दखल: जि. प. च्या औषध खरेदीत बचत कशी हो?

दखल: जि. प. च्या औषध खरेदीत बचत कशी हो?

नाशिक | विजय गिते | Nashik

अ‍ॅन्टिजेन किटमधून (Antigen kit) जिल्हा परिषदेचे (zilha parishad) दोन कोटी रुपये वाचवले, असा डांगोरा प्रशासनाकडून पितविला जात असताना दुसरीकडे कोविड (covid-19) काळात तब्बल पंचवीस कोटींच्या औषध खरेदी प्रक्रियेत (Drug purchase process) मोठ्या प्रमाणात झालेल्या अनियमिततेचे काय ओ ? याकडे कानाडोळा करायचा. उलट सत्ताधारी व विरोधक अशा ज्या अभ्यासू सदस्यांनी पोटतिडकीने औषध खरेदीतील घोटाळा (Scam) चव्हाट्यावर आणले त्या सदस्यांवर आजी-माजी पालकमंत्री (Guardian Minister), जिल्ह्यातील काही आमदार (MLA) यांच्याकडून दबाव आणायचा तुमचे आमचे नाही हे तर जिल्ह्याचेच दुर्दैव म्हणायला हवे.

याचा मतितार्थ चुका दाखवील त्याला खलनायक ठरवून आपणच कसे ’ नायक ’ हे दाखविण्याचा हा प्रकार जिल्हा परिषदेत औषध खरेदी वरून समोर आला आहे. कोविडकरिता 11.52 कोटी रुपयांच्या औषध खरेदीचा विषय गाजत आहे.भाजपा वगळता म्हणजेच सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पहिल्यांदाच एकसंघ आणि आक्रमक जाता जाता का होईना दिसून आली. भाजप गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे (BJP group leader Dr. Atmaram Kumbharde) यांनी औषध-साहित्य घोटाळा (Pharmaceutical scam) समोर आणत काही मुद्दे उपस्थित केले आहेत. दर ठरविण्यासाठी कशाचा आधार घेण्यात आला.

सरकारच्या अंगिकृत संस्थांकडून खरेदीसाठी पत्र दिले का? हापकिन या संस्थेच्या दरापेक्षा तुमचे आधारभूत दर अधिक कसे काय आले? आरोग्य विभागाने (Department of Health) नेमून दिलेल्या इतर खासगी संस्थांकडे खरेदीसाठी तुम्ही विचारणा केली का?आधारभूत दर हे अंदाजे लावलेले होते, तर त्यापेक्षा कमी दर आल्यानंतरही जिल्हा परिषदेचे अ‍ॅण्टिजेन किटमधून दोन कोटी रुपये वाचले, असा बाऊ करत स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचे कारण काय ? यातून दोन कोटी वाचले असं गृहीत धरले, तर मग मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 16 जुलै 2021 च्या ग्रामपंचायतींना पाठवलेल्या पत्रामध्ये 89.60 रुपये आधार किंमत ठरवून देऊन अ‍ॅण्टिजेन किट खरेदी करण्याचे आदेश दिले. यामुळे जादा दराने झालेल्या खरेदीतून शासनाचे नुकसान झाले नाही का,असे प्रश्न उपस्थित केले.याला उत्तर देताना जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची चांगलीच भांबेरी उडाली.

अ‍ॅण्टिजेन किटची जिल्हा परिषदेने निविदे पूर्वीची रक्कम 89.60 रुपये निश्चित केली होती. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जुलै 2021 मध्ये सर्व ग्रामपंचायतींना पत्र देत 89.60 रुपयाने खरेदीचे आदेश दिले होते.दरम्यान,जीईएम पोर्टलद्वारे खरेदी प्रक्रियेतून 17.56 रुपये इतकाच दर प्राप्त झाला. मग ग्रामपंचायतने जी खरेदी केली.

त्यात जादा दराने खरेदीला जबाबदार कोण ? महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या शासन निर्णयानुसार आवश्यक साहित्य खरेदी करताना हापकिन, केंद्र शासन पुरस्कृत संस्था जसे एचएलएल आदी यांच्याकडूनच खरेदी करण्याचे शासनाचे निर्देश होते.केंद्र शासन पुरस्कृत एचएलएल यांनी पुरवठा करण्यास संमती दर्शविली होती. मग त्यांना वाटाघाटीसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी न बोलाविण्याचे कारण काय ? जीईएम वर आलेल्या दरापेक्षा त्यांचे दर 16 रुपये आहे.असे असताना मग बचत कशी होणार ? एचएलएल कमी दरात देत असताना केवळ हीत संबंधातील कंपनीकडूनच खरेदीत रस का ? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.

जीईएम पोर्टलवर जशा (अगदी ठरवून) अटी-शर्ती टाकणार त्याप्रमाणेच निविदाधारक कंपन्या येणार ही ’ काळ्या दगडावरची रेष ’ आहे.याचाच अर्थ तुम्हाला मनस्वी मग ज्या कंपनीला द्यायचे त्याच अटी व शर्ती टाकल्या तर इतर कंपन्या येणार तरी कशा ? येथे शंका येते.यात पैसे वाचलेच नाही मग स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काय मर्दमुकी ?

खरेदी झालेल्या एकूण 36 औषध,साहित्य प्रकारांपैकी दहा ते पंधरा प्रकार तर असे आहे की,ज्याच्यात हापकिन (शासन संस्था )व जिल्हा परिषदेची अंदाजित रक्कम जीईएम वर आलेल्या दरापेक्षाही कमी आहे.उदाहरणच द्यायचे ठरले तर पॅरासिटामॉल गोळी हापकिनची 0.29 पैसे व जिल्हा परिषदेचे अंदाजीत दर 0.36 ,जीईएम द्वारे आलेला दर 0.78 इतका आहे.तर मग 0.49 इतक्या वाढीव दराने खरेदी प्रस्तावित करण्याचे प्रयोजन काय?

यातून जिल्हा परिषदेचे म्हटले तर नुकसानच झाले नाही का?उरि ऊेुूलूश्रळाश-100 चच् चा हापकिनचा दर 0.96 रुपये आणि जीईएम द्वारे आलेला दर 1.98 रुपये इतका आहे.म्हणजेच एक रुपया दोन पैसे जास्त दराने खरेदी करण्यात आली आहे.जर जीइएम द्वारे आलेले दर हे शासन संस्था हापकिन व केंद्र शासन पुरस्कृत एचएलएल यांच्यापेक्षा जास्त आहे तर मग शासनाचा पैसा वाचविला हे म्हणण्याचा नैतिक अधिकार प्रशासनाला आहे का ? जिथे एकही रुपयाची बचत झालेली नाही. तेथे स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काय हाशील ?

प्रशासनाने माध्यमातून वृत्त छापून आणत स्वतःची पाठ थोपटून घेतली. यातच त्यांना धन्यता वाटत आहे.औषध खरेदीत घोटाळा नाही,असे प्रशासनाला वाटत असेल तर मग अभ्यासू, हुशार सदस्य म्हणून ज्यांच्याकडे सभागृह पाहते अशा डॉ.आत्माराम कुंभार्डे, सिद्धार्थ वनारसे, मनिषा पवार यांच्यासारख्या सत्ताधारी व विरोधक सदस्यांनी पोटतिडकीने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले असताना त्यांच्यावरच आजी-माजी पालकमंत्री, जिल्ह्यातील काही आमदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दबाव आणण्या मागील हेतू काय ? याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. याचा एकच अर्थ होतो की,जो चुका दाखवतो त्यालाच खलनायक ठरवून आपणच कसे ’ नायक ’ हे दाखवायचे,हा कोणता प्रकार आहे ? परंतु, सत्य हे सत्यच असते ते कधी लपून राहत नाही.

मागील दोन वर्ष करोनाच्या या कालावधीत तब्बल 25 कोटींच्या खरेदी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. मागील सात कोटींच्या खरेदीमध्येही करोना काळात वापरात असलेल्या थर्मल स्कॅनर प्रति साडेसहा हजार रुपये या दराने प्रशासनाने खरेदी केले आहे. मात्र, याचे प्रचलित मार्केटमधील दर हे बाराशे ते पंधराशे रुपये प्रति याप्रमाणेच आहेत.जर एवढ्या कमी किमतीत बाजारात हे साहित्य सहज उपलब्ध होते,हे तेव्हाच सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी सर्वसाधारण सभेत निदर्शनास आणून देत आवाज उठवला होता.यामध्ये किती मोठा घोटाळा आहे ? हे त्यांनी समोर आणत सांगितले होते. वाढीव दरातील खरेदीतील सुमारे 25-30 लाखाची रक्कम गेली कुठे? असा मुद्दाही यामुळे उपस्थित होत आहे.

मॅनेज पदाधिकारी, सदस्य प्रलोभनाचे बळी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत झालेली औषध साहित्य खरेदीचे अंदाजीत दर किंवा शासकीय दरापेक्षा निविदा अथवा जीईएम द्वारे आलेले दर हे दहा टक्क्यांपेक्षा अधिक नसावे,असे शासन निर्देश आहेत. मात्र, तसे निर्देश साहित्य खरेदी करताना पाळले गेले नाही. हाच मुद्दा उचलत सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे ,मनिषा पवार ,सिद्धार्थ वनारसे यांनी बरोबर वर्मावर बोट ठेवत हे निदर्शनास आणून दिले.

मात्र, इतर मॅनेज पदाधिकारी आणि सदस्य प्रलोभनाला बळी पडले. हे कताना त्यांना जिल्ह्याचे,गोरगरीब जनतेचे नुकसान होतेय,हे कळले नसेल का?हे जिल्ह्याचे मोठे दुर्दैव आहे.अधिकारी काय हो पर जिल्ह्यातीलच.त्यांचा तर मलई खाण्याचा इरादा हा पक्काच असतो.अशावेळी जिल्ह्याचे,जनतेचे प्रतिनिधित्व करणारांनी याचे भान ठेवायला पाहिजे.उलट ज्यांनी या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या,त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात आहे, यामध्ये प्रशासनाचे कोणते मोठे शहाणपण आहे? असा मुद्दा यातून उपस्थित होतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com