Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedत्र्यंबकला पोलिस यंत्रणा तोकडी

त्र्यंबकला पोलिस यंत्रणा तोकडी

त्र्यंबकेश्वर । मोहन देवरे | Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिर व्यवस्थापनाने (Temple management) मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या (CCTV system) संख्येत वाढ करून सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याची कामगिरी केली असली तरी, मंदिरामध्ये कायमस्वरूपी पोलिस (police) बंदोबस्त वाढवावा अशी मागणी जागरूक नागरिक, भाविक करू लागले आहे.

- Advertisement -

परप्रांतीय पुरोहितांच्या (Priests) दोन गटात नाशिक (nashik) शहरात झालेला वाद पुरोहितांकडे सापडलेली शस्त्रे, त्र्यंबक (Tryambak) शहरात एका युवकावर झालेला प्राणघातक हल्ला व अन्य गुन्हेगारीचे (Crime) वाढते प्रमाण पाहता जादा पोलिस कुमक आणि संवेदनशील ठिकाणी (sensitive places) कायम स्वरुपी पोलिस बंदोबस्त अशी गरज निर्माण झालेली आहे. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने (Trimbakeshwar Temple Trust) जागरूकता दाखवित 180 सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV cameras) बसवलेले आहेत.

गत दोन वर्षे करोनामुळे त्र्यंबकेश्वर मध्ये यात्रेकरू आलेले नव्हते.आता यात्रेकरू, भाविक (Passionate),पर्यटक (Tourist) व वारकरी नगरीत येत आहे . शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन दिवस अथवा सुट्टीचा दिवस असला तर मोठ्या प्रमाणावर भाविकांची त्र्यंबक नगरीत गर्दी होते. वरील तीन दिवस वगळता निम्मी गर्दी असते. हिवाळ्यात डिंसेंबरमध्ये नाताळात पर्यटक जास्त संख्येने येतात हा अनुभव लक्षात घेता गर्दीत लक्षणीय वाढ होणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.

अलीकडे त्रंबकमध्ये येणार्‍या व्हीआयपींच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.त्रंबकेश्वर देवस्थानने जागरूकता ठेवत त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर चौक, पूर्व दरवाजा दर्शन, मंडप बारी, मेनरोड, पालखी मार्ग कुशावर्त चौक या ठिकाणी 180 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहे. पोलिसांनी केवळ देवस्थान वर अवलंबून न राहता सुरक्षेच्या अधिक उपाय योजना करायला हव्यात. संंत निवृत्तीनाथ महाराज यात्रा (Sant Nivruttinath Maharaj Yatra), महाशिवरात्री (Mahashivaratri), श्रावणमास (Shravanmas) यावेळी पोलिस बंदोबस्त वाढवला जातो. नंतर त्यात ढिलाई निर्माण होते. राज्याच्या गृहखात्याने याबाबत दक्षता घ्यायला हवी.

त्र्यंंबकेश्वरच्या पुरोहितांची वाटचाल परंपरा पूर्वक विश्वासाने, सन्मार्गाने आणि शांततेची आहे. पण परप्रांतीय पुरोहितांमुळे त्र्यंबक नगरीचे नाव खराब होत आहे. दरम्यान कायदा-सुव्यवस्था राखणे साठी नागरिकांनी नगरपालिकेने पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. यात्रेकरू व नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग (Parking) रस्त्यावर असते. अतिक्रमण रस्त्यांवर दुकाने येतात रस्त्याने येणारे जाणार्‍यांना त्यातून मार्ग काढावा लागतो. यासाठी पालिकेने लक्ष घ्यायला हवे. शिस्तीचा अभाव आहे.दरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

नगरपालिकेकडून शिस्तीचा अभाव या बाबतीत दिसून येत आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानकडे बंदूकधारी सुरक्षा रक्षक नाहीत. सोमवारी पालखी सोहळ्याला पोलिसांकडून बंदोबस्त दिला जातो .मुळातच त्रंबकेश्वरला पोलिसांची संख्या कमी त्यात लगतच्या 25 ते 30 खेड्यापाड्यांचा पोलीस स्टेशनच्या हद्दीत समावेश असल्याने पोलिसांवरही ताण आहेत. त्यांनी हद्दीतील गुन्हेगारीवर लक्ष द्यावे की,त्र्यंबकेश्वर शहरातील देवस्थाने, यात्रांवर बंदोबस्त द्यावा, अशी समस्या आहे. त्रंबकेश्वर पोलिसांचा वेळ येथे येणारे व्हीआयपींच्या बंदोबस्त नियोजनात जातो .

अशा प्रसंगात पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते.मोठे व्हीआयपी (VIP) त्रबकेश्वर मंदिरात आल्यानंतर त्यांचा सत्कार करणे आदींकडे विश्वस्त मंडळींचे लक्ष असते. व्हीआयपी आल्यानंतर सामान्यांना मात्र अडवणूक अनुभव येता नाताळ सुट्टीत येणार्‍या सहली गंगाद्वार ब्रह्मगिरी (Gangadwar Brahmagiri) वर जाणारे पर्यटक त्यांची संख्या लक्षणीय असते.

घातपात अपघातांच्या घटना मध्ये त्र्यबकेश्वरला पोस्टमार्टम सुविधा नाही तालुकास्तरीय न्यायालय नाही अशा प्रसंंगात पोलिसांना नाशिक येथे जावे लागते त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. शिवनेरी चौकात वॉल एलसीडी त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृहातील दर्शन होते अशीच सुविधा देवस्थान ट्रस्टने लक्ष्मी नारायण चौकात करावी नागरिकांकडून सूचना आहे.त्र्यंबकेश्वर नगरपालिका त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व पोलीस यंत्रणा यांच्यात समन्वय राहिल्यास नियोजन अधिक सुलभ होऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या