डोंगर्‍यादेव उत्सवः  संवर्धन संस्कृती

डोंगर्‍यादेव उत्सवः संवर्धन संस्कृती

मोहबारी । शाहू चव्हाण | Mohbari-Kalwan

कळवण तालुक्यातील (kalwan taluka) पिंपळे खुर्द, आंबुर्डी (बु),लखाणी, सुळे जयदर, खंडकी, पाडगण यांसह आदी भागातील वाड्या पाड्यात डोंगर्‍यादेव (Dongaryadev) उत्सव (festival) आनंदाच्या वातावरणात पार पाडण्यात येत आहे.

भारतीय लोकजीवनात संस्कृतीचे संवर्धन (Cultivation of culture) व्हावे म्हणून आदिवासी (Tribal) ही व्रते अगदी काटेकोरपणे व तितकेच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करीत आहे. आदिवासींचे कुलदैवत समजले जाणारे डोंगर्‍यादेव उत्सव कळवण तालुक्यासह खेड्यापाड्यात डोंगर्‍या देव उत्सव झाले आहे. यावेळी साधारणपणे मार्गशीर्ष महिन्यात चंद्र दर्शनानंतर निसर्गदेवता (Goddess of nature) डोंगर्‍यादेवाला आदिवासी बांधवांकडून (Tribal community) नवस केला जातो. डोंगर्‍यादेव उत्सव हा आठ ते पंधरा दिवसांचा नवस असतो. गावकर्‍यांकडून गावाच्या मध्यभागी येऊन देव खळी तयार केली जाते.

त्या ठिकाणी पूजा मांडली जाते. देव थोबाजवळ नारळ, खारीक, सुपारी, दिव्याचे ताट, हळद, कुंकू, झेंडू व तुळस रोपले जाते. पाच प्रकारचे फळे, घोड्याची काठी अशी पूजेच्या साहित्याची मांडणी केली जाते. आणि त्या देव खळीवर दररोज रात्री मावल्या डोंगर्‍या देवाचे गाणे म्हटले जाते. आदिवासी देवतांचे गाणी गौरवाने गायली जातात. एका तालासुरात माऊल्या आपले नाचकाम करत असतात. त्यामध्ये एका दिवशी चोख्यांचा कार्यक्रम ठेवला जातो. त्यात विविध प्रकारचे आदिवासी देवांचे पात्र घेऊन खेळ केला जातो.

डोंगर्‍या देव कार्यक्रमाला विविध पात्र घेऊन आदिवासी बांधव परंपरेने हा कार्यक्रम साजरा करत असतात. त्यामध्ये हे पात्र एक एक करून प्रत्येकाला आपली जबाबदारी सोपविली जाते. यामध्ये मुधानी माऊली, खुट्या, बुवा, पावरकर, माऊली, शिर माऊली, आणि इतर माऊली असतात. दुसर्‍या गावाला जाऊन नाचगाणे करुन शेझ दशिना गोळा करून सायंकाळी आपल्या देव खळीवर जमा केली जाते.

अशा प्रकारे 8-15 दिवसांचा हा कार्यक्रम चालतो. आदिवासी संस्कृतीत पोरम, सोरम, ढोरंम, गुरम, शेतीम बाडीम, पाऊस, पानी, धंदाम, सुख, साया, देजोहार, अशाप्रकारे आदिवासी हा डोंगर्‍या देव परंपरागत उत्सव मोठ्या आनंदाने व श्रद्धेने साजरा करतात. आसा हा आठ ते पंधरा दिवस चालणार डोंगर माऊलीचा उत्सव परीसरातील नागरीकांचे लक्ष वेधून घेतो.

पौर्णिमेच्या (pournima) दिवशी रान खळीवर आदिवासी बांधव जातात. सर्व माऊल्या रात्री साडेसात ते आठ वाजता आपल्या गडावर जाऊन त्या ठिकाणी शेणाने सारवून व धवळा कोरा शेला मांडून त्यावर सवाशे पूजा टाकल्या जातात. डोंगर्‍या देवांची पूजा गऊळावर जाऊन मांडल्यावर त्यावेळी आदिवासी बांधव निसर्गदेवताला आव्हान करुन ह्या सृष्टी वरील सर्व प्रकारचे सजीव, पशु, पक्षी यांचे कल्याण व त्याच्यासाठी प्रार्थना केली जाते.

पुन्हा पहाटे चार ते पाच वाजता गडावरती जाऊन दर्शन घेऊन सर्व माऊल्या धाणी च्या ठिकाणी जातात. तिथे जाऊन देवाला कोंबडा, बोकड याचा मान देऊन संध्याकाळी गावात भंडार्याचा कार्यक्रम केला जातो. आदिवासीची निसर्गदेवता पुढे मागायची वळवणी केली जाते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com