एसटीला गळफासाचे ग्रहण

एसटीला गळफासाचे ग्रहण

नाशिक | Nashik | नरेंद्र जोशी

राज्यात रोज 65 लाख प्रवाशांंची सुखरुप प्रवासाची काळजी घेणारे एसटी महामंडळातील (ST Corporation) एक लाख कर्मचारी (Staff) सातत्याने घडत असलेल्या आत्महत्यांमुळे (suicides) व्यथीत होत आहे.

आर्थिक संकटामुळे (financial crisis) एक लाख कर्मचारी आणि त्यांचे प्रत्येकी 4 सदस्य असे एकूण 5 लाख लोकांंच्या रोजी रोटीचा प्रश्न एसटी महामंडळावर अवलंबुन आहे. मात्र या महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कर्मचारी वर्गही आर्थिक गर्तेत सापडला असुन गेल्या वर्षी सात मार्च 2020 पासुन आत्महत्येचे ग्रहण लागले आहे. ते अद्याप सुटलेले नाही.

आतापर्यंत राज्यभरातील 29 कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सगळ्या प्रश्नांवर आत्महत्या हा पर्याय नाही. हे कर्मचार्‍यांना कोण आणि कधी समजवणार? आत्महत्या म्हटलं की डोळ्यासमोर एक विदारक चित्र उभं रहाते. ते म्हणजे जगाचा पोशिंदा बळीराजचे कालपर्यंत शेतकरी आत्महत्या (farmer suicide) चर्चेत होत्या. आता एसटी कर्मचारी चर्चेत आहेत.

बदलत्या जीवनशैलीमूळे (lifestyle) वाढत चाललेले अनपेक्षित खर्च व समाजापुढे आपल्या राहणीमानाचें सादरीकरण उच्च राहण्यासाठी होत असलेले अवास्तव खर्च. उत्पन्नांवर आलेल्या मर्यादा अशा बर्‍याच गोष्टी याला कारणीभूत आहेत. 35 वर्षापुर्वी शिक्षकापेक्षा जादा पगार घेणारे हे कर्मचारी होते. त्यामुळे काही जणांनी शिक्षकी पेक्षाला रामराम ठोकुन कंंडक्टर, वाहतूक नियंत्रक होणे पसंत केले होते.

आता मात्र काळाचे चक्र फिरले. अत्यल्प पगारमुळे कर्मचारी कर्जाच्या विळख्यात गुरफटून जात आहेत. कर्ज फिटेल आज ना उद्या परिस्थिती सुधारेल असा विचार करत कर्जाचा डोंगर वाढत जातो. आणि त्याचा परिणाम आत्महत्येपर्यंत जावून पोहचतो. आत्महत्या केल्याने कोणाचेही प्रश्न सुटतच नाही. उघड्या पडलेल्या संसाराकडे समाज फक्त थोडे दिवस सहानुभूतीने पहातो. तेही काही ठरावीक संवेदनशील लोकच अगदी जवळचे तेवेढेच मदत करतात.

इतरांना कोणतेही सोयरे-सुतक नसते. वाढत चाललेली महागाई (inflation), मुलांचे शैक्षणिक खर्च, कामाच्या ताण- तणावामुळे (Stress) होणारे आरोग्याचे खर्च आणि खर्चाच्या तुलनेमध्ये मिळणारे वेतन. जमा - खर्चाचा ताळेबंद बसत नसल्यामुळे वाढत चाललेलं कर्जबाजारीकरण अशा अनेक गोष्टी याला कारणीभुत आहेत. पण आत्महत्या हा त्यावर पर्याय नाही. गरज आहे ती म्हणजे आपली आणि आपल्या कुटुंबियांच्या सबलीकरणाची.

उत्पन्नाचे विविध स्त्रोत म्हणजेच मार्ग तयार करण्याची. मात्र तोच मार्ग त्यांंना सापडत नाही. आजूबाजूची परिस्थिती पाहून एखादा छोटासा कोणताही चांगला व्यवसाय सुरू केला, ग्रामीण भागात रहात असाल शेतीशी निगडीत एखादा व्यवसाय केला तर पर्याय निघु शकतो. एखादी कला असेल किंवा आपण विशिष्ठ क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण घेतलें असेल तर त्याच्याशी निगडीत एखादा व्यवसाय केला, घरच्या हातांना काम दिले. तर आर्थिक हातभार लागु शकतो, कर्जाचा विळखा कमी होऊ शकतो.

एखादा व्यवसाय करणं शक्य नसेल तर अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवले. मुलांना चांगले शिकवुन चांगले संस्कार केलेे. खर्च कमी केले. तरी यातुन मार्ग निघु शकतो. त्यासाठी महामंडळाने आणि कर्मचार्‍यांच्या जिवावर संघटना चालवीणार्‍या डझनभर कामगार संघटनांनी वेळीच पावले उचलण्याची आवश्यकता आहे. आत्महत्येचे भांडवल करुन केवळ राजकारण करण्यात काही अर्थ नाही.

Related Stories

No stories found.