Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमहाआवासची जिल्ह्यात 73 हजार घरकुले

महाआवासची जिल्ह्यात 73 हजार घरकुले

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

पंतप्रधान (Prime Minister) व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्ह्यात 72 हजार 935 घरे पूर्ण झाली आहेत. आवास योजनांतील शिल्लक घरकुले महाआवास अभियान ग्रामीण 2.0 मध्ये पूर्ण करण्यात येणार असून त्यात एकूण 18 हजार 668 घरे साकारण्यात येणार आहेत.

- Advertisement -

गेल्या वर्षी म्हणजेच 2020-21 या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (Pradhan Mantri Awas Yojana Grameen) अंतर्गत 5 हजार 059 व राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत 1 हजार 775 अशी एकूण 6 हजार 774 घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. प्राधान्यक्रम यादीतील 69 हजार 955 लाभाध्यापैकी 58 हजार 635 घरे पूर्ण झाली. राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये 19 हजार 111 घरकुलांपैकी 14 हजार 300 घरकुले अर्थातच एकूण 72 हजार 935 घरकुले पूर्ण झाली.

सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे (state government) धोरण आहे आणि हेच धोरण महाराष्ट्र राज्याने (government of maharashtra) स्वीकारलेले आहे; त्यामुळे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) ग्रामीण योजनेप्रमाणेच राज्य पुरस्कृत योजना सुद्धा राबविण्यात येत आहेत.

यात रमाई आवास योजना, शबरी आवाज योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना याप्रकारच्या विविध गृहनिर्माण योजना राज्यात राबविण्यात येत आहेत. या योजनांना पूरक योजना म्हणून पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना (Pandit Dindayal Upadhyay Gharkul Land Purchase Financing Scheme) तसेच अतिक्रमण (Encroachment) नियमानुकूल करण्याची योजना सुद्धा राबविण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील गावकर्‍याकडे घर बांधकामासाठी जागा नसेल तर अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेमधून शासकीय जागा विनामुल्य उपलब्ध करून देणे, कमी जागेत जास्त लाभार्थ्यांचा समावेश करण्यासाठी म्हणजेच ज्या लाभार्थ्यांकडे घर बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नाही; अशा लाभार्थांसाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक या पद्धतीने बहुमजली इमारती व गृहसंकुले निर्माण करून

लाभ मिळवून देणे, घरकुलांचे जेवढे उद्दिष्ट असेल तेवढे पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले लवकरात लवकर पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण, डेमो हाऊसेस, विविध शासकीय योजनांशी कृती संगम इत्यादी उपक्रम महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या