'स्वयंचलित यंत्रणा' उद्योगांना अनिवार्य
फिचर्स

'स्वयंचलित यंत्रणा' उद्योगांना अनिवार्य

दैनिक देशदूत वर्धापन दिन विशेष

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

जगभरातील तंत्रज्ञानाच्या प्रवासाची वेळ दशकापासून काही वर्षांपर्यंत कमी झाली होती. नजीकच्या काळात हा प्रवास काही महिन्यांवर आलेला असेल. या नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी उद्योजकांच्या नव्या पिढीला सज्ज राहण्याची गरज आहे...

रिषभ गोलिया | नाशिक

तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनने गेल्या काही दशकांत जगण्याची पद्धत कमालीची बदलली आहे. आपण सध्या ‘मार्स’वर राहत नाही किंवा स्वत:ची कार घेऊन आपल्या कामावर जात नाही. परंतु तंत्रज्ञान इतक्या वेगाने वाढत असल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे येणारी वर्षे आपल्याकडे विकास गतिमान होणार आहे. तेव्हा आपण स्वतंत्र कारमध्ये बसून आपल्या कामासाठी कार चालवत जाणार आहोत.

अलीकडच्या काळात तंत्रज्ञान व स्वयंचलित उत्पादन यंत्रणा तयार करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स आणि सर्व्हिस इंडस्ट्रीजपासून प्रत्येक उद्योगात विकासकाम गतिमान पद्धतीने चालू आहे. आधुनिक उत्पादनांतून ग्राहकांच्या वाढत्या गरजा त्यामुळे भागू शकतील. आयुष्य सोपे, आरामदायक आणि अधिक सुकर होईल. मानवी कामाचे तास कमी होणार आहेत. कामाचे तास आठवड्याला 60 ते 48 वरून 40 ते 36 कालांतराने खाली येऊ शकतात. भविष्यात कदाचित आठवड्यातून 20 किंवा 24 तास कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान हेच कारण ठरणार आहे.

येणार्‍या काळात कामाची गुणवत्ता आणि जटीलता वाढत जाणार आहे हे निश्चित! उच्चशिक्षित लोकच त्याचा सामना करू शकतात. ‘करोना’ महामारीमुळे आज घरून काम करणार्‍या लोकांची संख्या वाढत आहे. येणार्‍या काळात बहुसंख्य लोक घरातूनच संगणक, मेल आणि व्हिडिओद्वारे व्यवहार करतील.

आपल्या उद्योगात आपण इंडस्ट्री 2.0 पासून खूप पुढे आलो आहोत. तेव्हा कामगार जास्त होते. परंतु मोठ्या प्रमाणात उत्पादन नव्हते. मात्र आता आम्ही ‘इंडस्ट्री 4.0.0’ या मॉडेलमध्ये काम केले. ते इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) सिस्टिमवर काम करत आहे. काम करणार्‍या मशीनऐवजी काही सिस्टिम काम करू शकत नाहीत. तेथे तंत्राचा वापर गरजेचा झाला आहे. यंत्रांशी बोलणारे यंत्रमानव, प्रगत तंत्रज्ञानयुक्त साधने व कमी श्रमात जास्त उत्पादन केले जाणार आहे. आज उद्योगांत काम करणारी माणसे आहेत.

सतत वाढणार्‍या स्पर्धा व वाढणार्‍या बाजारासाठी उत्पादनाची गुणवत्ता टिकवणे व गतीने उत्पादन देणे भविष्यात कठीण होत जाणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. त्यासोबतच गुणवत्ता व वस्तुमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानयुक्त स्वयंचलित यंत्रणेकडे जाणे काळाची गरज होणार आहे. ज्या उत्पादकांना या तंत्रज्ञानावर चालणारी यंत्रणा परवडेल त्यांची उत्पादन क्षमता वाढणार आहे.

अमेरिकेतील उद्योजक एकेकाळी जे उत्पादन करत ते केवळ अमेरिकन लोकांना परवडणारे होते. हळूहळू ते युरोप व आता आशिया आणि आफ्रिकेतील बर्‍याच देशांना परवडणारे होऊ लागले आहे. तंत्रज्ञानाच्या वेगवान वाढीसह हे शक्य झाले आहे. उदा. पूर्वी ‘2 जी’ होते. नंतर ‘3 जी’ आले. आता ‘4 जी’पर्यंत मजल सहज गेलेली आहे. भविष्यात ‘5 जी’ येईल. मात्र आजही काही देशांत पूर्वीची प्रणाली वापरात आहे.

जगभरातील तंत्रज्ञानाच्या प्रवासाची वेळ दशकापासून काही वर्षांपर्यंत कमी झाली होती. नजीकच्या काळात हा प्रवास काही महिन्यांवर आलेला असेल. या नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी उद्योजकांच्या नव्या पिढीला सज्ज राहण्याची गरज आहे. बदलाला स्वीकारण्यास सोबतच त्यात नवनवीन संशोधन करण्यासाठी आपल्या कौशल्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com