Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदखल: आता गाई-म्हशींनाही आधार कार्ड!

दखल: आता गाई-म्हशींनाही आधार कार्ड!

नाशिक | विजय गिते | Nashik

ज्यामुळे प्रत्येक भारतीयाची ओळख सोपी झाली आहेच, पण फसवणुकीचे (Fraud) अनेक प्रकारही थांबले आहेत ते म्हणजे आधार कार्ड (Aadhar Card). त्याच्या यशाने प्रोत्साहित होऊन सरकार आता माणसांप्रमाणे गाई (cow) – म्हशींचेही (Buffalo) ‘आधार कार्ड’ बनवणार आहे. त्यासाठीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.

- Advertisement -

या मोहिमेचे नाव आहे ‘पशु आधार’ (Animal Aadhar). जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबत दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास यामुळे मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्याचा (nashik district) विचार करता जिल्ह्यात गायवर्ग पशुधन हे आठ लाख 95 हजार 50 तर म्हैस वर्गीय पशुधन 2 लाख 21 हजार 234 असे एकूण 11 लाख 16 हजार 284 पशुधन आहे. या सर्व गाय व म्हैसवर्गीय पशूधनाचे आधार कार्ड काढले जाणार असून याचा लाभ जिल्ह्यातील पशुपालकांना होणार आहे.

आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचे (International Dairy Conference) नुकतेच पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Modi) हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. देशातील डेअरी क्षेत्राला (Dairy sector) विज्ञानाशी जोडून त्याचा विस्तार केला जात आहे. देशात दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार केला जात असून डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराला टॅग केले जाणार आहे. उत्पन्न वाढवण्याचा मानस आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमेट्रिक माहिती (Biometric information) लागते. म्हणजे बोटांचे ठसे, डोळे आदी माहिती घेतली जाते.

याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या (Modern technology) मदतीने प्राण्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार (central government) पशूधनाबाबतची सर्व माहिती एकत्र करण्यासाठी एक डेटाबेस (database) तयार करत आहे. पशुधनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचं उत्पन्न वाढवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.

केंद्रीय पशुपालन विभागाकडून (Central Animal Husbandry Department) पुढील दीड वर्षात किमान 50 कोटीपेक्षा जास्त पाळीव प्राणी, त्यांचे मालक, जात, उत्पादकतेबाबत माहिती काढण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर (Digital platform) एक यूनिक आयडी दिली जाणार आहे. पाळीव प्राण्यांच्या कानात 8 ग्रॅमच्या वजनावाला पिवळा टॅग (Yellow tag) लावला जाईल.या टॅगवर 12 आकडी आधार क्रमांक असेल.

4 कोटी जनावारेंचे आधारकार्ड

पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या (Ministry of Animal Husbandry and Dairy Development) माहितीनुसार देशात 30 कोटींपेक्षा अधिक गाय, म्हशी आहेत. त्यात फक्त 4 कोटी गायी आणि म्हशींचे आधार कार्ड (Buffalo Aadhar Card) बनवण्यात आले आहे. एक मोहीम राबवून त्यांचं टॅगिंग केलं जाईल. त्यानंतर बकरी, मेंढ्या आदीचे आधार कार्ड बनतील. या कार्डमध्ये एक यूनिक नंबर, मालकाचे विवरण आणि जनावरांचे लसीकरण (vaccination) आणि ब्रीडिंगची माहिती असेल.

जनावरांचे टॅगिंगच त्यांचे आधार कार्ड

जनावरांचे टॅगिंगच (Tagging of animals) त्यांचे आधार कार्ड राहणार आहे. देशातील प्रत्येक गाय आणि म्हशीसाठी एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (Unique Identification Number) जारी करण्यात येईल. याद्वारे जनावरांचे मालक घरबसल्या आपल्या प्राण्यांबाबत माहिती मिळवू शकतात. लसीकरण, जात, सुधारणा कार्यक्रम, उपचारांसह अन्य कामे यामुळे सोपी होणार आहेत. याबरोबरच जनावरांची खरेदी-विक्रीही यामुळे सोपी होणार आहे.

पशुपालन म्हणजे एटीएम मशीन

पशुपालन हे शेतकर्‍यांसाठी एटीएम मशीन (ATM machine) आहे. कारण सद्यस्थितीत दूध व्यवसायात जेवढी प्रगती आहे, तेवढी अन्य कुठल्याच व्यवसायात नाही. बाजारातील सध्याच्या मागणीला 158 मिलियन मेट्रिक टन वाढवून पुढील 5 वर्षात 290 मिलियन मेट्रिक टन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

‘आधार कार्ड’ टॅगचे फायदे

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (National Disease Control Programs) गायी, म्हशी, डुक्कर आणि बकर्‍यांच्या कानात टॅग लावण्याचे काम सुरु आहे. त्याअंतर्गत देशभरात 14.62 कोटी जनावरांना टॅग करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

14 कोटी जनावरांना प्लॅस्टिक टॅग उद्दिष्ट

या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकार गाई, म्हशी, डुक्कर आणि बकर्‍यांच्या कानात टॅग्ज लावण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्याअंतर्गत देशभरात 14.62 कोटी जनावरांना टॅग करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, प्राण्यांच्या कानात लावल्या जाणार्‍या या टॅगबद्दल बोलायचे झाले तर हा टॅग प्लास्टिकचा आहे. ज्यामध्ये 12 अंक नोंदवले जातात. ते लावण्यापूर्वी प्राण्यांचे कान स्पिरीटने स्वच्छ केले जातात, त्यानंतर हा प्लास्टिक टॅग अ‍ॅप्लिकेटरद्वारे कानाच्या मोठ्या नसांना सुरक्षित ठेवतो.

टॅगचा फायदा

हा टॅग जनावरांसाठी जितका फायद्याचा आहे तितकाच गुरेढोरे मालकांसाठीही फायदेशीर आहे. टॅगच्या आधारे पशुपालकांना प्राधान्याने पशुपालनाशी संबंधित अनेक योजनांचा लाभ घेता येईल. किंबहुना, विविध योजनांमध्ये टॅग केलेल्या नोंदणीकृत जनावरांना प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर प्राण्यांच्या विम्यामध्ये हा टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. तर जनावरांची चोरी झाल्यास हा टॅग अतिशय फायदेशीर आहे, ज्याद्वारे जनावरांचा शोध घेता येतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या