दखल: आरक्षणाचा ब्रेक; नव्या नेतृत्त्वाला संधी

jalgaon-digital
5 Min Read

नाशिक | विजय गिते | Nashik

जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) आरक्षण सोडतीनंतर (Reservation draw) कंबर कसून रिंगणात उतरण्यास तयार असणार्‍याना अर्थातच गुडघ्याला बाशिंग बांधून असणार्‍या दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे.

माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती अन् सभागृहात नेहमीच आघाडीवर म्हणून ओळख निर्माण केलेल्या माजी सदस्यांना पुन्हा लढण्याची संधी मिळणार नसून त्यांना ब्रेक बसला आहे. अशी एकूणच स्थिती असतानाच राजकीय घराण्यांतील पुढील पिढीचीही निवडणूक (election) लढविण्याची आशा आता बळावली असून त्यांचाही मिनी मंत्रालयात श्रीगणेशा होऊ शकतो. त्यामुळे आरक्षणामुळे (reservation) भल्या भल्यांची दांडी गूल झाली असली तरी नव्या नेतृत्वालाही यातून काही अंशी संधी मिळू शकते.

मावळत्या सभागृहातील बाळासाहेब क्षीरसागर, शीतल सांगळे, जयश्री पवार, डॉ. सयाजीराव गायकवाड, नयना गावित, संजय बनकर, अश्विनी आहेर, अपर्णा खोसकर, किरण थोरे, उदय जाधव, कलावती चव्हाण यांच्यासह डॉ. आत्माराम कुंभार्डे, सिद्धार्थ वनारसे, रमेश बोरसे, महेंद्रकुमार काले, शंकरराव धनवटे, अमृता पवार आदींचा समावेश आहे. यातही मावळत्या सभागृहातील 73 सदस्यांपैकी नितीन पवार, हिरामण खोसकर हे विधानसभा सभागृहात आहेत.

सभागृहातील उर्वरित माजी सदस्यांपैकी 53 सदस्यांना सोयीचा गट शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे यापैकी जवळपास 17 माजी सदस्य हे गट बदलून अथवा आरक्षणाऐवजी सर्वसाधारण जागेवरून पुन्हा निवडणूक (election) लढऊ शकतात. यामध्ये मंदाकिनी बनकर, रुपांजली माळेकर, सुशीला मेंगाळ, नयना गावित, वैशाली खुळे, गणेश अहिरे, साधना गवळी, बलवीर कौर निर्मल गिल, मनिषा पवार, यशवंत गवळी, ज्योती जाधव, भास्कर गावित, हेमलता गावित, अशोक टोंगारे, सुनीता चारोस्कर यांचा समावेश राहू शकतो.

राजकीय घराण्यांतील पुढील पिढीचीही निवडणूक लढविण्याची अपेक्षा बळावली आहे. यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal) यांचा मुलगा गोकूळ, खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्या स्नुषा भक्ती गोडसे, माजी आमदार धनराज महाले यांचा मुलगा वैभव, आ. नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांचा मुलगा ऋषीकेश, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा मुलगा समीर, माजी आमदार शिवराम झोले यांच्या स्नुषा हे निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांचा मुलगा हर्षवर्धन निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता होती. मात्र, आता त्यांना त्यांच्या जायखेडा गटातून उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी सभापती पोपट अहिरे, अशोक सावंत, उषा बच्छाव, माजी सदस्या मनिषा भामरे, मनिषा बोडके, विलास आलबाड, दत्तू ढगे यांच्या पत्नी, दत्तात्रय पाटील, सुरेश डोखळे, प्रवीण जाधव, ज्योती माळी, संभाजी पवार, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब वाघ आदिकडून निवडणुकीची तयारी होण्याची शक्यता अधिक आहे.

एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड हे उमेदवारीसाठी सिन्नरमधून आग्रही राहू शकतात, परंतु भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यासाठी देवळ्यातून गट राहिलेला नाही. त्याचवेळी माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या कन्या गीतांजली यांच्याकडून कळवणऐवजी बागलाण अथवा देवळ्याचा विचार होऊ शकेल. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे पती प्रवीण पवार यांच्यासाठी देवळ्यातून निवडणूक लढण्यासाठी आग्रह धरला जाऊ शकतो.

यांची झाली अडचण

रेखा पवार ( ताहराबाद- काँग्रेस), कन्हू गायकवाड (नामपूर- भाजप), मीना मोरे (ठेंगोडा- भाजप), लता बच्छाव (ब्राह्मणगाव- भाजप), राजेंद्र सोनवणे (वडनेर-शिवसेना), दादाजी शेवाळे (झोडगे-शिवसेना), समाधान हिरे (रावळगाव-भाजप), संगीता निकम (दाभाडी-भाजप), जगन्नाथ हिरे (निमगाव-भाजप) धनश्री केदा आहेर (लोहणेर-भाजप) यशवंत शिरसाठ (उमराणे-राष्ट्रवादी), नूतन आहेर (वाखारी-राष्ट्रवादी),

जयश्री पवार (खर्डेदिगर-राष्ट्रवादी), गीतांजली पवार (मानूर-राष्ट्रवादी), डॉ. कलावती चव्हाण (हट्टी -भाजप), अनिता बोडके ( भवाडा-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ), रोहिणी गावित (अहिवंतवाडी-शिवसेना), छाया गोतरणे (कसबेवणी-शिवसेना), भास्कर भगरे (खेडगाव-राष्ट्रवादी), सारीका नेहरे (मोहाडी-शिवसेना), डॉ. सयाजीराव गायकवाड (दुगाव राष्ट्रवादी), डॉ. आत्माराम कुंभार्डे (तळेगाव रोही-भाजप),

कविता धाकराव (वडाळीभोई-शिवसेना), शोभा कडाळे (वडनेरभैरव-काँग्रेस), रमेश बोरसे (साकोरे-शिवसेना),अश्विनी आहेर (न्यायडोंगरी-काँग्रेस), आशाबाई जगताप (भालूर-भाजप), सुनीता पठाडे (जातेगाव-शिवसेना), संजय बनकर (पाटोदा-राष्ट्रवादी), सविता पवार (नगरसूल-शिवसेना), महेंद्रकुमार काले (अंदरसूल- राष्ट्रवादी), कमल आहेर (मुखेड- शिवसेना), ज्योती वाघले (पिंपळगाव बसवंत-शिवसेना), ज्ञानेश्वर जगताप (लासलगाव-भाजप), किरण थोरे (विंचूर-राष्ट्रवादी), बाळासाहेब क्षीरसागर (उगाव-शिवसेना),

दीपक शिरसाठ (कसबे सुकेणे-शिवसेना), सिद्धार्थ वनारसे (चांदोरी-राष्ट्रवादी), सुरेश कमानकर (सायखेडा-राष्ट्रवादी), अमृता पवार (देवगाव-राष्ट्रवादी), अपर्णा खोसकर (गिरणारे-राष्ट्रवादी), यशवंत ढिकले (पळसे-राष्ट्रवादी), शंकरराव धनवटे (एकलहरे शिवसेना), चारोस्कर (गोवर्धन शिवसेना), रमेश बरफ (ठाणापाडा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), शकुंतला डगळे (अंजनेरी-काँग्रेस), उदय जाधव (घोटी-राष्ट्रवादी), कावजी ठाकरे (नांदगाव सदो-शिवसेना), हरिदास लोहकरे (खेड-शिवसेना), सुनीता सानप (नायगाव-शिवसेना), नीलेश केदार (नांदूरशिंगोटे – शिवसेना), शीतल सांगळे (चास-शिवसेना), वनीता शिंदे (ठाणगाव-शिवसेना).

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *