Friday, April 26, 2024
HomeUncategorizedदखल: धास्ती लम्पिची

दखल: धास्ती लम्पिची

नाशिक | विजय गिते | Nashik

राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी (heavy rain), दुष्काळ (drought), करोणाची महामारी (corona) अशा परिस्थितीत पिकविलेल्या शेतमालाला उत्पादन खर्चही निघेल इतकाही भाव मिळत नसल्याने शेतकरी (farmer) मेटाकुटीला आला आहे.

- Advertisement -

अशा बिकट परिस्थितीतून वाट काढत असलेल्या शेतकर्‍यांवर विशेषतः पशुपालकांना मोठी आर्थिक हानी पोहोचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्याच्या विविध भागात जवळपास 18 जिल्ह्यांमध्ये गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशींना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (lumpy skin disease) मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे पशुपालकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. गाई (cow) व म्हशींच्या (buffalo) दूध (milk) विक्रीवर याचा परिणाम होणार असून यामुळे आर्थिक संकटाला पशुपालकांना सामोरे जावे लागणार असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

नाशिकसह (nashik) राज्यातील जळगांव (jalgaon), अहमदनगर (Ahmednagar), अकोला (akola), पुणे (pune), धुळे (dhule), लातूर (latur), औरंगाबाद, बीड, सातारा बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आदी भागात सद्यस्थितीत गाय वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे यांच्याकडील नमुने तपासणी अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील (nashik district) पांगरी व दुसंगवाडी (ता. सिन्नर) या गावांमधील जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव (lumpy skin disease) झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत पशुसंवर्धन विभाग (Department of Animal Husbandry), जिल्हा परिषद (zilha parishad) नाशिक मार्फत जनजागृती व उपाययोजना करण्यात येत आहे. जनावरांमध्ये याबाबत लक्षणे आढळून आल्यास त्वरीत औषधोपचार करून घेण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही आहेत बंधने

एका राज्यातून दुसर्‍या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसया जिल्ह्यात बाधित जनावरांची वाहतुकीला बंदी (Ban on transport of animals). प्रादुर्भाव भागातील जनावरांची व जनावरांचे बाजार, यात्रा, पशु प्रदर्शने यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशीचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे.

प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि प्रतिबंधित निगराणी क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे.यास मनाई करण्यात आली आहे. उक्त प्रतिबंधित निगराणी क्षेत्रामधील बाजार पेठेत जोत किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किया कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांच्या बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास मनाई करण्यात आली आहे.

योग्य उपचाराने फायदा

लम्पी चर्म रोगाचा फैलाव बादा किटकांद्वारे (मच्छर, गोचीड, गोमाश्या तसेच आजारी पशुंच्या त्वचेवरील व्रणामधून वाहणारा दूध, वीर्य इतर स्रावामुळे होत असल्याने पशुपालकांनी मच्छर,गोचीड व गोमाश्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. लम्पी चर्मरोग बाधित पशुमध्ये दिसून येणारी लक्षणे पाहता या आजारात पशुंना ताप येतो, त्वचेवर गाठी येणे, भूक कमी होणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, दूध उत्पादन कमी होणे. काही वेळा फुफ्फुस दाह, स्तनदाह होणे, पायावर सूज येणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात होने अशी लक्षण दिसून येतात. या रोगाने बाधित झालेली जनावरे योग्य उपचाराने दोन-तीन आठवडयात बरी होतात.

पशुपालकांना आवाहन

पशुपालकांनी लम्पी स्किन या जनावरांमधील आजारामुळे घाबरून जाऊ नये. रोग सदृश लक्षणे दिसून आल्यास त्वरित जवळील पशुवैद्यकिय दवाखान्यास संपर्क साधावा.पशुवैद्यकाकडून आवश्यक उपचार करुन घ्यावे, तसेच रोगप्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. ग्रामपंचायत स्वरावरून पशुपालकांमध्ये लम्पी स्किन आजाराबाबत जागृती करण्यात यावी.आवश्यक ती खबरदारी योग्य वेळी घेतल्यास संक्रमणाची शक्यता राहणार नाही,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.बी.आर.नरवाडे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विष्णू गर्जे यांनी केले आहे.

लम्पी त्वचा रोगाची लक्षणे

1) जनावरांना ताप येतो व त्यामुळे दूध उत्पादन कमी होते. 2) संक्रमित झालेल्या जनावरांच्या नाकात व तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी आढळतात. 3) जनावरांना पोट, पाठ, पाय, मान, डोके तसेच शेपटी खाली त्वचेवर 10 ते 50 मी.मी. व्यासापर्यंतच्या कडक व गोलाकार गाठी येतात. 4) डोळ्यातून व नाकातून स्राव होतो. 5) गर्भधारणा अवस्थेतील जनावरामध्ये गर्भपात होतो किंवा रोगट वासरे जन्माला येतात. 6) काही जनावरांत पायावर सुज येऊन लंगडतात.

प्रसाराची कारणे

2) लम्पीचा प्रसार बाधित जनावरांच्या नाकातील स्राव, लाळ, मूत्र, दूध तसेच विर्यातून जनावरांना होतो. 2) रोग पसरविणारे किटक, डास, चावणार्‍या माशा व गोचिड यांच्या मार्फत 3) उष्ण व दमट वातावरणात लम्पी रोगाचा जास्त प्रसार होतो. 4) दुषित चारा व पाणी सेवन तसेच वासरांना बाधित गायीकडून संसर्ग,4 से 14 दिवसांपर्यंत संक्रमण कालावधी असतो. 5) लम्पी रोगाचे विषाणु रक्तामध्ये आढळतात व नंतर शरीरात इतर भागात संक्रमण करतात.

कसे मिळवायचे रोगावर नियंत्रण

3) गोळ्यात डास, माश्या, गोचिड होणार नाही याची दक्षता घ्यावी. 2) जनाबरोबर उपचार करतांना नविन सिरोंज निडलचा वापर करावा. 3) साथीचा आजार सुरु असे पर्यंत बाजारातून जनावरांची खरेदी – विक्री थांबवावी. 4) बाधित जनावरे त्वरित वेगळे करावे. 5) गोठ्यात सोडियम हायपोक्लोराईड, फिनेल यांची फवारणी करावी. 6) जनावरांना आयव्हरमेक्टीन इंजेक्शन दिल्यास किटक, गोचिड यांचे नियंत्रण होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या