Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedआयमाचे निर्यातीला चालना देणारे प्रशिक्षण

आयमाचे निर्यातीला चालना देणारे प्रशिक्षण

नाशिक | रवींद्र केडिया | Nashik

उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी (Development of industrial sector) औद्योगिक संघटनांची (Industrial Organizations) भूमिका ही दिशादर्शकाची असणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने आयमाने (AIMA) आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रत्यय येत असून खर्‍या अर्थाने उद्योजकांना आपल्या उत्पादनांच्या सीमा नेण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

आयमाच्या माध्यमातून उद्योजकांना निर्यातीचे (Export) धडे दिले जाणार आहेत. सिम्बॉयसिसनेही (Symbiosis) त्यासाठी स्पेशल अभ्यासक्रम तयार केला असून या माध्यमातून उद्योजकांना त्यांचे व्यवस्थापकांना निर्यातक्षम प्रशिक्षण (Exportable training) दिले जाणार आहे. ज्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांचा अभ्यास कसा करावा, आपल्या उत्पादनाची बाजारपेठ कशी निवडावी, तेथे संपर्क करावा, या लोकांना कोणत्या गोष्टी पाठवणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यातून व्यवसायाचे दार उघडे होईल.

निर्यात करणार्‍या मालाची आठवण कशी करावी, त्यासाठी लागणारे कागदपत्रांची जुळवा जुळवा करणे, कंटेनर पाठवणे, पाठवण्याची पद्धत, पाठवण्याचा प्रकार त्यासाठी घ्यावयाची काळजी, मालाची देवाण-घेवाण, वसुली अशा विविध अंगाने अज्ञात क्षेत्रात जाऊन आपल्या उत्पादनांना नवी बाजारपेठ निर्माण सामर्थ्य उद्योजकांत निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रशिक्षणाच्या माध्यमातून केल्या जाणार आहे.

सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या (Symbiosis College) माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार असल्याने हे प्रशिक्षण निश्चितच उद्योजकांना निर्यातीचे सखोल ज्ञान देण्यास समर्पक ठरेल, असा विश्वास उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. उद्योग क्षेत्रात सध्याच्या स्थितीत उद्योजकांची दुसरी पिढी कार्यरत आहे. पहिल्या पिढीच्या शिलेदारांनी उद्योगांना स्थिरस्थावर आपले मोलाचे योगदान दिले.

उद्योग उभा राहिला आणि सुरळीतपणे चालतो आहे, हीच एकमेव अ‍ॅचिव्हमेंट बिनीचे उद्योजक मानत आले आहे. मात्र नव्या पिढीला याहीपुढे धाडसी पाऊल टाकण्याच उर्मी लाटल्याचे दिसून येते. त्यामुळेच उद्योजकांच्या या नव्या पिढीला जागतिक स्तरावर कोणत्या देशात काय करावे, काय करू नये, कसे व्यवहार करावे, याचे बघायचे अगोदर मिळणे गरजेचे आहे. त्या आधारावर प्रत्यक्ष व्यवहार करताना त्यांना मोठी मदतच होणार आहे.

औद्योगिक क्षेत्रासाठी पहिल्यांदा एक स्पोर्ट मॅनेजर ही संकल्पना पुढे आणली आहे. निर्यात शिक्षण उद्योग असणे किंवा त्याला निधी, अध्यक्ष बनवणे यासाठी व्यवस्थापकाकडे असावे लागणारे कौशल्य ज्ञान आणि त्याच्यात असणारी तळमळ ही पेटवण्याचे काम या प्रशिक्षणातून जाणार आहे. त्यामुळे निर्यातमध्ये नाशिकचा टक्का राज्यात साडेतीन टक्के आहे.

प्रत्यक्षात ही संख्या जास्त आहे. मात्र अज्ञानामुळे बहुतांश व्यावसायिक आपला उत्पादन इतर उद्योगांच्या माध्यमातून पाठवत असल्याने तो मुंबईसारख्या शहरात मोजला जात आहे. काहीही असले तरी नाशिकच्या टक्का वाढवणे, नाशिकच्या उद्योजकांमध्ये ती गुणवत्ता येणे काळाची गरज आहे. त्या माध्यमातून निश्चितच काळात नाशिकला निर्यातीसाठीच्या प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या तपासण्या करणारे कार्यालय सुरू होईल व त्या माध्यमातून जास्त निर्यात सक्षम उद्योग पुढे येतील, मात्र शंका नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या