कार्यकुशल ‘कॅप्टन’

कार्यकुशल ‘कॅप्टन’

- विनायक सरदेसाई

केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफ यांना आलटून-पालटून सत्ता देण्याचा केरळमधील जनतेचा शिरस्ता यंदा चाळीस वर्षांनंतर मोडला आणि एलडीएफला सलग दुसर्‍यांदा सत्ता मिळाली. ही किमया घडण्यामध्ये मुख्यमंत्री पिनरई विजयन यांचा वाटा खूप मोठा आहे.

केरळची जनता त्यांना केवळ ‘कॅप्टन’च म्हणत होती आणि ते कॅप्टन होतेही! लोकांना मदत करणारा खंबीर नेता म्हणून आज त्यांची ओळख आहे. विजयन यांचे प्रशंसक आणि विरोधक दोघेही त्यांना ‘धोती पहनने वाले मोदी’ किंवा ‘केरल के स्टॅलिन’ म्हणतात. येणार्‍या काळात डाव्या पक्षांचा राष्ट्रीय चेहरा म्हणून पुढे येण्याची क्षमता निश्‍चितपणाने त्यांच्यात आहे.

पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केरळात डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमध्ये लावण्यात आल्या होत्या; परंतु हा विजय एवढा निर्णायक असेल असे डाव्या आघाडीच्या कट्टर समर्थकांनाही वाटले नव्हते. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आणि माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफ यांना आळीपाळीने संधी देेण्याचा शिरस्ता केरळच्या जनतेने गेली चार दशके जोपासला आहे. यावेळी प्रथमच एलडीएफ दुसर्‍यांदा सत्तेवर आली आणि तीही निर्णायक आघाडी घेऊन! २०१६ च्या निवडणुकीच्या तुलनेत एलडीएफला आठ जागा जास्त मिळाल्या आणि एकूण १४० सदस्यांच्या विधानसभेत आता एलडीएङ्गचे ९९ सदस्य असतील. एलडीएफचे नेते पिनरई विजयन हेच या विजयाचे शिल्पकार मानले जात आहेत.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात जनाधार असलेले नेते असा लौकिक या निवडणुकीच्या माध्यमातून विजयन यांना लाभला आहे. प्रस्थापितविरोधी लाट राज्यात या निवडणुकीत दिसली नाही आणि सोन्याच्या तस्करीचे कथित आरोपही विरोधकांना मदत करू शकले नाहीत. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या मुद्द्यावरून सरकारच्या धोरणाबद्दल असलेली नाराजी आणि कोविड-१९ च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे असलेली नाराजी हेसुद्धा पोकळ बुडबुडेच निघाले. या निवडणुकीत यूडीएफला एलडीएफने अवघ्या ४१ जागांमध्ये गुंडाळले आणि खुद्द राहुल गांधी आता केरळमधून खासदार असले तरी कॉंग्रेसला अवघ्या २१ जागांवर समाधान मानावे लागले. एनडीए तर कुठेच दिसली नाही. २०१६ मध्ये जिंकलेली नेमोमची जागाही भाजपने गमावली. निवडणुकीच्या काही दिवस आधीच पिनरई यांनी सांगितले होते, ‘‘२०१६ मध्ये नेमोमच्या जागेने भाजपने राज्यात खाते उघडले होते, तेही या निवडणुकीत बंद राहील.’’ ही गोष्ट खरी ठरली आणि एलडीएङ्गमधील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या माकपच्या जागांमध्ये ६७ पर्यंत वाढ झाली.

हे अचानक मिळालेले यश नाही. पिनरई यांनी राजकीय विरोधकांची शक्तिस्थळे आणि कमकुवत स्थळे अशा सर्व मुद्द्यांचा बारकाईने विचार केला. त्यावरूनच आपली रणनीती ठरविली आणि केरळमध्ये एलडीएङ्गला असलेला जनाधार वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी आघाड्या केल्या. लागोपाठ दोन वर्षे म्हणजे २०१८ आणि २०१९ मध्ये महापूर, निपाह विषाणू आणि नंतर कोविड-१९ च्या संसर्गाच्या काळात पिनरई यांच्या सरकारने केलेल्या कामकाजाचे कौतुक करण्यात आले. या संकटकाळात त्यांची प्रतिमा मदत करणारा नेता अशी झाली. महामारीच्या काळात प्राइम टीव्हीवर त्यांचे शब्द लोकांनी दररोज मन लावून ऐकले आणि त्यांची प्रतिमा आणखी चांगली झाली. त्यांच्यासोबत काम करणार्‍या काही अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये सत्तेवर येताच आपल्याला दुसरा कार्यकाळ मिळाला पाहिजे याबद्दल गंभीर होते. कामकाजाच्या शैलीसंदर्भात त्यांनी शेकडो तज्ज्ञांशी बातचीत केली. माजी नोकरशहांच्या मते, त्यांनी केरळमध्ये बदल, जीवनमानात सुधारणा याबरोबरच अनेक मुद्द्यांवर काम केले. त्यांनी ज्या कामांचा आधार घेतला, त्यांचा माकपला मोठा ङ्गायदा झाला.

सुशासनाच्या बाबतीत पिनरई विजयन यांची प्रतिमा चांगली आहे. आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी चांगले रस्ते बनविले, सरकारी शाळांचे स्वरूप बदलण्यासाठी आणि आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच महामारीवर नियंत्रण मिळविण्यात केरळला यश मिळाले. आजही अनेकांचे जीव वाचविण्यात राज्याला यश मिळत आहे. कोविडकाळात केरळमध्ये मृत्युदर देशात सर्वांत कमी आहे. परंतु केवळ सुशासनाच्या आधारेच एलडीएङ्ग दुसर्‍यांदा सत्तेत आली आहे असे नाही. पिनरई यांचे राजकीय डावपेचही चपखल बसले. उदाहरणार्थ, केरळ कॉंग्रेस (मणि) आणि लोकतांत्रिक जनता दल यांच्याशी आघाडी केल्याने मध्य आणि उत्तर केरळमध्ये एलडीएङ्गची व्याप्ती वाढली. तसे पाहायला गेल्यास एलडीएफने राजकीय तडजोडींकडे फारसा भर दिला नाही. त्यांचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसबरोबरच भाजपच्या वाढत्या धोक्याशी होता. कारण भाजपला २०१६ मध्ये १५ टक्के मते मिळाली होती. आपल्या मतदारसंघात ५१००० मतांनी विजय मिळवल्यानंतर पिनरई यांनी सांगितले, ङ्गङ्घआम्ही केरळच्या लोकांवर विश्‍वास टाकला आणि लोकांनी आम्हाला भरभरून दिले. एलडीएफची रणनीती चांगलीच कामी आली. या निवडणुकीत एलडीएङ्गला मिळालेल्या मतांची टक्केवारी ४२.२ वर पोहोचली. यूडीएङ्गची मतेही थोडी वाढून ३९.४ टक्के झाली. दुसरीकडे भाजपप्रणीत एनडीएची मते घटून १२.४ टक्क्यांवर आली.

या निवडणुकांमुळे पिनरई विजयन हे एक शक्तिशाली नेते म्हणून उदयाला आले आहेत. विजयन यांचे प्रशंसक आणि विरोधक दोघेही त्यांना ङ्गधोती पहनने वाले मोदीफ किंवा ‘केरल के स्टॅलिन’ म्हणतात. या विशेषणांवरून असे दिसते की, त्यांची दोन शक्तिशाली नेत्यांशी तुलना तर केली जात आहेच; शिवाय केरळमध्येही व्यक्तिकेंद्रित वातावरण या निवडणुकीत निर्माण झाल्याचे ते द्योतक आहे. वस्तुतः कम्युनिस्ट विचारधारा मानणार्‍या पक्षांमध्ये अशी बिरुदे व्यक्तीला दिली जात नाहीत आणि ती चांगलीही मानली जात नाहीत. निवडणुकीची प्रचार मोहीम सुरू झाली तेव्हाच काही नेत्यांनी विजयन यांना ‘कॅप्टन’ का म्हटले जाते, म्हणून आक्षेप नोंदविला होता. कम्युनिस्ट पक्षात सर्वांना

समान दर्जा असतो, याची आठवण कार्यकर्त्यांना करून देण्याची वेळ माकपच्या एका वरिष्ठ नेत्यावर आली होती. खरोखरच पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेणारा सर्वोच्च पॉलिट ब्यूरो असो किंवा जमिनीवरील कार्यकर्ता असो, माकपमध्ये सर्वांना समान दर्जा देण्याची प्रथा आहे. तरीसुद्धा ही निवडणूक बर्‍याच अंशी व्यक्तिकेंद्रितच झाली. केरळची जनता त्यांना केवळ ‘कॅप्टन’च म्हणत होती आणि ते कॅप्टन होतेही! पिनरई विजयन यांचे प्रशंसक आणि विरोधक हे दोघेही मान्य करतील की, विजयन यांनी लोककल्याणाच्या अनेक योजना केरळमध्ये उत्तमरीत्या राबविल्या. नैसर्गिक आपत्ती असो वा साथरोग असो, अशा संकटाच्या काळात केरळला त्यांनी एक भक्कम नेतृत्व दिले. ते एक मजबूत नेतेच नव्हे तर कार्यक्षम मुख्यमंत्रीही ठरले. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे केवळ दोन पैलू आहेत, अशी टिप्पणी केरळमधील बुद्धिवादी लोक करतात, तेव्हा विजयन यांच्या व्यक्तिमत्त्वातील जादू समजून घेता येते.

विजयन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा पैलू कम्युनिस्ट आंदोलनातील इतर नेत्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. नरेंद्र मोदी किंवा स्टॅलिन यांची उपमा त्यांना का दिली जाते, हेही पाहायला हवे. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच पिनरई विजयन हे एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. कन्नूर जिल्ह्यातील पिनरई हे त्यांचे गाव. ते ताडी बनविणार्‍या एल्वा समाजातील आहेत. ङ्गेरीबोटीचे भाडे वाढविण्याच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी जेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते, तेव्हा प्रशासनाशी त्यांचा पहिल्यांदा संबंध आला. त्यावेळी ते केरळ स्टूडन्ट्स ङ्गेडरेशनचे सदस्य होते. कम्युनिस्ट पक्षाच्या विभाजनानंतर या संघटनेचे रूपांतर स्टूडन्ट्स ङ्गेडरेशन ऑङ्ग इंडियामध्ये झाले. अर्थशास्त्राची पदवी संपादन केल्यानंतर विजयन यांनी हातमागावर मजूर म्हणूनही काम केले.

विजयन आणि त्यांच्या काही सहकार्‍यांना रा. स्व. संघाच्या एका सदस्याच्या राजकीय हत्येच्या गुन्ह्यात सहआरोपीही बनविण्यात आले होते. अर्थात, त्यावेळी विजयन यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. कुशल संघटक अशी विजयन यांची प्रतिमा आहे. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती. या काळात त्यांच्यावर अनेक अत्याचार करण्यात आले, असा आरोप करण्यात येतो. पोलिसांकडून वाईट व्यवहार झेलण्याचा विजयन यांच्या व्यक्तित्वावर सखोल परिणाम झाला. अर्थात, डीवायएफआयचे नेते असताना विजयन हे एखाद्या हुकूमशहासारखे वागत असत आणि आपल्यावरील टीका त्यांना सहन होत नसे, असेही काही जण सांगतात. परंतु कन्नूर जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कार्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांचे ते निकटवर्तीय बनले. त्यानंतर अच्युतानंदन आणि विजयन यांच्यातच पक्षांतर्गत द्वंद्व निर्माण झाले होते.

अच्युतानंदन यांना निवडणूक लढविण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही विजयन यांनी केला होता. परंतु पक्षाने विजयन यांचे म्हणणे स्वीकारले नव्हते. अशी संमिश्र प्रतिमा असलेले विजयन दुसर्‍यांदा केरळचे मुख्यमंत्री झाले आहेत. यूडीएङ्ग आणि एलडीएफ यांना आलटून-पालटून संधी देण्याचा केरळमधील मतदारांचा शिरस्ता विजयन यांच्यामुळे चाळीस वर्षांनंतर मोडला गेला आहे. त्यामुळे विजयन पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. येणार्‍या काळात डाव्या पक्षांचा राष्ट्रीय चेहरा म्हणून पुढे येण्याची क्षमता निश्‍चितपणाने त्यांच्यात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com