Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedआयुक्तालय हद्दीत हजारो वाहने धूळखात

आयुक्तालय हद्दीत हजारो वाहने धूळखात

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik Police Commissionerate) हद्दीत असलेल्या विविध पोलीस ठाण्यात (police station) विविध गुन्ह्यांमध्ये जमा असलेल्या हजारो दुचाकींसह (bike), चारचाकी धूळखात पडून आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यातर्फे सदर गाड्या त्यांच्या मालकांनी घेऊन जाव्या, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र त्यास हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.

- Advertisement -

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 13 पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यात विविध गुन्हे (crime), तसेच मोटारसायकल चोरांकडून (Motorcycle thieves) हस्तगत केलेल्या हजारो दुचाकी, चारचाकी गाड्या ऊन, वारा, पाऊस सहन करत पडून आहेत. ह्या गाड्या सोडवण्याकरिता संबंधित पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी प्रथम सदर वाहनाचे सर्व कागदपत्रे तपासणी (Document check) करतात. त्यामध्ये आर.सी. बुक (RC Book), गाडीचा विमा (vehical insurance), पी.यु.सी. (PUC) आदी कागदपत्रांचा समावेश आहे. जर संबंधित मालकाकडे सदर कागदपत्रांची पूर्तता असेल तर संबंधित अधिकारी न्यायालयाला लागणार्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देतो.

त्यानंतर वकील व न्यायालयीन प्रक्रिया (Lawyers and court proceedings) व त्यानंतर पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन जमा वाहन सोडवणे अशी प्रक्रिया राबविली जाते. ह्यामध्ये वकिलाच्या कामाचे शुल्क, न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासाठी लागणार खर्च वाहन मालकाला करावा लागतो. आणि या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्वतःचा काम धंदा सोडून खर्च होणार वेळ. यामुळे बरीच वाहन मालक (Vehicle owner) आपली गाडी सोडून न नेणे पसंत करतात आणि ज्या वाहन मालकांकडे कागदपत्रांची पूर्तता नसते त्यांनी गाडीचा विषयच सोडला असतो. हे सर्व होत असतांना पोलीस ठाण्यात जमा असलेल्या वाहनांची नोंद ठेवण्यासाठी एका पोलीस कर्मचार्‍याची नेमणूक केली असते.

बर्‍याच पोलीस ठाण्यात शेडअभावी वाहने उघड्यावरच लावल्याने शेकडो वाहने अक्षरशः गंजलेल्या अवस्थेत पडून आहेत. ठरावीक वर्षानंतर सदर गाड्या ह्या प्रसारमाध्यमांमध्ये नोटीस देऊन भंगारमध्ये विक्रीस काढल्या जातात. परंतु ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पोलीस ठाण्याची मोठ्या प्रमाणावर जागा व्यापली गेल्याने पोलीस ठाण्यास बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. या प्रश्नांकडे पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर्‍याने बघून काहीतरी उपाययोजना करावी, अशी चर्चा पोलीस खात्यात दबक्या आवाजाने सुरु असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या