- हिमांशू चौधरी

कोरोनावरील कुठली लस किती टक्के प्रभावी? आपल्याकडे कुठली लस येणार? ती आपल्यापर्यंत कधी पोहोचणार? आपल्याला किती डोस घ्यावे लागणार? अशा असंङ्घय प्रश्नांचा कोलाहल मनात घेऊन लोक टीव्हीवरच्या बातम्या पाहतायत.

न्यूज चॅनेलवर मात्र लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. त्यामुळं लवकरच आपल्याला लशीची कवचकुंडलं लाभणार या जाणिवेनं काही लोक अक्षरशः रोमांचित झालेत. एका लशीची (किंवा लशीच्या दोन डोसची) परिणामकारकता किती वर्षांपर्यंत राहील, या प्रश्नापर्यंत पोहोचायला अजून कुणालाही सवड मिळालेली नाही. लशीचे काही दीर्घकालीन दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, हा प्रश्न तर खूपच मागे राहिलाय.

आपल्याकडे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाईल, असा निर्णय झालाय. खरं तर असे निर्णय घेणं खूपच अवघड असतं. उद्योजकता विकास कार्यकङ्घमात ज्याप्रमाणं ‘बुडणार्या जहाजातल्या प्रवाशांना कोणत्या कङ्घमानं वाचवाल,’ असा यक्षप्रश्न विचारला जातो, तसंच हे आहे. सैनिक, शिक्षक, गर्भवती स्त्री, नेता, शास्त्रज्ञ अशी मंडळी या जहाजातून प्रवास करतायत असं सांगितलं जातं. कङ्घमवारी लावून पुन्हा त्यामागचं लॉजिक सांगावं लागतं. परंतु कोरोना लशीच्या बाबतीत दोन्हीकडून पंचाईत आहे. एकतर परिणामकारकतेबरोबरच दुष्परिणामांचीही शहानिशा अजून व्हायचीय. काही ठिकाणाहून उलटसुलट बातम्याही येऊ लागल्यात. भारतातील चाचण्या आणि एका स्वयंसेवकाची तकङ्घार याविषयीच्या बातम्याही आल्या आणि धडकी भरवून गेल्या.

सगळ्यात जास्त घबराट उडवून दिली ऑस्ट्रेलियातून आलेल्या बातमीनं. तिथं क्विन्सलँड विद्यापीठ आणि सीएसएल नावाची बायोटेक कंपनी मिळून लस विकसित करीत आहेत. 216 जणांवर या लशीची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आणि नंतर केलेल्या रक्ताच्या तपासणीत सगळेजण ङ्गएचआयव्ही पॉझिटिव्हफ आढळले म्हणे! सध्या या लशीची चाचणी थांबवलीय; पण लस घेणार्यांना खरोखर एचआयव्ही झालाय की तशी फक्त लक्षणं दिसतायत, हे खूप उशिरा स्पष्ट झालं; पण तोपर्यंत संबंधितांना हृदयविकाराचा झटका येण्याची चिन्हं दिसू लागली. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, लस दिल्यानंतर संबंधितांच्या शरीरात अशा काही अँटीबॉडीज तयार झाल्या, ज्यामुळं त्यांचे एड्सचे अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागले. काहीही झालं तरी चाचण्यांच्या बाबतीत यापुढं सावधगिरी बाळगूनच पुढे जाण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारनं घेतलाय. अर्थात आपल्याकडच्या काही लोकांना ऑस्ट्रेलियापेक्षा रशियातून आलेली बातमी जास्त भयानक वाटली.

स्फुटनिक नावाची लस रशियात तयार झालीय आणि तिच्या चाचण्याही झाल्यात. पण लशीचा डोस घेतल्यानंतर दोन महिने संबंधितांनी मद्यपान करू नये, असं रशियाच्या आरोग्य विभागानं कळवलंय. शिवाय, लस घेतल्यानंतरसुद्धा दोन महिने मास्क वापरायचा, गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही, सॅनिटायजरचा वापर करायचा, हे नियम आहेतच. खरंतर नियमांचा कंटाळा आलाय, म्हणून लस हवीय. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क लावून फिरावं लागेल, हे आपल्याकडच्या काहींना रुचलेलं नाहीये. त्याहून जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे, लस घेतल्यावर दोन महिने घ्यायची नाही..? खरं तर कुणीच काही घ्यायला बाहेर पडत नव्हतं, तेव्हा बाहेर पडण्याचं धाडस केलं ते ङ्गघेणार्यांनीफ! त्यांना पुन्हा ‘असलं’ धाडस करायला लावायचं? रशिया आणि बिङ्घटनमध्ये नागरिकांना लस द्यायला सुरुवातसुद्धा झालीय. इतकी महत्त्वाची गोष्ट इतक्या उशिरा सांगतं का कुणी?