Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedप्रधानाची महिला सेविकांना दिवाळी भेट

प्रधानाची महिला सेविकांना दिवाळी भेट

नाशिक | बिरबल | वैभव कातकाडे Nashik

आटपाट नगराचा प्रधान कोणत्या ना कोणत्या चांगल्या वाईट गोष्टीने चर्चेत राहत असे. प्रधानाच्या दरबारात आता दिवाळी सणानिमित्त (diwali festival) जोरदार तयारी सुरु होती. महिलां कर्मचार्‍यांच्या (women employees) प्रती संवेदनशीलता असलेला हा प्रधान, त्याची पर्यावरणवर देखील जागरूकता होती. आपल्या नगरातील सर्वांना त्याच्या परीने क्षेमकुशल ठेवण्यासाठी ना ना प्रकारच्या उपाययोजना तो करत असे.

- Advertisement -

दिवाळी सणाला आपल्या नगरात जातीने उपस्थित राहता यावे यासाठी प्रधानाने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरच दौरा केला होता. दौरा करून नगरात प्रवेश करताच प्रधानाच्या वरिष्ठ वतनदारानी आनंदाची बातमी प्रधानाला दिली. नगरातील जनतेच्या सौभाग्याचे लेणे हिसकावून नेणार्‍या 56 ठिकाणी गुन्हा करणार्‍या चोरट्या बदमाशाला जेरबंद करण्यात आले असून त्याच्यासोबत गुन्हा करणार्‍यांनाही जेरबंद केले आहे.

त्यांच्याकडून चोरीच्या वस्तू (Stolen items) हस्तगत करण्यात आल्या असल्याची वार्ता कानावर पडताच प्रधानाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठा सोहळा आयोजला. तुम्ही दवंडी पिटवा; सगळ्या नगरात ही आनंदाची वार्ता जाऊ द्या. ज्यांनी ज्यांनी या शुभ कार्यात आपली जबाबदारी पार पाडली त्यांचा गौरव करण्याचा हुकूमही प्रधानाने लगेच दिला.

दरबाराच्या आवारात सोहळा झाला; सर्वांना प्रधानाच्या या अनोख्या कौतुकाचा अभिमान वाटला. अर्थात त्याला किनारही सोनेरी होती. सेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा तो क्षण होता. या आणि अनेक कारणांमुळे प्रधान हा सेवक वर्गाच्या गळ्यातील ताईत झाला होता. प्रधानाच्या कारकिर्दीत काम करण्याचा हा अनोखा अनुभव सेवक, वतनदार अनुभवत होते. यातच सण उत्सव असल्याने त्यात भरच पडली. सण उत्सवानिमित्त आपल्या नगरात शांतता नांदावी. आनंदात प्रत्येकाने हा उत्सव साजरा करावा यामुळे प्रधान नियोजन करत होता.

दिवाळी सण हा आनंद वाटण्याचा सण. आनंद वाटून द्विगुणित करायचा असतो. असा विचार करत असतानाच प्रधानाने वरिष्ठ उपप्रधानाला दरबारात पाचारण करण्यासाठी हुकूम सोडला होता. प्रशासन बघणार्‍या उपप्रधानाला थोड़ा वेळ चिंतन करण्यात गेला; चिंतन याचे की, सण समोर आलाय आणि अचानक का पाचारण केले असावे.

उपप्रधान दरबारात हजर होताच प्रधानाने दरबार, कार्यक्षेत्र येथील एकूणच सेवकांचा आढावा घेतला. आढावा घेऊन झाल्यावर दिवाळी सणानिमित्त काय भेट द्यायची याचा विचार करत करत सल्लामसलत करू लागला. अचानक प्रधानाच्या मनाला एक विचार शिवून गेला. दिवाळी सणानिमित्त महिला सेवकांना घरातही जरा जास्त काम बघावे लागले. त्यांना एवढा हप्ताभर अर्धी सुटी दिली तर.. विचार मनात येताच सोबत असलेल्या कायद्याच्या पुस्तकांमधून नियम काढला आणि प्रधानाने लागलीच त्याचा अंमल करण्यासाठी दवंडी देण्याचा हुकूम सोडला. उपप्रधानाने देखील या आनंदाच्या वार्तेला दवंडीच्या माध्यमातून सर्व महिला सेवकांपर्यंत पोहचविले.

महिला सेवकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. असा प्रधान मोठ्या पदावर जावो आणि सगळ्या महिलांना दिवाळीनिमित्त भेट म्हणून सूट मिळो असा विचार महिला सेवकांचा एक वर्ग करू लागला. अशा या एका निर्णयामुळे प्रधानाबद्दलचे मत सकारात्मक होऊन संपूर्ण नगरात त्याचे कौतुक होऊ लागले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या