Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedहेल्मेट जनजागृतीतून साडेअठरा लाख दंड

हेल्मेट जनजागृतीतून साडेअठरा लाख दंड

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

शहरात हेल्मेटबाबत (helmet) जनजागृती (Awareness) ही फक्त दिखाऊ मोहीम असल्याचे आकडेवारीतून पुढे आले आहे. ऑगस्ट (august) महिन्यापासून शहरात हेल्मेटबाबत विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरीदेखील नागरिकांनी या गोष्टीला हरताळ पाळल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. मोहीम सुरु झाल्यापासून आतापर्यंत अठरा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंड फक्त हेल्मेट नसल्याच्या कारणास्तव देण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान पोलीस आयुक्तालयातील (Commissionerate of Police) वाहतूक शाखेकडील माहितीनुसार, हेल्मेटची मोहीम (Helmet campaign) सुरु झाल्यापासून आतापर्यंत तीन हजार सहाशे अठ्ठ्यानव नागरिकांनी विना हेल्मेट प्रवास करताना पकडण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांच्याकडून हा दंड दाखविण्यात आला आहे.

यापैकी मोजक्याच नागरिकांनी हा दंड (Penalty) भरला आहे; तर काही प्रमाणत नागरिकांनी दंड अद्याप भरला नाही. दंड न भरलेल्यांची संख्या जास्त आहे. 306 नागरिकांनी आपला दंड रोख भरला आहे. त्यांनी 1 लाख त्रेपन्न हजार एवढा दंड रोख स्वरुपात भरला असून तीन हजार तीनशे एक्क्यानव जणांनी सोळा लाख पंच्याण्णव हजार पाचशे एवढा दंड भरण्याचे बाकी आहे.

15 ऑगस्टच्या मुहूर्तावर शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल (No helmet no petrol) ही मोहीम सुरु झाली. यामोहीमेच्या अंतर्गत ज्या वाहनधारकांकडे हेल्मेट नाही त्यांना पेट्रोल (petrol) मिळणार नाही. जर त्यांना पेट्रोल दिले तर त्याच्याविरुद्ध कारवाई तर होणारच सोबतच ज्या पंपचालकाने पेट्रोल दिले त्याला सुद्धा कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

त्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर (Petrol pump) पोलीस कर्मचारी (Police personnel) देखील तैनात करण्यात आले होते. त्यानंतर या मोहिमेसह जे हेल्मेट वापरात नाही त्यांच्यासाठी 2 तास समुपदेशनाची मोहीम चालविली. त्यानंतर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नो पेट्रोल नो कोऑपरेशन हि मोहीम सुरु करत विना हेल्मेट कोणत्याही कार्यालयात प्रवेश नसल्याचे सूचित करण्यात आले.

त्यासाठी संबंधित कार्यालयात मालमत्ता अधिकारी नेमण्याचे देखील सांगण्यात आहे. आणि आता एक डिसेंबर पासून विना हेल्मेट वाहने चालविणार्यांच्या परीक्षा घेण्यात येत आहे. दरम्यान, दरम्यान, या वर्षी 643 विना हेल्मेटधारकांनी 3 लाख 21 हजार पाचशे एवढा दंड रोख स्वरुपात दिला आहे तर 10 हजार नऊशे त्र्याहत्तर विना हेल्मेटधारकांकडून चोपन्न लाख अठ्ठ्यानव हजार रुपये येणे प्रलंबित आहे.

सर्वाधिक रोख दंड हा जानेवारी महिन्यात 78 हजार एवढा आकारला गेला तर त्यांनतरचा सर्वाधिक हा मोहीमकाळात 76 हजार एवढा आकारला गेला आहे. सर्वात कमी दंड मे महिन्यात 4 हजार पाचशे एवढा रोख आकारला गेला आहे. प्रलंबित येणे बाकी यामध्ये सर्वाधिक दंड जानेवारी या महिन्यात 14 लाख सत्त्यान्नव हजार एवढा आकारला गेला आहे.

पंधरा लाख दंड प्रलंबित

जिल्ह्यात कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे लॉकडाऊन करण्यात आला होता तरीसुद्धा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यात 141 विना हेल्मेट नागरिकांनी 70 हजार 500 रुपये रोख दंड दिला तर 2 हजार 978 विना हेल्मेट नागरिकांचा 14 लाख 89 हजार एवढा दंड प्रलंबित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या