मित्रांनो, सामाजिक बांधिलकी जपा!

मित्रांनो, सामाजिक बांधिलकी जपा!

एस.एस.अहिरे

पर्यवेक्षक नेहरू विद्यामंदिर, तळवेल

व्यक्ती किंवा संस्थांनी समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्याची निर्वहन करण्याची जबाबदारी नैतीक दृष्टिकोनातून स्वीकारणे म्हणजे सामाजिक बांधिलकी होय. बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्यप्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्याचा वापर त्याने योग्य पद्धतीने योग्य वेळी योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. जितके महत्त्व आपण राजकीय चळवळीला देतो तितकेच महत्त्व आपण शिक्षण व समाज प्रसाराला द्यावे. मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरीत्या तुटत नाही मनुष्य त्याला संपवतो कारण ते मरते एक तर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे तरी कृपया नात्यामध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा.

तुम्ही किती ही मोठे व्हा, श्रीमंत व्हा, अधिकारी व्हा, पदाधिकारी व्हा, तुमचे समाजातील अस्तित्व काय आहे ते बघा. ज्याना जगण्याचा अर्थ कळतो, त्यानी तरी जगतांना आणि मरतांना समाज सोबत असावा, हे समजून घ्यावे, शेवटी तुम्ही कुठे ही जा पण समाजाला विसरु नका.शेवटी आपले ते आपलेच असतात. या जगतात नाते, गोते, समाज आणि मायाजाळ आहे. या व्यतिरिक्त आपलं कहीच नाही, आपण सोबत काहीच नेणार नाहीत, सर्व व्यर्थ आहे.

आपण खाली हात आलो आहोत, खाली हात जाणार आहोत. असं काही तरी करा कि, लोकांनी, समाजानी आपल्या मृत्यूनंतर चांगलं म्हणावं, थोड़ी हळहळ करावी. कोणी आपणास वाईट म्हणू नये हिच खरी आपल्या जिंदगीची कमाई आणि श्रीमंती आहे. बाकी सब व्यर्थ आहे,नाशवंत आहे.

आमचे काही समाज बाधंव, समाजाला व सामाजिक कार्यक्रमाला वेळ द्यायचा म्हटलं कि, पळवाट काढून असे म्हणतात... उदाहरणार्थ...आता शिक्षण चालू आहे, नोकरीच्या शोधात आहे, लग्न करायचं आहे, मुलं लहान आहेत, थोडं सेटल होऊ द्या, वेळच मिळत नाही हो, मुलगा -मुलगी दहावीला आहे, प्रकृती बरी नसते, मुलामुलींचे लग्न करायची, ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय. आपल्या मालकीच अस कांहीच नाही या जगात. बाकी सर्व इथेच राहणार आहे.

झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो, तोपर्यंत तो कचरा साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतःकचरा होवून जातो. त्यामुळे समाजात एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा आज मला एक नवीन शिकायला मिळाले.

मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो, मी विचारले काय भाव आहे? त्यांनी सांगितले 100 रूपये किलो त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती. मी विचारले याचा काय भाव आहे तो बोलला 40 रूपये किलो. मी विचारले इतका कमी भाव? तो बोलला साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!! पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे. तेव्हा मला कळाले जो व्यक्ती संगठन...समाज आणि परिवार याच्या पासून वेगळा होतो त्याची किंमत...... अर्ध्याहून कमी होते.

कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण परिवार, संघटन आणि मित्र यांच्याशी सतत जोडून रहा, वेळ द्या. समाज कार्यात भाग घ्या, ज्याच्याकडे बुद्धी आहे त्यांनी समाजातील माणसे जोडावे ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी समाज वाढीसाठी जास्तीचा वेळ द्यावा. ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी समाज वाढीसाठी कष्ट घ्यावेत आणि ज्याच्याकडे काही नाही त्यांनी सामाजिक बांधिलकीसाठी किमान गप्प तरी बसावे कष्ट कराल तर पैसा वाढेल गोड बोलला तर ओळख वाढेल आणि आदर कराल तर स्वतःचे आणि समाजाचे नाव वाढेल.

मला समाजाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी समाजामध्ये लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण ज्या समाजात जन्मलो, त्या समाजाचे दायित्व विसरु नका.

एस.एस.अहिरे

पर्यवेक्षक नेहरू विद्यामंदिर, तळवेल

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com