दादा, विकासासाठी मनपाला निधी मिळवून द्या

दादा भुसे
दादा भुसे

नाशिक | फारूक पठाण | Nashik

नाशिक महापालिकेची (Nashik Municipal Corporation) जकात वसुली (Collection of Zakat) बंद झाल्यानंतर लोकल बॉडी (Local body) अर्थात एलबीटी (LBT) लागू झाला. त्यानंतर तोही बंद होऊन देशात एक टॅक्स (tax) म्हणजे जीएसटी (GST) लागू झाला.

नाशिक महापालिकेला दर महिन्याला जीएसटीच्या (GST) रूपाने सुमारे 90 कोटी रुपये मिळतात. त्यातून सुमारे 60 कोटी रुपये महापालिकेचे अधिकारी तसेच सेवकांच्या पगारासाठी खर्च होतात तर इतर खर्च देखील मोठ्या प्रमाणात आहे तर दुसरीकडे घरपट्टी (house tax), पाणीपट्टीची (water tax) पाहिजे त्या प्रमाणात होत नाही.

म्हणून नाशिक महापालिकेला शहरात विकासकामे (Development works) करण्यासाठी तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीसाठी पैशांची गरज असल्यामुळे पालकमंत्र्यांनी महापालिकेत येऊन आढावा घेण्याबरोबरच शासनाकडून भरीव निधी (fund) मिळून दिल्यास शहराचा विकास अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे.

नाशिकमध्ये (nashik) दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होते. नाशिक गंगाकिनारी तसेच त्र्यंबकेश्वर (tryambakeshwar) ठिकाणी हा भव्य स्वरूपाचा कुंभमेळा आयोजित करण्यात येतो. नाशिक शहरात लाखो लोक येतात, आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 साली होणार आहे. म्हणून त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात शहराचा विकास व येणार्‍या भाविकांसाठी सुखसुविधा पुरविण्यासाठी काम करायचे आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरातील रस्ते (road) मोठ्या करण्याबरोबरच नवीन रिंगरोड तयार करण्याचे नियोजन आहे.

मिरची चौकात अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी त्याची गंभीर दाखल घेतली आहे. म्हणून त्या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी उड्डाणपूल (Flyover) करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर झालेल्या एका बैठकीत या संपूर्ण रस्त्यावर एकूण तीन पूल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्तांनी पीडब्ल्यूडी विभागाला (PWD Department) याबाबत काम करण्याचे सूचना केले असून तुम्ही प्रस्ताव तयार मुख्यमंत्र्यांकडून त्याला मंजूर करून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासनदेखील दिले आहे.

त्यामुळे हे तीन पुलांबरोबरच जलालपूरपासून सुमारे 60 किलोमीटर लांब फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येणार्‍या नव्या रिंग रोडसाठी देखील महापालिकेने तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे नमामि गोदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी देखील सल्लागार नेमणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. केंद्र सरकार (central government) सुमारे दोन हजार कोटी रुपये देणार आहे, मात्र त्यासाठी महापालिकेला डीपीआर (DPR) सादर करणे आवश्यक असल्यामुळे हे काम लवकर व्हावे, अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे विकासकामे राखण्याच्या मार्गावर दिसत आहे.

आढावा निकामी ?

महापालिकेतील नोकरभरती, घरपट्टीवाढीचे पुनर्विलोकन यांसह अनेक महत्वाच्या मुद्यांवर पालकमंत्री दादा भुसे ठोस तोडगा काढतील व ही अपेक्षा फोल ठरली. मनपाचे शासनाकडे असलेले प्रस्ताव व विषय एकत्रित यादी करून पाठवावेत. शासन स्तरावर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करु, असे आश्वासन पालकमंत्री भुसे यांनी नाशिक महापालिकेत आढावा बैठकीत दिले.

तीन ऑक्टोबर रोजी पालकमंत्री भुसे यांनी महापालिका मुख्यालयात विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक बोलावली होती. त्यात हजार घरे फ्री होल्ड करणे, नोकरभरतीसाठी सुधारित आकृतीबंध मंजुरीसाठी प्रयत्न, स्मार्ट सिटीच्या कामाचे अवलोकन, गोदावरी नदीचे पूररेषा निश्चित करणे, नवीन नाशिक व पंचवटीत नवीन खाटांचे नवे रुग्णालय उभारणे उभारणे यांसह विविध प्रश्नांवर काही ठोस पदरात पडेल अशी अपेक्षा होती. मात्र चर्चे व्यतिरिक्त या बैठकीतून फारसे काही हाती लागले नाही, बोलले जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले दादा भुसे यांनी नाशिकच्या विकासासाठी अधिक निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नाशिक महापालिकेत मागील 24 वर्षांपासून भरती झालेली नाही तर आता शासनाच्या नव्या आदेशानुसार 80 टक्केपर्यंत पदे भरण्याची मुभा शासनाने दिली असल्यामुळे त्यासाठी देखील पालकमंत्र्यांनी घ्यावा व नाशिक शहरवासीयांना महापालिकेकडून अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मनुष्यबळाची पूर्तता करावी, अशी आशादेखील व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com