Monday, April 29, 2024
HomeUncategorizedधोक्याचा भुयारी मार्ग

धोक्याचा भुयारी मार्ग

नगरसूल । अनिल जाधव | Nagarsul

येवला (Yeola) – नांदगाव (Nandgaon) रस्त्यावर नगरसुल (Nagarsul) गावा जवळ असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात (Railway subway) पावसाळ्यात (monsoon) मोठ्या प्रमाणात पाणी साचते. असल्यामुळे या रस्त्याने ये जा करताना वाहनधारकाला या पाण्यातून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे हा मार्ग धोक्याचा झालेला आहे.

- Advertisement -

येवला तालुक्यातील (yeola taluka) नगरसूल येथील येवला-नांदगाव प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक 7 (State Highway No.7) वरील नगरसूल रेल्वेस्थानकानजिकच्या (nagarsul railway station)) रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी केलेल्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचते या साठलेल्या पाण्यातूनच वाहन धारक व शाळकरी मुले, मुली, पाई, व सायकलने प्रवास करतांना धोका पत्करून मार्गक्रमन करावे लागत असल्याने हा भुयारी मार्ग (Subway) वाहतुकीसाठी प्रवाशांना मोठी डोके दुखी ठरत आहे.

येथील महामार्गावर येवला – नांदगावसह भुसावळ (Bhusawal), जळगाव (jalgaon), पाचोरा (pachora), चाळीसगाव (chalisgaon) आदी परिसरातील अनेक गावांची प्रवाशी व माल वाहतूक या मार्गाने होत असते. याच मार्गाने मोठ्या प्रमाणात साईभक्त शिर्डी येथे जातात. मात्र या मार्गात रेल्वेने नव्याने तयार केलेल्या भुयारी मार्गात मोठया प्रमाणात पाणी साचल्यामुळे प्रवाशी व वाहनधारकांना हा भुयारी मार्ग डोकेदुखी व मृत्यूचा सापळा बनला आहे.

रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) वाहतुकीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी भुयारी मार्ग तयार केला खरा. पण तोच वाहतुकीसाठी मोठाअडसर बनला आहे. या भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नदीपात्रात टाकलेल्या सिमेंट पाईप मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात माती साचली आहे .रेल्वे प्रशासनाच्या अधिका-यांनी याकडे लक्ष देवून तात्काळ पाईप मधील माती साफ करावी अशी मागणी प्रवासी करत आहे तसेच याची तात्काळ दखल घेतली गेली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नगरसुल ग्रामस्थ व प्रवाशांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या