नाशकात 10 ठिकाणी ‘इट राइट प्लेस’

नाशकात 10 ठिकाणी ‘इट राइट प्लेस’

नाशिक | रवींद्र केडिया | Nashik

अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने मुंबई-पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातही ‘इट राइट प्लेस’अर्थातच सुरक्षित अन्नपदार्थ मिळणार्‍या ठिकाणांंची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील गर्दीच्या 10 जागांची निवड केली आहे. यासोबतच शैक्षणिक संस्थांच्या कॅन्टीन चालकांनाही सुरक्षित अन्न देणे बंधन कारक करण्यात येणार आहे.

शहरातील या ठिकाणी दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावे, यासाठी गोविंदनगर, नाशिक रेस्टॉरन्ट क्लस्टर, कॉलेजरोड, सिटी सेंटर मॉल फुड हब, नवीन नाशिक, तिबेटीयन मार्केट यासह शैक्षणिक संस्थांच्या कॅन्टीन या भागांचा विचार करण्यात आलेला आहे.

व्यवसायाचे ठिकाण, आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवावा लागणार असून, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणार्‍या तेलापासून सर्व प्रकारचे मसाले व कच्चा माल दर्जेदार असणे आपेक्षित राहणार आहे. या ठिकाणच्या खाद्यपदार्थ विक्रेते व त्यांच्याकडे काम करणार्‍या कामगारांनाही स्वच्छतेबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांना अन्न सुरक्षिततेसाठी डोक्यावर सुरक्षा टोपी व कापडी अ‍ॅप्रॉन घालणे बंधनकारक राहणार आहे.

या सर्व नियमांची अंमलबजावणी केल्यानंतर संबंधित व्यावसायिकांना केंद्रांच्या फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या ठिकाणी ‘सुरक्षित अन्न मिळते’ (इट राइट प्लेस) असा फलक लावण्यात येणार आहे. संबंधित व्यावसायिकांनी दर्जा कायम टिकवून न ठेवल्यास त्यांच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले जाणार नसल्याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली.

नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी शहरातील गोविंदनगर नाशिक रेस्टॉरंट क्लस्टर, कॉलेजरोड, सिटी सेंटर मॉल फूड हब, सिडको, तिबेटीयन मार्केट यासह शैक्षणिक संस्थांच्या कॅन्टीनमध्ये सुरक्षित अन्न मिळणार आहे. या ठिकाणी व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना स्वच्छतेचे सर्व प्रकारचे नियम पाळावे लागणार आहेत.

Related Stories

No stories found.