राजकारणात अडकला नाशिकचा विकास

jalgaon-digital
5 Min Read

नाशिक | रवींद्र केडिया | Nashik

शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आगामी दोन वर्षांत येणारा सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) आणि त्याची पूर्वतयारी हा सगळ्यात मोठा विषय मार्गी लावणे सध्या गरजेचा आहे.

अमृत योजनेअंतर्गत औद्योगिक क्षेत्रातील (Industrial sector) भूमिगत गटारी (Underground sewers), शहरातील दूषित पाणी (Contaminated water) शुद्ध करण्याचा प्रकल्प, गोदावरीच्या (godavari) स्वच्छतेसाठी विशेष कृती आराखडा तयार करणे, या सर्व गोष्टींची चर्चा होणे तितकेच आवश्यक आहे. दुर्दैवाने याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. नाशिकचे (nashik) पालकत्व आणि नाशिकचा विकास (Development of Nashik) हे नेहमीच विवादित राहिले आहे.

शिवसेना (shiv sena) – भाजप (bjp) युतीच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) नाशिक दत्तक (adoption) घेतले आणि पदरात दान मागितले. नाशिककरांनीही अतिशय उत्स्फूर्तपणे तीनही जागा भाजपच्या पदरात टाकल्या. नाशिकच्या महानगरपालिकेवरही (Municipal Corporation) युतीचा झेंडा रोवला. मात्र नाशिकच्या विकासाला गती देण्याचे काम त्या कार्यकाळात संथपणे चालले होते.

मुंबई (mumbai), पुण्यानंतर (pune) नाशिकचा विकास गतीने होईल आणि नाशिकला वैभव प्राप्त होईल, औद्योगिक विकासाला (Industrial development) गती येईल, असे काहीसे स्वप्न अशी नाशिककरांनी मनात धरले होते. पर्यटनाला (Tourism) प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने नाशिकचा वारसा प्रकर्षाने जगासमोर आणण्याची गरज आहे. मात्र त्याचे फारसे काही झाल्याचे दिसून आले नाही.

किंबहुना युतीच्या कार्यकाळापूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal) यांच्या माध्यमातून नाशिकने विकासाच्या अनेक वाटा विस्तृत केल्या. त्यात प्रामुख्याने नजरेत भरणारा मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) उड्डाणपूल (Flyover) होय. मग वॉटर स्पोर्ट्स ( water sports) असेल, कलाग्राम उद्यान (Kalagram Park) यासारख्या विविध बहुउद्देशीय प्रकल्पांना गती देत पर्यटनाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमीवर मागील अडीच वर्षात आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावर नेतृत्वाखाली राज्याचा विकासाचा गाडा ओढण्याचा प्रयत्न झाला. दोन वर्षांच्या करोनाच्या कार्यकाळामुळे नाशिकचे काय, भारत, संपूर्ण जग स्तब्ध झाल्याचे चित्र होते. मात्र त्यानंतर जी गती येणे अपेक्षित होते ती गती अद्यापही नाशिककरांनी नाही.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारला पायउतार करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संयुक्त विद्यमाने नवे सरकार कार्यरत झाले. नाशिककरांंच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहे. नाशिकचे पालकत्व स्वीकारणारे तत्कालीन मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत आहे. त्यामुळे त्यावेळी जी स्वप्न पुन्हा एकदा प्रत्यक्षात साकारतील काय, अशी अशा नाशिककरांना लागली होती. नाशिककरांंच्या वाटेला पुन्हा एकदा राजकीय चढाओढच आली.

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडता पडता उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. त्याचीच प्रतिकृती म्हणावी की काय, नाशिक जिल्ह्याचे (nashik district) पालकमंत्री पद मिळता मिळता गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची जबाबदारी बदलण्यात आली. शिवसेनेचे बंडखोर आमदार दादा भुसे (MLA Dada Bhuse) यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे असल्यामुळे दादाजी भुसे यांंच्या माध्यमातून नाशिकचा विकास गती घेईल, अशी काहीशी अशा नाशिककरांना लागलेली आहे. मात्र सत्ता मिळाल्यानंतर भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील श्रेयवादाचा लढा गतिमान झाल्याचे दिसून येऊ लागले.

पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला भाजपच्या आमदारांंना निमंत्रण दिले नसल्याचा कांगावा करीत भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. पालकमंत्र्यांनी मनपा, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेण्याचे निश्चित केले. प्रत्यक्षात महापालिकेच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत अनेक विषयांवर सखोल चर्चा करून निर्णय होणे गरजेचे होते. मात्र तसे काहीसे झाले नाही. ते आले, त्यांनी बैठक घेतली आणि ते गेले, एवढेच काय ते सोपस्कार पार पडले.

याच धरतीवर मुख्यमंत्री एकनाथ यांच्याकडे अगोदरही बैठक लावण्यात आली होती. त्यात एकमेव अजेंडा ठेवण्यात आला होता नाशिकचा विकास. मात्र ती बैठक झालीच नाही. त्यानंतर नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे बैठक होणार असल्याची सूचना देण्यात आली. मात्र ही बैठक देखील रद्द झाल्याचे समजते. यातून एकच निष्कर्ष समोर आला तो म्हणजे राज्यातील नेत्यांना नाशिकबद्दल असलेल्या उत्साहाचा प्रत्यय. या बैठकीवरून एकदा शिंदे गट आणि भाजप यांच्या पदाधिकार्‍यांमध्ये श्रेयवादाचा कलगीतुरा रंगला.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी केले असल्याचा दावा केला होता तर सीमा हिरे यांनी आपण ही बैठक लावली असल्याचे सांगितले. त्यामुळे न झालेल्या बैठकीवरून दोनही नेत्यांमध्ये चांगलाच संवाद रंगला. नाशिक शहराचा विकास विचार केल्यास हेमंत गोडसे हे म्हणून शिवसेनेच्या गटातून निवडून आले. मात्र ते शिवसेनेत कधी रमलेच नव्हते.

शिवसेनेच्या (shiv sena) बैठकांना अथवा शिवसैनिकांच्या गोतावळ्यात ते कधी जमलेच नाही, रमलेच नाही. आजही त्यांची काहीशी परिस्थिती तशीच दिसून येते. आज शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांमध्ये अथवा भाजपमध्ये ते बनवा असल्याचे समोर येऊ लागले आहे. शिवसेना पक्षवाढीसाठी विविध शाखांच्या स्थापनेसाठी तसेच पक्षाच्या विशेष काही प्रयत्न नाशिक जिल्ह्यातून होत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आगामी काळात नाशिक विभागात शिवसेनेविरुद्ध शिवसेनाच लढत होईल की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *