शेळीने केले समृद्ध

शेळीने केले समृद्ध

सिन्नर । अमोल निरगुडे | Sinnar

शेळीला (Goat) गरीबाची गाय (Cow) असे संबोधले जाते. सहा वर्षांपूर्वी एक शेळी खरेदी करत शेळीपालन व्यवसायात (Goat rearing business) उतरेलेल्या तालुक्यातील चापडगाव (chapadgaon) येथील महिलेचे या शेळीने आयुष्य समृध्द बनवले आहे. शेळीपालनातून कुटुंबाला आर्थिक आधार देत कशाप्रकारे यशस्वी होता येते हे या महिलेने दाखवून दिले आहे.

चापडगाव येथील हिराबाई हरिदास आव्हाड (42), त्यांची मुलगी, मुलगा, पती हे मोलमजूरी व दुसर्‍यांची शेती वाट्याने करत होते. मुलीचे लग्न झाले असून त्यांचा मुलगा महाविद्यालयीन शिक्षण (College education) घेत आहे. हिराबाई व पती हे काही वर्षांपूर्वी एकत्र कुटुंबातून विभक्त झाले, तेव्हा त्यांना वडिलोपार्जित फक्त अर्धा गुंठा जागा मिळाली. त्यावेळी मुले खूप लहान होती. हाताला काही काम नसल्याने गावातील एकाची शेती वाट्याने करत कुटुंबाचा गाडा हाकण्याचा प्रयत्न सुरु केला.

गेल्या 20 वर्षांपासून त्यांचे कुटुंब दुसर्‍यांची शेती (farming) वाट्याने करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, 15 वर्ष काबाडकष्ट करुनही कुटुंबाची परस्थिती जैसे थे राहिल्याने त्या नेहमीच विवंचनेत राहत असत. 6 वर्षांपूर्वी मुलीचे लग्न करण्यासाठी सावकारी कर्ज घेतले. मुलाच्या शिक्षिणासाठी (education) लागणार्‍या खर्चातही दिवसेंदिवस वाढच होत होती. 6 वर्षांपूर्वी त्यांनी एक शेळी खरेदी करुन तीचे संगोपन सुरु केले. मात्र, शेळीपालनातील अडचणी, त्यांचे आजार, खाद्य, त्यांच्या व्यवस्थेच्या माहितीच्या अभावी, त्या पुढे जाऊ शकल्या नाही. काही महिन्यापूर्वी त्यांना ‘युवा मित्र’ संस्थेच्या महिला उपजीविका विकास कार्यकमाबद्दल गावातील पशूसखीकडून माहिती मिळाली. त्यातून शेळीपालनाविषयी त्यांना अधिकच गोडी लागली.

हळू हळू संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पाच महिलांचा एक गट बनवून व महिन्याला मासिक बैठकीमध्ये उपस्थित राहू लागल्या. संस्थेचे प्रकल्प समन्वयक धर्मराज राठोड (Dharmaraj Rathod, Project Coordinator of the organization) यांची त्यांना मोलाची साथ लाभली. संस्थेद्वारे शेळीपालनासाठी देण्यात येणार्‍या सेवा, लसीकरण (vaccination), डॉक्टरांची (doctor) अल्पदरात सेवा, शेळीचा विमा (insurance), शेळी खरेदीसाठी आणि शेळीचा गोठा उभारणीसाठी फंड, शेलीपालना संदर्भात प्रशिक्षण, कुट्टी मशिन, शेळी खरेदी व विक्रीसाठी होणार्‍या मदतीबाबत त्यांनी सर्व गोष्टी समजावून घेतल्या. यामुळे त्यांनी शेळ्या वाढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी घरातील सर्व सोने गहान ठेवत 40 हजार व आपल्या बहिणीकडून 15 हजार उसने घेत एकूण 65 हजारांची व्यवस्था करत 4 शेळ्या खरेदी केल्या.

उरलेल्या 10 हजारामध्ये 10 गुंठे जमीन मक्तेदारीवर घेतली. युवा मित्रकडून बियाणे घेऊन त्या जमीनमध्ये शेळ्यांसाठी हिरव्या चार्‍याचे नियोजन करत यशस्विपणे शेळीपालनास सुरुवात केली. सुरुवातीला शेळ्यांच्या दुधाची विक्री करुन त्यांनी घरखर्च भागवला. काही महिन्यांतच शेळ्यांना झालेले करडू विकून त्यांनी मुलीच्या लग्नाला व शेळ्या खरेदीसाठी घेतलेले 1 लाख 25 हजारांचे कर्ज फेडले. याच शेळ्यांच्या आधाराने त्यांनी युवा मित्रच्या मार्गदर्शनाखाली शेळ्यांसाठी गोठाही उभारला.

एका शेळीपासून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास अजूनही संपलेला नाही. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली येत्या 5 वर्षात 50 शेळ्या वाढवणार असल्याचे निर्धार त्यांनी केला आहे. शेळीपालनातून मिळणारे उत्पन्न पाहून त्यांच्या पतीनेही दुसर्‍यांची शेती वाट्याने न करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे तेही हिराबाई यांना शेळीपालनासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com