बळीराजा खरिपाच्या तयारीत

बळीराजा खरिपाच्या तयारीत

दिंडोरी । संदीप गुंजाळ | Dindori

पावसाची चाहूल लागल्याने कृषी विभागाने (Department of Agriculture) खरीप हंगाम (kharip season) पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

यावर्षी 17 हजार 233 हेक्टर क्षेत्रावर खरिपांची पेरणी अपेक्षित असुन त्यासाठी 11 हजार 283क्विंटल बियाणे लागणार आहे. तर खरीप हंगामासाठी कृषी विभागाने 24 हजार 434 मे.टन खतांची मागणी नोंदविली (Fertilizer demand reported) असुन टप्प्याटप्प्याने खतांचा पुरवठा (Fertilizer supply) सुरू होणार आहे. त्यामुळे बळीराजाही शेतीत खरीप हंगामाच्या मशागतीला जुंपला आहे.

सोयाबीन पिकांला (Soybean crop) वाढता भाव बघता यावर्षी सोयाबीन पीक पेरणीचे क्षेत्र वाढले असा अंदाज वर्तवला जात आहे. तर मकाचे क्षेत्रात थोड्या फार प्रमाणात चढ उतार होण्याची शक्यता आहे.तसेच काही शेतकरी (farmers) वर्गाने उन्हाळ बाजरी केली होती. परंतु खरिप हंगामात (kharip Season) मात्र दरवर्षी तालुक्यात बाजरीचे पेरणीच्या क्षेत्रात लक्षणीय घट होतांना दिसत आहे.तसेच यंदा पावसांच्या आगमनावर हे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील खरीप हंगामात मका पिक (Maize Crop) जोमाने आले परंतु अस्मानी संकटाशी या पिकांवर अनेक संकटाची टांगती तलवार निर्माण झाली होती.

परंतु यंदा मात्र पाण्याचे नियोजन चांगले झाले तर मका क्षेत्रात लक्षणीय वाढ होईल असे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.त्यात शेतकी विभागाने 919.00हेक्टर क्षेत्रावर पेरणी क्षेत्र म्हणून अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यासाठी साधारण पणे 137-80 क्विंटल बियांणाचा पुरवठा लागेल असे समीकरण निर्माण केले आहे.बाजरी व मका बियाणे बदलावे लागत नसल्याने ते कमी प्रमाणात लागणार आहे.तालुक्यात दिवसेंदिवस तुरीचे क्षेत्र घट चालले आहे.तरीही पण शेतकरी वर्ग यंदाच्या खरीट हंगामात तुर घेण्यास उत्सुक दिसत आहे.त्यासाठी काही क्षेत्र पेरणी लागवडीसाठी निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी कृषी विभागाने (Department of Agriculture) 31.50 क्विंटल बियांणाचा पेरणीसाठी अंदाज बांधला आहे.

यंदा मुग ही पेरणीसाठी सज्ज असुन त्यासाठी संबंधित विभागाने 18.45 क्विंटल ची मागणी नोंदविण्यात आली आहे. उडीद पिकांची मागील स्थिती पाहता 905.00 एवढे हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी असुन त्यासाठी 135.45 क्विंटल बियांणाची मागणी आहे.भुईमूग ची गेल्या चार हंगामात चांगली स्थिती निर्माण झाल्याने यंदाच्या खरीप हंगामासाठी 3384.00 हेक्टर क्षेत्र पेरणी साठी अधिग्रहित असुन त्यासाठी 5076.00 क्विंटल बियांणाची मागणी नोंदवली गेली आहे. तालुक्यातील शेतकरी वर्ग दरवर्षी सोयाबीन पिकांकडे मोठा कल देतात यंदाही सोयाबीन पिकांसाठी 5432.00 एवढे हेक्टर क्षेत्र पेरणी साठी उपलब्ध आहेत.

त्यात पेरणी साठी संबंधित विभागाने 4074.00 क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. तालुक्यात खरीप हंगामात लाल कांद्याबरोबर सोयाबीन क्षेत्र वाढतांना दिसत असुन काही पिकांकडे बळीराजांने कानाडोळा केला आहे. पावसाचा अंदाज लवकर सुरू होणार असल्याने सध्या शेतकरी वर्ग शेतीची मशागत कामांमध्ये व्यस्त आहे. खरीप हंगामात यांत्रिकीकरणांच्या साह्याने मशागत करतांना इंधनाचे भाव वाढल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा आपल्या पारंपरिक साधनांच्या साह्याने मशागत करतानांचे चित्र दिसत आहे.

खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी कृषी विभागाने खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी केली आहे. त्यात युरिया 1450,डीएपी 2550,एमओपी 602,एसएसपी 2832,एनपीके 8000 इ.खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. मागील वर्षी परतीच्या पावसाने बळीराजांचे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यंदाच्या खरीप हंगामात मागील पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा बळीराजांला वाटत आहे.

फसवणूक टाळणार्‍या उपाययोजना खरीप हंगामात खते, औषधे, बियाणे खरेदी करतांना शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही. खत टंचाईचा सामना करावा लागु नये, यासाठी कृषी विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. तसेच त्याबाबतच्या सुचना संबंधितानां देण्यात आल्या आहेत. मात्र खतांची टंचाई अथवा ज्यादा पैसे घेत जात असेल किंवा बनावट बियाणे, खते विक्री करतांना दिसल्यास त्वरित कृषी विभागाची संपर्क करावा. संबंधितावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

- विजय पाटील, कृषी अधिकारी दिंडोरी तालुका

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com