Friday, April 26, 2024
HomeUncategorizedघरबांधणी : 'फ्री इंजिनिअरिंग'ने आठवड्यात इमारत तयार..

घरबांधणी : ‘फ्री इंजिनिअरिंग’ने आठवड्यात इमारत तयार..

: प्रशांत बच्छाव

मनुष्याच्या शरिरात ज्याप्रमाणे हाडांचा सापळा असतो त्याप्रमाणे इमारती, घरांमध्ये पायां, कॉलम, बीम, स्लॅबचा मजबूत सापळा असतो त्यावर निर्माण मजबूतपणे उभी राहते. येत्या 25 वर्षात इमारतींच्या या स्ट्रक्चरमध्ये कमालिचे बदल होणार आहेत.

- Advertisement -

पारंपरिक पद्धतीचे स्ट्रक्चर कालबाह्य होऊन प्री इंजिनियरिंगने तयार आराखाडा कारखान्यातून उपलब्ध झाल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अधिक काळ टिकणार्या मजबूत, प्रचंड क्षमता असणार्‍या आणि जलद तयार होणार्या इमारती निर्माण होतील.

नवीन इमारतींचे निर्माण आणि बांधकाम अविरत प्रक्रिया असते. शहरे, नगरे ज्याप्रमाणात सुनियोजित, आखिवरेखीव होत जातात त्यामध्ये बांधकामाच स्ट्रक्चरचा मोठा वाटा असतो. भविष्यात इमारतींच्या स्ट्रक्चरमध्ये विलक्षण स्थित्यंतरे येणार आहेत.

या बदलाला आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाची जोड राहणार आहे. बदलाच्या या प्रवाहात सर्व शहरांप्रमाणे नाशिकची स्कायलाईन आणि इमारतींचे आराखडे विलक्षण सुंदर असतील.

प्री-इंजिनियरिंग आराखडा :

कुठलिही इमारत बांधताना अनेक वर्ष लागतात. कॉलम, स्लॅब, बीम, यांचे क्यूरिंग होण्यासाठी हे गरजेचे असते. अशा पारंपरिक पद्धतीने बांधलेले इमारतींचे लोड सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये वापरलेल्या काँंक्रिट ग्रेडवर अवलंबून असते. आपल्या देशोत घरांसाठी एम 25 ग्रेड आणि गरजेनुसार पूढे कॉक्रिंट क्षमता वाढवत नेणारे ग्रेड वापरले जाते. विदेशात एम-60, एम 80 इतक्या ग्रेडचे कामे केली जातात. अशी ग्रेडची मजबूत कामे आपल्याकडील इमारतींमध्ये केलेली दिसून येतील.

रेडी टू यूज सांगडा : पारंपरिक पद्धतीने बांधकाम वेळखाऊ ठरते. येत्या काळात कंपन्यांमध्ये उत्पादित केलेले बीम, कॉलम, वॉलपॅनल, स्लॅब आदी बांधकामास लागणार्या गोष्टी एकत्र करुन तयार मिळतील, केवळ 3 ते चार दिवसात इमारत, घरे बांधून पूर्ण तयार होतील. यासाठी फक्त पाया आणि खड्डे करावे लागतील.

संगणकाचे विविध भाग आणून अ‍ॅसेंम्बल्डफ संगणक तयार करतो त्या प्रमाणे इमारतींचे सर्व सुटे भाग आणून ते केवळ नियोजित ङ्गआरखड्याफनुसार परस्परांशी जोडून इमारत तयार होईल. यामध्येही विविध कंपन्या घरांसाठी, औद्योगिक प्रकल्पासाठी तसेच व्यावासायिक उद्देशांच्या इमारतींसाठी विविध आकार, क्षमता, प्रकारचे यूनिटस्, पॅनल तयार करुन ठेवतील.

बांधकामे भूकंप, पूर वादळविरोधी : प्रत्येक बांधकाम नैसर्गिक आपत्तींना सक्षमपणे तोंड देऊन तग धरणारे असेल. भुंकप, पूर, वादळे यांना सहज झेलून इमारतीना संरक्षण देणारे ङ्गप्रीडिफाईनफ अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान आपल्याकडे सर्वत्र असेल. त्यासाठी सरकारच्या नियम आणि अटी अधिक काटेकोरपणे तयार होतील आणि त्याचे कार्यान्वयन तंतोतत केले जाईल.

पर्यायी बांधकाम साधने : नैर्सगिक संसाधने मर्यादित असतात. त्याचा वापर करुन ते कधीतरी संपणारे असतात. लाल मातीच्या विटा, वाळू, दगड, धातू आणि तत्सम गोष्टीं मर्यादित आहेत. येणारा काळात या गोष्टींशिवांय इमारतींचा सांगडा (स्ट्रक्चर) निर्माण होऊन नवीन बांधकाम होणार आहेत. युरोपियन देशांमध्ये ज्या प्रमाणे प्री-फेब्रिकेटेड स्ट्रक्चरने इमारतीचे बांधकाम होत आहेत तेच तंत्रज्ञान आपल्याकडे आले आहे.

त्याचा अधिकाधिक वापर 25 वर्षात वाढलेला दिसेल. फायबर ऑप्टीकचे पॅनल, अतिउंच क्षमतेचे उत्कृष्ट दणगट कामगिरी करणारे काँक्रिटींग, रासायनिक संयुगाने (केमिकल कंपोनंट) तयार होणारे फॅब्रिक्स बांधकामात सर्रास वापरले जातील. पारंपरिक दगड, सिमेंट आणि विटांच्या जागी त्यापेक्षा मजबूत असणारे अत्याधुनिक घटक वापरले जातील.

खासगी बंगले, अपार्टमेंटच्या इमारती ङ्गप्री इंजिनियरिंगफने 3 दिवस ते 1 महिन्यात तयार होतील. आंता वापरत असलेले काँक्रिट फार झाले तरी 40 ते 50 वर्षात मोडकळीस येते. येणार्या काळात 100 वर्षांहून अधिक काळ तग धरणारी बांधकाम निर्माण तयार होतील. एकाच आकाराच्या आणि अधिक मजले असणार्या इमारतींचा खर्च पारंपरिक बांधकामांपेक्षा कमी येईल. मॉल्स, शाळा-कॉलेज, रुग्णालये, औद्योगिक कारखाने यांच्या आरखड्याला आधुनिक स्पर्श आणि मजबूतीचे भक्कम कोंदण लाभलेले असेल.

या इमारती, निर्माण करताना मनुष्यबळ फारसे लागणार नाही. बांधकामासाठी कामगार वर्ग कमी लागणार असला तरी तो तांत्रिकदृष्टया कौशल्यपूर्ण आणि प्रशिक्षित असेल. नवीन आधुनिक स्ट्रक्चरमुळे बांधकाम व्यावसायाला अधिक वेग आणि चैतन्य प्राप्त होऊन यामधील आता असलेले मनुष्यबळासाठी अवलंबत्व संपलेले असेल.

तंत्रज्ञानाने कुशल, शिक्षीत आणि प्रशिक्षीत कारागिर, मजूर हेच सर्व बांधकामात वापरले जातील. त्यांना शिक्षीत करणार्या संस्था, कॉलेजमध्ये तसे शिक्षणक्रम तयार होतील. एकूणच नवीन 25 वर्षात नवीन आराखड्यांनी शहरे नवइमारतींनी सुनियोजित, सुरेख होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या