Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअचानक मृत्यूने भीती

अचानक मृत्यूने भीती

मनमाड । बब्बू शेख | Manmad

मनमाडमध्ये (manmad) गेल्या काही दिवसापासून मृत्यूचे तांंडव आहे. दोन महिन्यात 10 पेक्षा जास्त तरुणांचा (youth) हृदयविकाराच्या धक्क्याने (Heart attacks) मृत्यू झाला आहे. आपल्यातून चालता-बोलता जवळचा माणूस अचानक कायमचा निघून जात असल्याचे पाहून नागरिका मध्ये खळबळ उडून त्यांना मानसिक धक्का (Mental shock) बसत आहे.

- Advertisement -

एकीकडे करोनाची (corona) भीती तर दुसरीकडे अचानक मृत्यूच्या (sudden death) घडत असलेल्या या घटनांमुळे शहरात एका प्रकारे चिंता वजा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डी.डायमरमुळे (D. Dimer) (रक्त गोठणे) मृत्युच्या घटनांमध्ये वाढ झाली असावी असा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांनी (doctor) व्यक्त केला आहे करोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेने शहर परिसरात धुमाकूळ घातला होता

त्यात शहरातील सुमारे 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर करोना (corona) आटोक्यात आल्याचे पाहून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला असतांना आता पुन्हा तिसर्‍या लाटेच्या रूपाने करोनाचे संकट घोंगावत आहे.

रोज नवे रुग्ण आढळून येत आहे शासकीय रिपोर्ट नुसार मनमाडसह (manmad) नांदगाव तालुक्यात (nandgaon taluka) 187 पॉझिटिव्ह रुग्ण (positive paitents) आहे. मात्र, खासगी दवाखाने (privet hospitals) आणि हॉस्पिटलमधील रुग्ण पाहता आकडा मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे.एकीकडे रोज रुग्ण आढळून येत असतांना दुसरीकडे शहरात

हार्टअटॅकने (Heart attacks) मरण पावणार्‍यांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात 15 पेक्षा जास्त लोकांचा हार्टअटक ने मृत्यू झाला असून विशेष म्हणजे सर्व तरुण आहेत आणि त्यांचे चालता-बोलता निधन झाले आहे. ज्याला सकाळी भेटलो तो दुपारी सोडून जात आहे ज्याच्याशी दुपारी गप्पा मारल्या त्याचा संध्याकाळी मृत्यू झाल्याचे वृत्त येतो त्यामुळे शहरात अचानक मृत्यूचा तांडव सुरू झाल्याचे पाहून नागरिकांना मोठा मानसिक धक्का बसत आहे.

डीडायमरमुळे (रक्त गोठणे) मृत्यू झाले असावे असा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे त्रास होत असेल तर घरी वेळ न घालवता तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या