Friday, April 26, 2024
HomeUncategorizedवित्तीय : गरजा पूर्ण झाल्या तर..

वित्तीय : गरजा पूर्ण झाल्या तर..

नाशिक जवळून जाणारा समृद्धी मार्ग उपयोगी ठरणार आहे. अहमदनगर-नाशिक-सुरत होणारा महामार्ग होत आहे. हे दोनही रस्ते प्रकल्प नाशिकच्या आर्थिक, औद्योगिक, शेती व्यवसाय, लॉजिस्टिक हब आणि आणि त्यास पूरक अशा व्यवसायांना मोठी उपयोगी ठरतील.

विमानतळ व विमानसेवा व कार्गो सेवा, सरकारी धोरण, नवीन रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादी नाशिकच्या गरजा नजीकच्या भविष्यात पूर्ण झाल्या तर शेती, शेतीवर अवलंबून असलेले उद्योगधंदे, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक व्यवसाय, नवीन व पूरक उद्योगधंदे, व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढण्याची आशा आणि अपेक्षा आहे.

- Advertisement -

नाशिकच्या अर्थकारणाचेे मूळ आधारस्तंभ :

1. शेती : द्राक्षे, कांदा, टोमॅटो आणि डाळिंब

2. ग्रेप- वाईन

3.औद्योगिक उद्योग

4. पर्यटन

आतापर्यंत नाशिकची आर्थिक स्थिती कशी असेल हे उद्योग ठरवत होते. सरकार कृषी व त्यावर आधारित उद्योग व व्यवसाय यांना चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखून आर्थिक पाठबळ देत आहे. नाशिकची वाईन केवळ भारतातच नाही तर जगात बर्‍याच ठिकाणी पोहोचली आहे.

नाशिकचा दळणवळणाचा प्रश्न : नाशिक जवळून जाणारा समृद्धी मार्ग उपयोगी ठरणार आहे. अहमदनगर-नाशिक -सुरत होणारा महामार्ग होत आहे. हे दोनही रस्ते प्रकल्प नाशिकच्या आर्थिक, औद्योगिक, शेती व्यवसाय, लॉजिस्टिक हब आणि आणि त्यास पूरक अशा व्यवसायांना मोठी उपयोगी ठरतील, असे वाटते.

ओझरला कार्गो विमानतळ पूर्णपणे सुरू झाले तर नाशिकची द्राक्षे, टोमॅटो, डाळिंब व इतर उत्पादने नवीन बाजारपेठ शोधतील. त्यातून नफा वाढेल व आर्थिक प्रगतीत चांगली भर पडून उद्योगवाढीस चालना मिळेल. भारताची इतर शहरे सुद्धा हवाइमार्गाने जोडली गेली पाहिजे.

शासनाने या संदर्भात सर्व बाबींचा यथायोग्य विचार करावा. नाशिक-पुणे तसेच नाशिक-इंदोर असे नवीन लोहमार्ग प्रस्तावित आहेत. नाशिकच्या आर्थिक उन्नतीसाठी याचा एक मोठा हातभार लागू शकतो. दळणवळण वाढले की व्यवसाय व उद्योगाला चालना आपोआप मिळते.

आरोग्य व्यवस्था : नाशिकला आरोग्य विद्यापीठ 1998 मध्ये प्रस्थापित झाले.

आज आपल्याकडे सरकारी आरोग्य सुविधा म्हणून सिव्हिल हॉस्पिटल आहे, संदर्भ रुग्णालय आहे त्यात अद्ययावत मशिनरीसुद्धा आहेत. नाशिकची वाढती लोकसंख्या पाहता एखादे मोठे मेडिकल कॉलेज व संलग्न रुग्णालय आवश्यक आहे.

विमानतळ व विमानसेवा व कार्गो सेवा, सरकारी धोरण, नवीन रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादी नाशिकच्या गरजा पूर्ण जर नजीकच्या भविष्यात केल्या गेल्या तर शेती, शेतीवर अवलंबून असलेले उद्योगधंदे, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक व्यवसाय, नवीन व पूरक उद्योगधंदे, व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढण्याची आशा आणि अपेक्षा आहे.

या सर्वांचा परिणाम सरकारी कर संकलन वाढेल, सुविधा वाढतील, दरडोई उत्पन्न वाढतील, बेरोजगारी कमी होईल, स्किल्ड कामगाराला मुंबई-पुण्यात न जाता नाशिकला काम मिळेल, दरडोई उत्पन्न वाढले की जीवनमान स्तर उंचावतो, बांधकाम क्षेत्रात मागणी वाढते अशा अनेक घटकांना याचा एक मोठा फायदा होतो. नाशिकची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक, प्रगती होवो हीच आणि केवळ हीच सदिच्छा…

- Advertisment -

ताज्या बातम्या