वातावरण शेतकर्‍यांच्या मुळावर

वातावरण शेतकर्‍यांच्या मुळावर

सायगाव । एकनाथ भालेराव | Saigaon

अवेळी पाऊस (Unseasonal rain), वातावरणात अचानक होणारे बदल (climate change) यामुळे पिकांंवर वाढणारे कीड व रोगांचे (Pests and diseases) वाढते प्रमाण यामुळे शेतकरी (farmer) अडचणीत सापडला आहे. पूर्वी कडक ऊन, पावसाळ्यात पाऊस पडायचा आणि हिवाळ्यात थंडी (cold) पडायची, आता पावसाला पावसाळाच हवा असे नाही.

कधीही हा बिगरमोसमी अवेळी पडणारा पाऊस यामुळे शेतीचेही अर्थशास्त्र बिघडले आहे. जागतिक तापमान वाढ (Global warming) याला कारणीभूत मानत असले तरी संपूर्ण जग निसर्गाच्या विविध कोपांना सातत्याने सामोरे जात आहे. पावसाळ्यात पाऊस एकाच वेळी बहुतांशी भागत पडत असे, आता एका भागात अतिवृष्टी (heavy rain) तर अन्यत्र अवर्षण असे चित्र दिसते. वातावरणातही बदल होत आहे. बहुतांशी वेळी ढगाळ वातावरण (Cloudy weather) असल्याचे जाणवते. हे वातावरण पिकांवर पडणारे विविध रोगांना पोषक असते. त्यामुळे शेती व्यावसायाला हे घातक ठरत आहे. यामुळे पीक पॅटर्न (crop patern) बदलण्याची गरज भासू लागली आहे.

सध्या शेतातील कपाशी, कांदे, गहू, हरभरा आदी पिकांंवर बुरशीजन्य,बोंडअळी, कीड, कीटक, मावा,करपा, मुळकूज, मिलीबग (खवल्या) आदी रोगांनीं हल्ला केला आहे. महागडी औषधे फवारुन शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. त्यातच भाव, योग्य बाजारपेठ आदी समस्या शेतकर्‍यांपुढे असतात. कांंदा, भाजीपाला यांना बाधा होते. त्यातून मका पीक हे जरी तग धरुन असले तरी त्या मका पिकांवर गेल्या तीन वर्षांपासून लष्करी अळीने जबरदस्त हल्ला केला आहे.

नाशिक जिल्यातील (nashik district) कांदा (onion) पिकवणार्‍या भागात जमिनीतील बुरशीचे प्रमाण वाढून कांद्यावर पीळे पडणार्‍या रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे , भविष्यात कांदा पीक या रोगामुळे मोठ्या प्रमाणावर धोक्यात येऊ शकते, असे कांदा संशोधक याचे मत आहे पिकपद्धती बदलून या हवमानाला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न होण्यासाठी शेतकर्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. शेडनेट (Shednet), पॉलिहाऊसमध्ये (Polyhouse) पिके घेण्याची वेळ आली आहे. या दोन्ही मध्ये वातावरण नियंत्रित करण्याची ताकद आहे.

सरकारने यासाठी सर्वसामान्य शेतकर्‍यांना अनुदान देण्याची गरज आहे. सरकार अनुदान देते पण ते मर्यादित शेतकर्‍यांना! सर्व शेतकर्यांना यातून पुढे नेण्यासाठी सर्वच शेतकर्यांना अनुदानाची गरज आहे. यासाठी लाभार्थ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. ड्रॉ काढला जातो, 500 शेतकर्‍यांमधून पाचच लाभार्थी ठरतात.

ऊसासारखे पीक, तसेच औषधी वनस्पतींच्या लागवडीची गरज निर्माण झाली आहे. तेलबिया त्यात सूर्यफूल, करडई यांचे उत्पादन घेणेबाबत व त्यांना बाजारपेठ निर्माण होणेसाठी सरकारी यंत्रणेने शेतकर्‍यांनी मार्गदर्शनाची गरज आहे. मसाल्याचे कोणते पीक आपल्याकडे येते, शेतकर्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणार्‍या पिकांची लागवडी साठी उद्बोेधन होणे गरजेचे आहे.

येवला तालुक्यात कपाशीचे क्षेत्र घटले आहे. वातावरणाचा अनिष्ठ परिणाम अनेक पिकांवर झाला. अवेळी पावसाने बहार व्यावस्थापन होत नाही. मावा,करपा, देवी, मुळकूज, मिलीबग, लोकरीकिड यांचा प्रादूर्भाव होतांना दिसत आहे. औषध फवारणीवर मोठा खर्च होतो. शेतकर्‍यांना मोठ्या अर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस वातावरणात मोठे बदल होत आहे. पावसाळा नेमका कधी हे कोढे आता अलिकडे पडत आहे. याचा परिणाम म्हणून उभी पिके रोगांनी जर्जर होतात.

परिणामी शेतकर्‍यार्ंंचे नुकसान होते. यासाठी आता पीक पॅटर्न बदलण्याची वेळ आली आहे. रोगांना प्रतिकार करणार्या वाणांचे संशोधन होणे आता गरजेचे आहे. याशिवाय कोणत्या पिकांवर अशा वातावरणात रोग येत नाही, अशी नगदी पिके घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पॉलिहाऊस, शेडनेट यासाठी सरकारने सरसरकट सर्वच शेतकर्‍यांना अनुदान देण्याची गरज आहे, असे मत सेवानिवृत्त कृषी अधिकारी अशोकराव कुळधर यांनी व्यक्त केले आहे.

पिकांवरील कीड रोगांना पॉलिहाऊस गरजेचे आहे. बंदीस्त पॉलिहाऊस असल्याने पिकांवर रोग येत नाही. पावसाळ्यात काही पिकासाठी योग्य आहे. ढोबळी मिरचीसारखे पिक ओपन प्लेस मध्ये लावले तर ढोबळी खराब होते. त्यामुळे पॉलिहाऊस मध्ये लागवड गरजेचे आहे. निवडक पिकांना हे पॉलिहाऊस गरजेचे आहे. यात सुधारित वाण लागवाडीची निवड करणे गरजेचे असते.

अशी प्रतिक्रिया शेतकरी दिनेश खैरनार, ज्ञानेश्वर भालेराव, कुणाल एंडईत यांनी दिली. तर सायगाव येथील शेतकरी रघुनाथ खैरनार यांच्या मते शेतकर्‍यांंना नुकसानीपोटी पंचनामे करून अनुदान देण्याचा जो शासन प्रयत्न करते तो फारच तोकडा आहे आणि मिळणारे अनुदान व होणारे नुकसान याची तुलना केली तर अनुदानातून शेतकर्‍यांना काहीच फायदा दिसत नाही त्यापेक्षा शेतकर्‍यांच्या मूलभूत गरजा आहे त्या आशा नियमित योग्य दाबाने दिवसा वीज पुरवठा करावा,व शेतीमालाला उत्पादन खर्चावर नफा देणारा हमीभाव द्यावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com