Monday, April 29, 2024
HomeUncategorizedबळीराजा रात्रपाळीवर

बळीराजा रात्रपाळीवर

दिंडोरी | विलास ढाकणे | Dindori

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) सध्या महावितरण कंपनीकडून (MSEDCL) अनेक वीजउपकेद्रा मधून शेतीसाठी (farming) रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत वीज पुरवठा (Power supply) दिला जात असल्यामुळे शेतकरी (farmers) वर्गामध्ये महावितरण कंपनीच्या कारभारा विषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात सध्या गहू (wheat), हरबरा तसेच कांदा (onion) लागवड चालू घेणार असून बळीराज्याची धावपळ चालू असताना महावितरण कंपनीने (MSEDCL) कृषीपंपानां (agricultural pump) रात्रीचा विजपुरवठा देवून जखमेवर मीठ चाळल्यां सारखे झाले आहे. त्यात रात्री वीजेचा बिघाड झालास तो दिवसही वाया जातो. त्याप्रमाणे ट्रासफार्मरवर (Transformer) डिओ व फ्युज वारंवार जात असल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी देण्यात कायमच अडथळे निर्माण होत आहे. एककीकडे शेतकर्‍यांना जगाचा ‘पोशिंदा’ म्हणून उपमा द्यायची आणि दुसरीकडे त्यांच शेतकर्‍यांची रात्रीचा वीजपुरवठा (Power supply) देवून पिळवणुक करायाचे असा प्रकार सध्या सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.

तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षापासून बिबट्याचा मुक्तसंचार सर्वत्र पाहवयास मिळत आहे. अनेक गावामध्ये बिबट्यांचा (Leopard) मुक्तसंचार मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत बिबट्याची संख्या एवढी वाढली आहे की, त्यामुळे शेती व्यवसायवर मोठा परिणाम घेताना दिसत आहे गेल्या अनेक वर्षापासून शेतकर्याना (farmers) दिवसा विजपुरवठा त्याचा प्रश्न सुटत नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) निम्मा तालुका आजही सिंगल फेंज योजना नसल्यामुळे वाडी वस्त्यावर जनतेला रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे. यांचा शेती व्यवसायवर विपरित परिणाम होत आहे.

दिंडोरी तालुक्यात बिबट्या (Leopard) विषयी असूनही वनविभाग (Forest Department) गांभीर्याने घेतले जात नाही. त्यात सध्या थंडीचे दिवस त्यामुळे शेतकरी वर्गापुढे मोठे संकट आहे. रात्री पिकाला पाणी दिले नाही तर पिक वाया जाण्याची भिती आणि रात्री बाहेर निघायाचे तर बिबट्याची भिती असे दुयरी संकट बळीराजा पुढे उभे राहिले आहे. सध्या भागातील शेतकर्‍यांंच्या कृषीपंपाना तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्रीचा विजपुरवठा केला जात आहे.

त्यामुळे शेतकरी हैराण आहे. संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीने ठप्प असताना आजही शेतकरी आपल्या शेतात राबत आहे, यांची दखल कुठे तरी राज्यकत्यांनी घेतली पाहिजे दिवसाही शेतात काम करायचे व रात्री पिकांना पाणी द्यायचे यामुळे शेतकर्‍यांचे आरोग्य धोक्यात येवून अनेक व्याधीनी त्यांला ग्रस्त केले आहे. अशी परिस्थिती असताना बळीराज्याला कुणी वाली राहिलेला नाही, अशा स्वरूपाच्या तीव्र प्रतिक्रिया सध्या शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या