दखल: किसान रेलचा शेतकर्‍यांना आधार

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक | विजय गिते | Nashik

आशिया खंडातील (Asia continent) कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ (The largest market of onions) असलेल्या लासलगाव (lasalgaon) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) दाखल होणारा

शेतीमाल (Agricultural commodities) परराज्यातील बाजारपेठेत दाखल होण्यासाठी किसान रेलची (Kisan Rail) सुविधा उपलब्ध झाल्याने ही सेवा अत्यंत फायदेशीर ठरू पाहत होती.ती लासलगाव येथून चार पार्सल व्हॅनची (Parcel wagon) सोय करण्यात आल्यामुळे वाहतूक वाढून शेतकर्‍यांना (farmers) याचा मोठा फायदा होत होता.

मात्र, जानेवारी महिन्यापासून चार पार्सल व्हॅनच्या (Parcel wagon) जागी केवळ एकच पार्सल व्हॅनमधून शेतीमालाची वाहतूक होऊ लागली आहे. परिणामी लासलगावचा शेतमाल परराज्यात पाठवण्यासाठी आता मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकर्‍यांसमोर अशी अडचण निर्माण केल्याने किसान रेलकडून आता आधाराची अपेक्षा व्यक्त केली जात असून उत्पादन वाढले आता शेतीमाल वाहतूकीसाठी साकडे घातले जात आहे.

शेतीमालाची वाहतूक (Transportation of agricultural commodities) बाजारपेठेत आणि तीही योग्य वेळेत उपलब्ध करुन देण्यात किसान रेल (Kisan Rail) महत्वाची भूमिका बजावत आहे.या सुविधेमुळे कोकणचा (kokan) आंबा (mango), नागपूरची संत्री (Orange of Nagpur), पालघरचे चिक्कू थेट दिल्ली बाजारपेठेत दाखल होत आहेत.अगदी त्याप्रमाणेच लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होणारा शेतीमाल परराज्यातील बाजारपेठेत दाखल होत होता तो चार पार्सल व्हॅनची सोय करण्यात आल्याने.

यामुळे वाहतूक वाढून शेतकर्‍यांना याचा फायदा होत होता.मात्र, जानेवारी महिन्यापासून फक्त एकच पार्सल व्हॅनमधून (Parcel wagon) शेतीमालाची वाहतूक होत आहे.परिणामी शेतीमाल परराज्यात पाठवण्यासाठी आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पार्सल व्हॅन संख्या वाढवून मिळावी, यासाठी लासलगाव (lasalgaon) बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप (Market Committee Chairperson Suvarna Jagtap) यांनी केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Family Welfare and Health Dr. Bharti Pawar) यांना लेखी निवेदन (memorandum) देत

रेल्वे मंत्रालयाकडे (Ministry of Railways) पाठपुरावा करून पुन्हा पार्सल व्हॅन पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.याची दखल तात्काळ घेत राज्यमंत्री डॉ. पवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांची भेट घेऊन मध्य रेल्वेच्या लासलगांव स्टेशनवरील (Lasalgaon station) किसानसेवा रेल्वेच्या (Kisan Seva Railway) पार्सल व्हॅन (व्हीपी) ची संख्या वाढवून मिळावी यासाठी चर्चा केली.

उत्पादन वाढूनही उत्पन्न वाढेना

लासलगाव पंचक्रोशीत आता केवळ कांदा (onion) लागवडच नाही तर इतर पिकांचाही प्रयोग शेतकरी मोठ्या प्रमाणातकरीत आहे. त्यामुळे द्राक्ष (Grapes), भाजीपाला (Vegetables), फळे (Fruits), हंगामी पिकाचे उत्पादन उत्तम प्रकारे वाढत आहे. शिवाय किसान रेलच्या माध्यमातून बाजारपेठेची सोय होत असल्याने शेतकर्‍यांनी नगदी पिकांवर भर दिला होता. मात्र, जानेवारी महिन्यापासूनच किसान रेलमधील शेतीमाल वाहतूकीची क्षमता ही कमी करण्यात आली आहे. त्यामुळे माल अधिक अन् पुरवठा कमी अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही निघत नाही. स्थानिक बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्याने शेतकर्‍यांना याचा फटका बसत आहे.

वाढीव क्षमतेने बदलले होते चित्र

आशिया खंडात (Asia continent) कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या (Lasalgaon Market Committee) हद्दीतील गावांमध्ये कांद्यासह द्राक्ष, भाजीपाला, फळे आणि भुसार शेती मालाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. परराज्यात शेतीमाल विक्री करता यावे तसेच या शेतीमालाचा योग्य मोबदला शेतकर्‍यांना मिळावा, यासाठी रेल्वे विभागाच्यावतीने अनुदानित तत्वावर नाशिकरोड रेल्वे स्थानकातून (Nashik Road Railway Station) किसान रेल सुरु करण्यात आली.

या किसान रेलला लासलगाव रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला आहे. अगदी सुरुवातीला एकच पार्सल व्हॅन (व्हीपी) देण्यात आल्याने केवळ 24 टन इतकाच शेतमाल पाठवता येत होता.मात्र,मागणीत वाढ झाल्यानंतर चार पार्सल व्हॅन (व्हीपी) देण्यात आल्या. यामुळे एप्रिल 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंत 10 लाख 8 हजार 679 क्विंटल शेतीमालाची निर्यात झाली. या शेतीमालाच्या भाड्यातून लासलगाव रेल्वे पार्सल विभागाला 4 कोटी 54 लाख 1 हजार 805 रुपयांचे भरगोस उत्पन्न मिळाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *