष पिकाला बर्‍यापैकी भाव मिळेल ही अपेक्षा ठेवत शेतकर्‍यांनी द्राक्षपिकाचे नियोजन करीत मोठा खर्च करीत मशागत केली.

मात्र आता या द्राक्षबागांना फळधारणा होताच तालुक्यात अवकाळी पाऊस बरसू लागला. यावर्षी तर परतीच्या पावसाने मोठा हाहाकार माजविला होता. मात्र त्यावर मात करीत शेतकर्‍यांनी उशिरा द्राक्षबागांची छाटणी केली. परिणामी यावर्षी द्राक्ष हंगाम (Grape season) उशिरा परंतु चांगला होईल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र हवामान खात्याने (Weather department) वर्तविल्या प्रमाणे गत दोन दिवसापासून तालुक्यात बेमोसमी पाऊस (Unseasonal rain) बरसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे द्राक्षबागांवर डावणीचा प्रादूर्भाव वाढणार असून द्राक्षमण्यांची गळ याबरोबरच घडकूज होण्याचा धोका वाढला आहे. तर ज्या द्राक्षमण्यांमध्ये पाणी उतरले अशा मण्यांना तडे जाणार आहे. परिणामी वर्षभर मशागत करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले द्राक्षपीक अवकाळी पावसामुळे वाया जाण्याची शक्यता सर्वाधिक असून आतापर्यंत द्राक्षबागांवर लाखो रुपये खर्च झाल्याने हा खर्च वाया जाणार आहे.

द्राक्षप्रमाणे अवकाळी पावसामुळे कांदा पिकावर मावा, करपा रोगांचा प्रादूर्भाव (Outbreaks of diseases) वाढण्याची शक्यता अधिक असून पावसामुळे कांदा पात आडवी पडल्याने कांदा पिकाची वाढ खुंटली आहे. तर ज्या शेतकर्‍यांनी उन्हाळ कांदा बियाणे टाकली अशा तयार होवू लागलेल्या रोपांना या पावसाचा फटका बसला आहे. परिणामी रोपांची मर होण्याचे प्रमाण वाढले आहे.

कांदा रोपाप्रमाणेच अवकाळीचा तडाखा टोमॅटो पिकाला बसला असून टोमॅटो पिकावर रोगांचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. प्रारंभी अत्यल्प बाजारभाव तर आता बर्‍यापैकी बाजारभाव मिळत असतांनाच अवकाळीने टोमॅटो पिकावर विरजण टाकले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादनात घट होण्याची शक्यता असून मिरची, फ्लॉवर, भाजीपाला आदी पीके देखील पावसाच्या तडाख्यातून वाचू शकली नाही.

तालुक्यात अद्यापही ढगाळ वातावरण (Cloudy weather) कायम असून बुरशी, मावा, करपा आदी रोगांचा पिकांवर प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने या रोगापासून पीके वाचविण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करून किटकनाशक औेषधांची फवारणी करतांना दिसत आहे. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून गोदाकाठ भागात मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी कामगार सहकुटूंब डेरेदाखल झाले आहेत. अवकाळी पावसामुळे हे कुटूंब उघड्यावर आले असून बेमोसमी पावसाची सर्वाधिक झळ या कुटुंबांना बसली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या