मनरेगातून 10 हजार मजुरांना रोजगार

मनरेगातून 10 हजार मजुरांना रोजगार

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

जिल्ह्यातील मजुरांना रोजगार (Employment of labourers) मिळावा, यासाठी केंद्र सरकारतर्फे (central govrenment) सुरू करण्यात आलेल्या मनरेगाअंतर्गत

या वर्षात जिल्ह्यामध्ये 10 हजार मजुरांना (labourers) रोजगार (Employment) प्राप्त झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो कामे प्रगतीपथावर असून मजुरांना यातून आशेचा किरण दिसला आहे.

जुलै महिना जवळपास पूर्ण पावसात गेला असला तरी देखील या पावसातही मनरेगावरील कामांना मजुरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध कामांचे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत सध्या 1 हजार 993 कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील 1,785 तर वेगवेगळ्या यंत्रणा स्तरावरील 208 कामांचा समावेश आहे.

प्रामुख्याने वृक्षलागवड (tree plantation), घरकुल, फळबागा लागवड (Orchard planting), विहीर (well), गोट शेड (Goat shed) उभारणे, भात खाचरे, रोपवाटिका (Nursery), रस्ते खडीकरण, शौचालये आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील (rural area) मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. दरम्यान, चालू वर्षी उन्हाळा अधिक जाणवत असल्याने ग्रामीण भागातील जनतेसाठी मनरेगा हे वरदान ठरले आहे.

हक्काचा रोजगार उपलब्ध होत असल्याने उन्हाळ्यामध्ये मजुरांची पावले मनरेगाच्या कामांकडे वळली होती. परंतु, पावसाळ्यात हेच मजूर शेतीकडे परतत असल्याने मनरेगावरील कामांचा वेग मंदावेल, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात मात्र, जुलैमध्येही मनरेगाच्या कामांवर 10 हजारांहून अधिक मजूर उपस्थिती लावत आहेत. मनरेगाच्या कामांना मिळणारा प्रतिसाद बघता, प्रशासन अधिकधिक कामे प्रस्तावित करण्यावर भर देण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com