दखल: जिल्ह्यातील 6,729 विधवांंना योजनेचा लाभ

दखल: जिल्ह्यातील 6,729 विधवांंना योजनेचा लाभ

नाशिक | विजय गिते | Nashik

पतीच्या निधनानंतर विधवा (Widow) झालेल्या महिलेकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन (Society's view of women) बदलून जातो. यात जवळचे नातेवाईक (Relatives) देखील असतात. अशा महिलेला आर्थिक (Financial), सामाजिक पाठबळाबरोबरच (Social support) खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी व्यक्ती फारच थोड्या विधवा महिलांच्या नशिबी येते. अशावेळी या महिलांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य (Cooperation) मिळत नाही आणि तिची आर्थिक परिस्थिती देखील कमकुवत होते.

त्यातही ज्या महिलांची मुले - मुली मोठी, सज्ञान असली तर अशा महिलांना फार त्रास होत नाही. मात्र, अकाली विधवापन आलेल्या महिलांना फार सोशिक रहावे लागते. अशा महिलांचे सशक्तीकरण (Empowerment of women) व स्वावलंबी करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामधील एक योजना म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (Indira Gandhi National Widow Retirement Scheme) होय. या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील (nashik district) 6729 महिलांना लाभ मिळाला.

जेणेकरून या महिलांना समाजात वावरताना एकटेपणा वाटू नये, यासाठी आर्थिक मदतीसह विविध योजनांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाईल. जेणेकरून या गरीब विधवा महिलांना आर्थिक समस्येचा (Financial problems) सामना करावा लागू नये आणि त्यांचे वृद्धकाळातील जीवन सोईचे होईल. महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर शासकीय योजनेतून मिळालेल्या पेन्शनमुळे (Pension) ती स्वत:चे आयुष्य जगू शकेल, तीला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. ती आपल्या दैनंदिन जीवनात आर्थिक गरजा भागवू शकत नाही.

हे पाहता राज्य सरकार महाराष्ट्र 2021 या विधवा निवृत्तीवेतनाची योजना सुरू केली आहे. या महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा 600 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत महिलांना सशक्तीकरण व स्वावलंबी केले जाणार आहे.ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाईल. जेणेकरून या गरीब विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये आणि त्यांचे वृद्धकाळातील जीवन सोईचे होईल.या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांच्या आर्थिक गरजा भागविणे तसेच त्यांना स्वावलंबी बनविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ज्या विधवा महिलांना आधार नाही.त्यांना आर्थिक आधार देऊन स्वावलंबी बनविणे हा मुख्य विषय आहे.

राज्यात निराधार, अंध, अपंग, शारीरिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य मिळावे.या हेतूने राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात. केंद्र पुरस्कृत दारिद्र्य रेषेखालील वृध्द व्यक्तींकरीता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना (Indira Gandhi National Old Age Retirement Scheme), विधवा महिलांकरीता इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व दिव्यांग व्यक्तींसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत मिळणार्‍या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी, विविध संघटना, स्वयंसेवा संस्था व अनेक नागरिक यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा सहाशे रुपयांवरून एक हजार व या योजनेतील विधवा लाभार्थ्यांना 1 अपत्य असल्यास दरमहा 1100 रुपये व 2 अपत्य असल्यास रुपये 1200 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येत आहे.

विधवा निवृत्तीवेतन योजना

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या 40 ते 79 वर्ष वयोगटातील विधवा महिला, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतंर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेमध्ये केंद्र शासनाकडून लाभार्थ्याला तीनशे रुपये दरमहा देण्यात येतात. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून लाभार्थ्यास देण्यात येणा-या दरमहा तीनशे रुपये अर्थसहाय्यात चारशे रुपये इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा 1000 रुपये(केंद्र शासनाचे 300 रुपये व राज्य शासनाचे 700 रुपये अशी करण्यात आली आहे.

लाभ मिळालेली आकडेवारी

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेमध्ये केंद्र शासनाकडून लाभार्थ्याला तीनशे रुपये दरमहा देण्यात येतात.या योजनेचा नाशिक जिल्ह्यातील 6729 महिलांना याचा लाभ मिळत आहे. लाभ मिळणार्‍या जिल्ह्यातील महिला पुढीलप्रमाणे- नाशिक शहर-371, नाशिक ग्रामीण 122, दिंडोरी-683,पेठ-202, सुरगाणा-311,बागलाण-614, मालेगाव शहर-1425, मालेगाव ग्रामीण-83, निफाड -644,सिन्नर -113,इगतपुरी -431,येवला - 297, कळवण - 92, चांदवड - 178, नांदगांव - 429, देवळा - 50, त्र्यंबकेश्वर - 684, एकूण -6729.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com