Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedस्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे महाराज...

स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे महाराज…

किरण विठ्ठल पाटील

स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यातून समृध्दी असं विविध प्रकारे शिकवण देणारे संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 ला अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला संत गाडगे महाराज यांचे पुर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर आईचे नाव सखुबाई जानोरकर होते गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले प्रसिद्ध समाज सुधारक होते. सर्वाँना स्वच्छ तेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती.

- Advertisement -

आज संपूर्ण मानवाला कोरोना काळात प्रत्येकवेळी हात स्वच्छ साबणाने धुणे गरजेचं आहे स्वच्छता ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि जगात कचर्‍याचे प्रमाण अतिशय मोठे आहेत त्यासाठी होणार्‍या उपाययोजना हि अतिशय मोठे प्रमाणात आहेत स्वच्छता असल्यास कोणताही आजार आपल्या जवळ येत नाही हे तर सर्वांनाच माहीत आहे पण तरीही भरपूर लोकं सध्या स्वच्छतेची काळजी घ्यायला टाळतात कोणताही आजार पसरविण्यासाठी अस्वच्छता अतिशय पोषक आहे कोरोनाने लोकांना सारखे हात धुवायला शिकविले आपण कोरोनात घरीच होतो म्हणून कचर्‍याचे प्रमाण कमी झालाय निसर्ग स्वच्छ होतोय थोडक्यात काय तर कोरोनाने सर्वांना स्वच्छ तेची शिस्त लावली असं म्हटल्यास वावग ठरणार नाही… अशीच अनमोल सर्वाँना स्वच्छ तेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती.

स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यातून समृध्दी असं विविध प्रकारे शिकवण देणारे संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 ला अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला संत गाडगे महाराज यांचे पुर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर आईचे नाव सखुबाई जानोरकर होते गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले प्रसिद्ध समाज सुधारक होते दीनदलीत आणि पिढीतांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यथित करणारे गाडगे महाराज संता मधील सुधारक आणि सुधारका मधील संत होते संत गाडगे महाराज यांचा पेहराव म्हणजे डोक्यावर झिंज्या त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी एका कानात कवडी तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच एका हातात झाडू तर दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश होता त्यांना लोकं प्रेमाने गाडगे बाबा म्हणायचे…

संत गाडगे बाबा यांचे कीर्तन प्रवचन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रुढी परंपरा यावर ते टीका करतं समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देताना स्वच्छ ता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगे बाबा देत असत गाडगे बाबा म्हणजेच एक चालती बोलती पाठशाळा होती.

गाडगे बाबा हे गोरगरीब दीनदलीत यांच्या मधील अज्ञान अंधश्रद्धा अस्वचछता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाज सुधारक होते माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्या तील पैशातून रंजल्या – गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा अनाथलये आश्रम व विद्यालये सुरू केले… समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ट रुढी परंपरा दुर करण्यासाठी त्यांनीं आपले पुर्ण आयुष्य वेचले यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांना विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची जाणीव करून देत त्यांचे उपदेशही साधे सोपे असत चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसंनाच्या आहारी जाऊ नका, देवा धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.

संत गाडगे बाबा यांचे लहानपणीच 1892 मध्ये लग्न झाले त्यांच्या पत्नीचे नाव कुंताबाई होते त्यांना चार मुलीही होत्या पण त्याचे मन संसारात रमले नाही 1 फेब्रुवारी 1905 मध्ये त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला होता त्यानंतर त्यानी समाज प्रबोधन करण्यासाठी तळमळीने कार्य केले संत गाडगे बाबा यांनी दशसुत्री संदेश दिला आहे भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्या पाणी द्या,उघड्यानागड्यांना वस्त्र द्या, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करा, बेघरांना आसरा द्या, अंध पंगू रोगी यांना औषधोपचार करा, बेकारांना रोजगार द्या, पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभयदान द्या, गरीब तरुण तरुणीचे लग्न लाऊन द्यायला मदत करा, दुःखी व निराशांना हिम्मत द्या, गोरगरिबांना शिक्षणासाठी मदत करा हाच आजचा रोकड धर्म व हीच खरी भक्ती व देवपूजा आहे असं नेहमीचं संत गाडगे बाबा सांगायचे. संत गाडगे बाबा कीर्तनात म्हणायचे की, जत्रामे फत्रा बिठाया तीरथ बनाया पाणी!

दुनिया भई दिवाणी पैसोकी धूलपाणी! काशी गया प्रयाग त्रिवेणी तेथे धोंडा पाषाण पाणी! तिर्थाशी गेले आणि दाढी मिशा बढवून आले! पाप अंतरातले गेले नाही दाढी मिशिने काय केले! खुपचं मार्मिक व शुद्ध विचार नेहमीचं कीर्तनात गाडगे महाराज यांचे असतं. गाडगे बाबा यांच्या कार्यातून जे तत्वज्ञान दिसून येत जीव प्रपंच देवता आणि परमेश्वर जे अनेक पंथीय लोकांनी मांडलेले दिसते त्यात विचारांची संदिग्धता दिसून येते गाडगे बाबा यांचे तत्वज्ञान सामान्यांना समजेल असे आहे ते म्हणतात परमेश्वर अजन्मा असून निर्गुण निराकार व अव्यक्त आहे जो कोणी पाहिलेला नाहि प्रपंच हा दुःखाचे आगर आहे त्यामुळे प्रपंचातून जीवाला दुःख मिळतात तसेच सुखही मिळतात सेवा ही सुख शोधण्याचे साधन आहे आपण दुखितांची सेवा केली की सुख मिळेल जो सेवा करतो तो नराचा नारायण होतो लोकं त्यात देवत्व शोधतात तो परमेश्वराचा अंश रूप आहे म्हणून त्यांची पूजा करतात म्हणून लोकं संतांना देवत्व देतात.

भौतिक सुख हे शारीरिक जाणिवेने मोहित केलेलं ध्येय आहे भौतिक किंवा सापत्तिक सुख अततः दुःखाला कारण ठरते मात्र संपत्तीचा उपयोग जर सेवेसाठी आहे तर समाधान तुमच्या पायाशी लोळण घेईल मात्र हा मोह ही जाणीव व्यक्तीला होऊच देत नाही जे या मोहाला जाळतात तेच सेवाधर्मासाठी सार्थ ठरतात… संत गाडगे बाबा कीर्तनात सांगत असत की, कण कण करुणेची कोटी खर्चिले, कण न खर्चिला स्वाहितासाठी, वण वण फिरून कण कण झिजले बाबा दुःखी जणांसाठी… संत गाडगे बाबा यांच्या वैचारिक सामाजिक वर्तनातून नेहमीचं सांगत की, सत्य अहिंसा जीवनाचा आशय असावा. कर्तव्य करून लोकांना सहाय्य करावे. श्रम ही पूजा असून समृद्धीचा मार्ग आहे. अंधश्रद्धा हीची कारण मीमांसा करा. स्वच्छ ता हा निरोगी राहण्याचा मंत्र आहे. अभिमान सोडा. संसारी आदर्श ठेवा. बंधुभाव जपा. निर्व्यसनी रहा. जातीभेद पाळू नका. असं नेहमी गाडगे बाबा यांच्या मुखातून लोकांना कीर्तनातून सांगत. असे हे महान अजरामर संत ज्यांच्या कीर्तनाची सुरुवात गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाचा प्रसार करणारे समाजसुधारक तसेच जगाला स्वच्छ तेचे महत्व सांगणारे अजरामर व्यक्तीमत्व यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ 20 डिसेंबर 1956 रोजी देहवसान झाले त्यांची समाधी अमरावती येथे आहे अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे. युवक मित्रांनो आपणहि या जागतिक महामारीच्या कोरोना काळात संत गाडगे बाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचवू या देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणुनच मानवतेची आयुष्भर सेवा करण्यात धन्यता मानणारे संत गाडगे महाराज यांना कोटी कोटी प्रणाम… वंदन!…

(लेखक हे भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव येथे शिक्षक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या